1. कृषीपीडिया

अशी करा अस्टर फुलाची लागवड; जाणून घ्या! कोणत्या आहेत परदेशी जाती

अस्टर हे हंगामी फूल पीक असून त्यामध्ये पांढऱ्या, लाल, गुलाबी, जांभळ्या रंगाची फुले विशेषतः आढळतात. अस्टरची लागवड संपूर्ण देशात तसेच राज्यात मोठ-मोठ्या शहरांच्या भोवती केली जाते.अस्टरची फुले फुलदाणीत सजावटीसाठी तसेच हारांमध्ये वापरली जातात.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
अस्टर फुलाची लागवड तंत्र

अस्टर फुलाची लागवड तंत्र

अस्टर हे हंगामी फूल पीक असून त्यामध्ये पांढऱ्या, लाल, गुलाबी, जांभळ्या रंगाची फुले विशेषतः आढळतात. अस्टरची लागवड संपूर्ण देशात तसेच राज्यात मोठ-मोठ्या शहरांच्या भोवती केली जाते.अस्टरची फुले फुलदाणीत सजावटीसाठी तसेच हारांमध्ये वापरली जातात.

अस्टरची फुले व कट फ्लावर म्हंणून तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये वापरली जातात. बगीच्यामध्ये रस्त्यालगत तसेच कुंड्यांमध्ये अस्टरची लागवड केली जाते.

हवामान व जमीन

अस्टर हे मुख्यत्वे करून थंड हवामानाचे पीक असून त्याची लागवड वर्षातील तिन्ही हंगामात केली जाते. थंड हवामानात अस्टरची वाढ चांगली होते व फुलांचा दर्जादेखील चांगला असतो. या पिकास भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. उन्हाळी हंगामात जास्त तापमान वाढल्यास वाजवीपेक्षा जास्तीत-जास्त दर्जेदार फुले मिळण्यासाठी बियाण्याची रोपासाठी पेरणी सप्टेंबर / ऑक्टोबर महिन्यात करावी.

अस्टरची लागवड निरनिराळ्या जमिनीमध्ये करतात. परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकास चांगली मानवते. काळी कसदार भारी व पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत रोपांची मर मोठया प्रमाणावर होते. निकास आणि हलक्या जमिनीत पिकाची वाढ खुंटते.

हेही वाचा : फुलांचे काढणी पश्चात व्यवस्थापन व गुणवत्तापूर्ण उत्पादन तंत्रज्ञान

जाती

अस्टरच्या पिकाची वर्गवारी ही झाडाची वाढीची सवय, फुलांचा आकार पाकळ्यांची संख्या व पाकळ्यांची ठेवण यानुसार केली जाते. अस्टरच्या वाढीनुसार त्यांचे उंच वाढणाऱ्या (७० ते ९० सें. मी.) मध्यम उंचीच्या (४० ते ६० सें. मी.) व बुटक्या (२० ते ४० सें. मी.) याप्रमाणे प्रकार पडतात.

अ) बॅंगलोर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था (आय. आय. एच. आर. ) यांनी विकसित केलेल्या जाती:- १) कामिनी २) पौर्णिमा ३) शशांक ४) व्हायलेट कुशन

ब) प्रादेशिक फळसंशोधन केंद्र, गणेशखिंड यांनी विकसित केलेल्या जाती:- १) फुले गणेश पिंक २) फुले गणेश परपल ३) फुले गणेश व्हाईट

क) परदेशी जाती:- १) ड्वार्फ क्विन २) पिनॅचिओ ३) अमेरिकन ब्युटी ४) स्टार डस्ट ५) जायंट ऑफ कॅलिफोर्निया ६) सुपर प्रिन्सेस

 

लागवड

अस्टर या पिकाची बियाण्याद्वारे करण्यात येते. बियाण्याची पेरणी केल्यानंतर ७ ते ८ दिवसांत बियाण्याची उगवण सुरु होते. बियाणाच्या उत्कृष्ट उगवणीसाठी सुमारे २० ते ३० से. इतक्या तापमानाची आवश्यकता असते. अस्टरच्या बियाण्यास विश्रांती कालावधी नसल्याने बियाणे फुलातून काढल्यानंतर ताबडतोब पेरले तरी उगवते.

