1. कृषीपीडिया

ह्युमिक आम्ल शेतीसाठी ठरतंय फायदेशीर, ओसाड जमीन बनतेय सुपीक

काळाच्या ओघात जसा शेती व्यवसायात बदल होत चालला आहे त्याप्रमाणे नवीन नवीन शोध लागत आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
ह्युमिक आम्ल शेतीसाठी ठरतंय फायदेशीर, ओसाड जमीन बनतेय सुपीक

ह्युमिक आम्ल शेतीसाठी ठरतंय फायदेशीर, ओसाड जमीन बनतेय सुपीक

काळाच्या ओघात जसा शेती व्यवसायात बदल होत चालला आहे त्याप्रमाणे नवीन नवीन शोध लागत आहे. आजकाल आपण फक्त उत्पादन वाढीचा विचार करत आहोत पण जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत.हानिकारक रसायने वापरून आपण जमिनीची (soil) पोत कमी करत आहोत आणि याच परिणाम उत्पादनावर होतो.मातीची रचना तसेच खतक्षमता वाढविण्यासाठी ह्युमिक आम्ल महत्वाचे ठरते. ह्युमिक आम्ल कोणताही पिकावर परिणाम करत नाही. ह्युमिक आम्लमुळे रोपांची वाढ तसेच सुधारणा होते.

ह्युमिक अँसिड म्हणजे काय?

ह्युमिक आम्ल हे एक उपयुक्त खनिज आहे असे कृषितज्ञ डॉ. एस. के. सिंग यांचे मत आहे जे की याचा वापर पडीक जमीन सुपीक करण्यासाठी केला जातो. जमिनीत ओलावा राखण्यासाठी ह्युमिक आम्ल उपयोगाचे आहे.ह्युमिक आम्लमूळे जमिनीमध्ये खत चांगल्या प्रकारे विरघळते तसेच वनस्पती पर्यंत पोहचते. जमिनीमधील नायट्रोजन आणि लोह जोडण्याचे काम ह्युमिक आम्ल करते.

ह्यूमिक आम्ल तयार करण्याच्या पद्धती:-

डॉ.एस. के.सिंग यांचे असे मत आहे की ह्युमिक आम्ल बनवण्याची पद्धत जर शेतकऱ्यांनी समजली तर उत्पादनात वाढ होईल. ह्युमिक आम्ल तयार करण्यासाठी २ वर्ष जुन्या शेणाच्या गौऱ्या तसेच सुमारे ५० लिटरचा ड्रम लागतो.प्रथमता तुम्ही गौर्यांनी ड्रम भरा नंतर ३० लिटर पाण्याची ड्रम भरून ७ दिवस झाकून ठेवावा. ७ दिवसाने ड्रम उघडल्यानंतर त्यामधील पाणी लाल व तपकिरी रंगाचे दिसेल. ड्रमातून शेण काढून त्यातील पाणी कापडाने गाळून घ्यावे. जे की हे द्रव्य ह्युमिक आम्ल म्हणून वापरावे.

ह्युमिक अँसिड कसे वापरावे?

१. जे ड्रमात तयार केलेले पाणी आहे ते जमिनीत मिसळावे.

२. रोप लावण्यापुर्वी त्याची मुळे तयार केलेल्या पाण्यात बुडवावी.

३. कीटकनाशकाचा हे पाणी मिसळून फवारणी करावी.

४. रासायनिक खतामध्ये सुद्धा हे मिसळावे.

 

नेमका काय फायदा होतो:-

१. ह्युमिक आम्ल पाणी धारण क्षमता वाढवते.

२. ह्युमिक आम्ल मातीमध्ये हवा वाढवते.

३. ह्युमिक आम्ल वनस्पतीमध्ये पोषक तत्वे वाढवते.

४. ह्युमिक आम्ल दुय्यम तसेच तृतीयक मुळे वाढवते.

५. ह्युमिक आम्ल वनस्पतीच्या आतील एन्झाइम्स आणि हार्मोन्स उत्तेजित करते.

 

वापराची पद्धत:-

वनस्पती फुलण्यापूर्वी किंवा सक्रिय वनस्पतीजन्य अवस्थेत ह्युमिक आम्ल सकाळी किंवा संध्याकाळी ३ मिली १ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

English Summary: Humic acidity in farming will benifitial west land make fertile Published on: 21 February 2022, 03:23 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters