तसेच पूर्नउत्पादन करतो ह्या प्रक्रियेस स्पोअर्स चे रुजणे अथवा जर्मिनेशन असे संबोधले जाते, स्पोअर्स जर्मिनेट होण्यासाठी, त्या स्पोअर्स च्या तशा अवस्थेस किती दिवस झालेत हे देखिल महत्वाचे असते. केवळ पोषक वातावरण मिळाले म्हणुन काही स्पोअर्स लागलीच सुप्तावस्था सोडुन जिवंत अशा अवस्थेत येत नाहीत. ह्या प्रक्रियेस स्पोअर्स ची मॅचुरिटि (Maturity) किंवा परिपक्वता असे म्हणतात. परिपक्व नसलेले स्पोअर्स हे तात्काळ रुजत नाहीत. त्याच प्रमाणे स्पोअर्स तयार होण्याच्या प्रक्रियेत कोणत्या पर्यावरणिय किंवा अन्नद्रव्याशी निगडित घटकांच्या किती तिव्रतेच्या प्रभावामुळे स्पोअर्स तयार झाले आहेत ह्यावर देखिल स्पोअर्स च्या आतिल जिवनावश्यक घटकांची उपस्थिती ठरत असते. ह्या प्रक्रियेस प्रवासाशी जोडता येईल. एखादे वेळेस अचानक प्रवास करण्याची वेळ आली तर अनेक जण घाईघाईत, मुक्कामाच्या ठिकाणी गरजेच्या असणाऱ्या अत्यावश्यक वस्तु विसरुन तसाच प्रवास सुरु करतात, तर काही जण अचानक उपस्थित झालेल्या परिस्थितीला शांतपणे तोंड देवुन गरजेच्या असलेल्या सर्व वस्तुंनी प्रवासाची बॅग भरुन त्यानंतर प्रवासाला सुरवात करतात. एकंदर परिपुर्ण असा स्पोअर किंवा सिस्ट हेच पुन्हा रुजण्याची क्षमता ठेवतात, ज्यामुळे बाजारातील सर्वच उत्पादने हि समान सी.एफ.यु. असुन देखिल एकसामान परिणाम दर्शवित नाहीत. स्पोअर्स किंवा सिस्ट चे तयार होणे, आणि ते पुन्हा जिवंत होण्यात सक्षम राहणे हि एक क्लिष्ट अशी प्रक्रिया आहे हेच यावरुन सिध्द होते. स्पोअर्स रुजण्याच्या प्रक्रीया पूढिल प्रमाणे आहेत. बुरशीच्या बाबतीत तयार होणारे स्पोअर्स हे पुनरुत्पादक असे बीज असल्या कारणाने त्यातील जिवंत होण्याचे प्रमाण हे जीवाणूंच्या प्रमाणे बाहेरिल परिस्थितीवर अवलंबुन राहत नाही.
पाणी किंवा जास्त आर्द्रतेत होणारी क्रिया (Imbibition)
सुप्तावस्थेत असलेल्या स्पोअर्स ला रुजण्यासाठी चालना देण्यात पाणी आणि काही वेळेस तापमान देखिल महत्वाची भुमिका पार पाडत असते. केवळ पाण्याची उपस्थिती असुन जर योग्य तापमान नाही मिळाले तर सप्तावस्थेतील स्पोअर्स रुजण्याची क्रिया रद्द देखिल करतात. ह्या पुर्ण प्रक्रियेस एक्टिव्हेशन असे म्हणतात.
ज्यावेळेस स्पोअर्स च्या आसपास जास्त प्रमाणात पाणी किंवा अती जास्त प्रमाणात आर्द्रता उपस्थित असते त्यावेळेस पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी असलेल्या स्पोअर किंवा सिस्ट द्वारे बाहेरील पाणी त्याच्या आत शोषुन घेतले जाते. असे करण्याने स्पोअर्स चा आकार वाढतो.
ह्या अवस्थेच्या पलिकडे परिपक्क स्पोअर्स गेल्यानंतर रुजण्याची प्रक्रिया हि पुन्हा रद्द करता येत नाही, रुजण्याच्या प्रक्रियेत जरी हानीकारक परिस्थिती निर्माण झाली तरी देखिल स्पोअर्स चे रुजणे हे नक्की असते. अशा हानीकारक परिस्थितीमुनळे सुप्तावस्थेतील स्पोअर्स रुजल्यानंतर जिवंत होण्याच्या प्रक्रियेत असलेली किंवा जिवंत झालेली पेशी हि मरण देखिल पावत असते.
परिपक्वता -
आपण आधीच बघितल्या प्रमाणे जो पर्यंत एक परिपुर्ण रित्या परिपक्व झालेला स्पोअर्स तयार होत नाही तोवर तो रुजत देखिल नाही. परिपक्व न झालेला स्पोअर्स देखिल वरिल टप्प्यात दर्शविल्या प्रमाणे पाणी ग्रहण करुन घेतो, मात्र त्याच्या पेशीच्या आतील कोणत्याही जिवनावश्यक प्रक्रियेस सुरवात करत नाही. असा पाणी ग्रहण केलेला स्पोअर्स हा देखिल सुप्तावस्थेत असलेला स्पोअर असाच गणला जातो.
सुप्तावस्था मोडणे-
पुर्णपणे परिपक्व झालेला स्पोअर हा पाणी ग्रहण केल्यानंतर, त्याच्या पेशीच्या आतील जिवनावश्यक क्रियेस सुरुवात करतो. ह्या प्रक्रियेस सुप्तावस्था मोडणे असे म्हणतात. स्पोअर च्या आत असलेल्या विविध अन्नद्रव्यांच्या वापर करुन नव्यानेच जिवंत झालेली पेशी काही काळ जिवंत राहु शकते. नव्याने जिवंत झालेल्या पेशीद्वारे तिची अन्नाची गरज भागविण्यासाठी आसपासच्या परिसरातील सहज वापरता येतिल अशी विद्राव्य अन्नद्रव्ये ग्रहण केली जातात. ह्या करीता आपण
आधीच बधितले की, डेक्सट्रोज बेस किंवा कॅरियर असलेली उत्पादने हि स्पोअर्च च्या रुजण्यानंतर नव्यानेच जिवनास सुरवात करणाऱ्या पेशी साठी सहज वापरता येतील असे अन्न देवू शकत असल्याने ईतर कॅरियर च्या तुलनेत जास्त फायदेशीर ठरतात.
ह्याच अवस्थेत बुरशीचे स्पोअर्स हे जर्म ट्युब तयार करतात. जर्म ट्युब म्हणजे नव्यानेच जिवंत झालेल्या पेशीव्दारे एक विशेष प्रकारची सोंड तयार केली जाते. हि जर्मट्युब सहसा स्पोअर च्या व्यासाच्या ईतकी लांब असते. जर्मट्यूब च्या टोकाशी नविन पेशी निर्मितीसाठी गरजेच्या असलेल्या सर्व वस्तु पोहचवल्या जातात. हि जर्म ट्युब, होस्ट म्हणजेच असा यजमान ज्याचे वर बुरशी
वाढणार असते त्याच्या पेशीच्या आत शिरते. होस्ट च्या आत शिरल्यानंतर मायसेलियम ची वाढ करुन, तेथिल अन्नरस ग्रहण करुन उपजिवीका करतात.
स्पोअर्स ने सुप्तावस्था मोडल्यानंतर त्यातील डिएनए निर्मिती, पेशी भित्तिका निर्मिती, प्रथिनांची निर्मिती, एन्झाईम्स ची निर्मिती ही पुर्ववत सुरु झालेली असते. ठराविक काळ गेल्यानंतर, बुरशी अगर जीवाणूच्या प्रकारानुसार त्यांचे पुर्नउत्पादन देखिल सुरु होते. अशा प्रकारे सुप्तावस्थेतुन बाहेर निघुन, नियमित रित्या आयुष्यास सुरवात करुन पुन्हा नविन प्रजा निर्माण करणा-या स्पोअर्स किंवा सिस्ट अगर यांना व्हायेबल (Viable) स्पोअस्स असे म्हणतात.
Share your comments