हेही वाचा : पॉलिहाऊसमध्ये करा जरबेरा फुलांची लागवड; होईल लाखो रुपयांची कमाई

रोपवाटिका

अस्टरची रोपवाटिका तयार करण्यापूर्वी ३ X ९ मी. या आकारमानाचे व २० से. मी. उंचीचे सुमारे २० गादीवाफे करावेत. एक हेक्टर क्षेत्रास सुमारे २.५ ते ३.०० किलो बियाणे पुरेसे होते. प्रत्येक वाफ्यात ६० ते ७० ग्रॅम १९:१९:१९ रासायनिक खते व ८ ते १० किलो चाळलेले शेणखत चांगले मिसळून घ्यावे. या खतांबरोबरच प्रत्येक वाफ्यात ५ ग्रॅम प्रति चौरस मीटर या प्रमाणात फोरेट मिसळून घ्यावे. वरील सर्व खते व औषधे मिसळून वाफे भुसभुशीत करावेत व त्यांना व्यवस्थित आकार दयावा. १० से. मी. अंतरावर दक्षिण-उत्तर ओळी, खुरप्याच्या सहाय्याने ०.५ से.मी. खोल करून घ्याव्यात व त्यामध्ये बियाणे पेरावे. बियाणे पेरताना दोन बियाण्यातील अंतर २.५ से.मी. राहील याची काळजी घ्यावी.

पेरलेले बियाणे वस्त्रगाळ पोयटा माती, शेणखत व वाळू यांच्या २:१:१ या प्रमाणात मिश्रण करून या मिश्रणाने झाकावे. त्यावर रोज सकाळी व सायंकाळी झारीने अथवा शॉवरगनच्या साहाय्याने पाण्याचा हलका फवारा मारावा. बियाणे उगवून येईपर्यंत गादीवाफे, गवत, पालापाचोळा अथवा पोत्याच्या तडप्याने झाकून ठेवावे. वाफे नेहमी ओलसर म्हणजे वापसा अवस्थेत ठेवावेत. वापसा अवस्थेपेक्षा जास्त पाणी देऊ नयेत किंवा पाणी कमी देखील पडू देऊ नये. रोपे साधारणपणे २१ ते २५ दिवसात तयार होतात. तयार झालेली रोपे वाफे वापसा अवस्थेत असतानाच काढावीत. रोपे उपटताना मुळे तुटू देऊ नयेत.

लागवडीपूर्व तयारी

लागवडीपूर्वी जमिनीची २ वेळा खोल नांगरट करावी व २ ते 3 वेळा फणनी करावी. धसकटे व हरळीच्या काशा वेचून घेऊन जमीन स्वच्छ करावी. हेक्टरी २० ते २५ मे. टन शेणखत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. शेणखताबरोबरच प्रति हेक्टरी ९० कि. नत्र, १२० कि. स्फुरद व ६० कि. पालाश जमिनीत चांगले मिसळून घ्यावे व नंतर ६० सें. मी. अंतरावर सरी वरंबे तयार करावेत. त्यानंतर सऱ्यांची नाके तोडून पाणी पुरवठ्याच्या सोयीनुसार वाफे करून घ्यावेत.

लागवड

महाराष्ट्रात जमिनी चांगल्या मध्यम / भारी असल्यामुळे सरी वरम्ब्यावरच लागवड करावी. अस्टरची लागवड ६० X ३० सें. मी. किंवा ४५ X ३० सें. मी. अंतरावर करतात. सरी वरंबा पद्धतीने लागवड करताना वरंब्याच्या मध्यभागी लागवड करावी. रोपांची लागवड सायंकाळी ४ वाजेनंतर व भरपूर पाण्यात करावी, म्हणजे रोपांची मर होणार नाही.

आंतरमशागत

लागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी पहिली खुरपणी करावी. त्यावेळी नत्रयुक्त खताचा दुसर हप्ता प्रति हेक्टरी ९० किलो नत्र याप्रमाणे दयावा. खुरपणी बरोबरच अस्टर लागवड केलेल्या क्षेत्राची रानबांधणी देखील करावी. रानबांधणी करताना सुरुवातीला नत्र खत सरीमध्ये टाकावे व वरंबा अर्धा फोडून दुसऱ्या वरंब्यास रोपांच्या पोटाशी लावावा म्हणजे खत देखील मातीमध्ये बुजविले जाईल व झाडाला देखील मातीची भर मिळेल. रानबांधणी करताना रोप वरंब्याच्या मध्यावर येईल असे पाहावे. म्हणजे खोडाला मातीचा आधार मिळून फुले लागल्यानंतर झाड पडणार नाही.

 

खते

अस्टर या पिकाचे चांगले उत्पादन मिळण्याकरिता शेणखत भरपूर घालणे जरुरीचे आहे. त्याचप्रमाणे अस्टर झाडांची योग्य वाढ होऊन फुले दर्जेदार मिळण्यासाठी इतर तत्सम रासायनिक खतेदेखील वेळोवेळी घालणे जरुरीचे आहे. अस्टर पिकासाठी पुढीलप्रमाणे खतांची शिफारस करण्यात येत आहे.

English Summary: How to plant aster flowers, find out which are the exotic varieties Published on: 30 January 2021, 01:18 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters