सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पावसाचा जोर वाढला असून पाऊस पडत आहे. अतिपावसामुळे बऱ्याचदा जमिनीत पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही, त्यामुळे पाणी शेतांमध्ये तुंबून राहते. त्याचा परिणाम बऱ्याच अंशी असा होतो की, पिकांना बुरशीचे लागून पिके पिवळी पडायला लागतात. दुसरेही अन्यथा बरीचशी कारणे बुरशीचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत असतात. बुरशीचा प्रादुर्भाव पिकांवर कसा होतो याची माहिती या लेखात आपण घेऊ. पिकांमधील अन्नद्रव्यांचा वापर बुरशीला स्वतःचे पोषण करण्यासाठी गरजेचे असते. हीच अन्नद्रव्य खाऊन बुरशीची वाढ होत असते. परंतु झाल्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव हा प्रकार होतो, त्याचे प्रकारचे चक्र असते. त्याची काम करण्याची पद्धत आपण समजून घेऊ.
वातावरणामध्ये बुरशीचे अनेक प्रकारचे बीजाणू असतात. झाडांच्या पानावर हे बीजाणू येऊन बसतात त्याच्यानंतर हे बीजाणू पानांवर स्थिर झाल्यानंतर ही बुरशी एक चिकट पदार्थ बाहेर टाकते. ज्यामुळे हे बीजाणू पानाला घट्ट चिकटून बसतात. परिणामी जोरदार पावसात देखील ही बुरशी पानांपासून वेगळी होऊ शकत नाही. यानंतर बुरशीची वाढ सुरू होते. जेव्हा हे बीजाणू झाडांमध्ये अन्नग्रहण करायला लागतात, त्याची सुरुवात सर्वप्रथम ते पानांमधील पाणी घ्यायला सुरुवात करतात. जेव्हा हे झाडांमधील पाणी ग्रहण केल्यानंतर या बीजाणूंपासून बुरशीची वाढवण्यास सुरुवात होते. जेव्हा या बी जाणूनपासून नवीन जन्माला आलेल्या बुरशीला अन्नाची गरज हे फार मोठ्या प्रमाणात असते. म्हणून ही बुरशी अन्न मिळवण्यासाठी बारीक धाग्यासारखे तंतू झाडावर सगळीकडे पसरवण्यास सुरुवात करतात. हे तंतू विशिष्ट प्रकारचे द्रव्य बाहेर टाकत असल्याकारणाने झाडाचा बुर्शी प्रादुर्भावित भाग खाण्यायोग्य होईल. त्याच्यामुळे पिकाला मोठ्या प्रमाणात इजा होते व त्याचे नुकसान होते.
या सगळ्या प्रक्रियेनंतर हे तंतू झाडाच्या आतील भागातील पानांमध्ये शिरतात किंवा झाडाला झालेली एखादी इजा किंवा पर्णछिद्रे यामधून ते आतील भागात प्रवेश करतात. यानंतर ही बुरशी पेशींच्या आत किंवा दोन पेशींच्या मधील भागातून वेगाने वाढायला सुरुवात होते. यालाच आपण बुरशीचा प्रादुर्भाव किंवा संसर्ग झाला असे म्हणतो. नंतर पूर्ण वाढ झालेली बुरशी नवीन बीजाणू तयार करते. हे बीजाणू पुन्हा पानाच्या पृष्ठभागावर तयार होतात. हेच बीजाणू पुन्हा हवेद्वारे इतरत्र उडवून नवीन झाडावर हल्ला करतात. हे चक्र असेच अखंड सुरू राहते म्हणून आपल्याकडे बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यास ती बुरशी कोणत्या अवस्थेत आहे, असा विचार करून स्पर्शजन्य किंवा अंतर प्रवाही बुरशीनाशक वापरणे फायद्याचे ठरते. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बुरशी येऊच नये. यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय योजने कधीही फायद्याचे ठरते.
Share your comments