1. कृषीपीडिया

खतातील बनावटपणा ओळखा काही मिनिटात; 'या' टिप्सने कळेल नकली आहे का असली

पेरणी झाल्यानंतर पिकांची व्यवस्थित वाढ होण्यासाठी शेतकरी पिकांना युरिया पुरवत असतात. पण राज्यात यंदा युरिया आणि खतांचा तुटवडा झाला होता.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


पेरणी झाल्यानंतर पिकांची व्यवस्थित वाढ होण्यासाठी शेतकरी पिकांना युरिया पुरवत असतात.  पण राज्यात यंदा युरिया आणि खतांचा तुटवडा झाला होता. अशात बनावट खतांची विक्री होत असते यामुळे शेतकऱ्यांची मोठे आर्थिक नुकसानीसह पिकांचे नुकसान होत असतात.  बाजारात अनेक दुकानदार बनावट खतांची विक्री करत असतात.  अनेक वेळा डीएपीमध्ये खडे आढळून येत असतात. सर्वात जास्त महाग असलेल्या अमोनिया फास्टेटमध्ये खूप बनावट होत असते.  आजच्या लेखात आपण बनावट खते कशा पद्धतीने ओळखाची याचे टिप्स देणार आहोत.  या टिप्समुळे शेतकऱ्यांची होणारे नुकसान वाचणार आहे.

डीएपी -  असली आहे किंवा नकली हे ओळखण्यासाठी  एक सोपी पद्धत आहे.  डिएपीची काही दाने हातात घेऊन तंबाखूला चूना लावून  मळतात तशापद्धतीने डीएपीच्या दाणेला चूना लावून  मळावे. मळल्यानंतर जर त्यातून दीर्घ वास येत असेल आणि त्याचा वास घेणेही असह्य असेल तर समजावे की, हे असली डीएपी आहे.  यात अजून एक सोपी पद्धत आहे, डीएपीचे काही दाणे कमी आचेवर तवा गरम करुन  त्यावर टाकावे.  जर दाणे फुटले तर समजावे की हे डीएपी असली  किंवा खरे आहे.

पाण्यात विरघळतो युरिया  -

युरियाचे दाणे हे सफेद चमकदार आणि समान आकाराचे असतात. युरियाचे दाणे पाण्यात टाकल्यानंतर तर ते पाण्यात विरघळतात आणि  हाताला पाणी थंड लागत असेल तर युरिया असली असल्याचे समजावे.  दरम्यान यातील बनावटपणा ओळखायचा असेल तर याचे काही दाणे गरम तव्यावर टाकावे, आच वाढवल्यानंतर हे दाणे नाहिसे झाल्यास  हे हा ओरिजनल किंवा उकृष्ट युरिया आहे.

पोटॉश -  याची ओळख करायची असेल तर काही दाण्यांवर पाणी टाकल्यानंतर जर  दाणे एकमेकांना चिटकत असतील तर तर त्यात काही तरी बनावटपणा असल्याचे समजावे. पाण्यात टाकल्यानंतर पोटॉश विरघळत असते, पाण्याच्या वरच्या भागात लाल रंग दिसत असतो.  

सुपर फास्फेट – याचे दाणे  जाड आणि बदाणी रंगाचे असतात. सुपर फास्फेटचे काही दाणे गरम केल्यानंतर याचे दाणे ही फुलले किंवा फुटले नाही तर समाजावे की, यात कोणताच बनावटपणा नाही.  सुपर फास्फेटचे दाणे कठिण असतात, नाखांनी हे दाणे तुटत नाहीत.

जिंक सल्फेट

जिंक सल्फेटचे दाणे हे सफेज तसेच भुरक्या रंगाचे बारीक असतात.  जिंक सल्फेटमध्ये मॅग्नीशिअम सल्फेटची भेसळ केली जाते. दोन्ही खते एकसारखी दिसत असल्याने दोघांचा फरक करणे सोपे नसते. 

English Summary: Identify False Fertilizers In a few minutes, these tips will help Whether urea and DAP is fake Published on: 31 August 2020, 11:26 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters