शेती भारतातील एक प्रमुख व्यवसाय आहे. देशात सद्ध्या खरीपची काढणी चालू आहे तसेच रब्बी हंगामाच्या तयारीची लगबग सुरु आहे. भारतात गव्हाची लागवड ही मुख्यता रब्बी हंगामात केली जाते. एमपी, पंजाब, हरियाणा हे हिंदी भाषिक राज्य गहु उत्पादनात आपले वर्चस्व ऑलरेडी गाजवीत आहेत तसेच महाराष्ट्रात देखील गव्हाची मोठया प्रमाणात लागवड केली जात आहे
ह्याच पार्श्वभूमीवर कृषी जागरण आपल्यासाठी गव्हाच्या दोन सुधारित जातींची माहिती घेऊन आले आहे. कुठल्याही पिकाच्या यशस्वी उत्पादणासाठी त्या पिकाची जात/वाण एक महत्वपूर्ण भूमिका बजावते. पिकाच्या वाणावर त्या पिकाचे उत्पादन अवलंबून असते जर पिकाची जात ही चांगली दर्जेदार असेल तर मिळणारे उत्पादन हे चांगले मिळते शिवाय उत्पादनाची गुणवंत्ता ही चांगली असते. गव्हाच्या उत्पादनात देखील सेम असेच आहे चला तर मग जाणुन घेऊया गव्हाच्या ह्या दोन सुधारित जातीविषयी.
मित्रांनो आज आपण ज्या वाणांची माहिती जाणुन घेणार आहोत त्या जाती पुढील वर्षी गहु उत्पादक शेतकऱ्यांना उपलब्ध होतील अशी आशा आहे. भारतातील कृषी क्षेत्रात काम करणारी संस्था भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली यांनी गहू संशोधन परिषद इंदूरने विकसित केलेल्या गव्हाच्या HI-8823 (पुसा प्रभात) आणि HI-1636 (पुसा वाकुला) या दोन नवीन जाती शेतकऱ्यांसाठी जारी केल्या आहेत.
गव्हाची वाण HI-8823 ची विशेषता
गव्हाची ही एक सुधारित वाण आहे. ही कमी पाण्यात देखील चांगले बम्पर उत्पादन देण्यास सक्षम आहे. त्यामुळे ज्या भागात कमी पाऊस असतो त्या भागासाठी ही एक उत्तम गव्हाची वाण सिद्ध होणार आहे. ह्या जातीची उंची ही गव्हाच्या इतर जातीपेक्षा कमी आहे त्यामुळे ही दोन ते तीन पाणी दिल्यानंतर काढणीसाठी तयार होते. पसात पेरणीसाठी ही वाण योग्य असल्याचे सांगितले जात आहे. ह्या जातीच्या गव्हात जस्त, लोह, तांबे, व्हिटॅमिन ए आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असल्याने हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरणार असे तज्ञाचे म्हणणे आहे.
HI-8823 ह्या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे, ह्या जातीची लागवड ही दुष्काळग्रस्त आणि गरम हवामाणात केली जाऊ शकते. ह्या जातीच्या गव्हाच्या लोब्या ह्या वेळेवर पिकतात म्हणजे हे काढणीसाठी लवकर तयार होते. गव्हाची ही वाण काढणीसाठी 105 ते 138 दिवसात तयार होते. ही वाण दोन तीन वेळेस पाणी भरताच म्हणजे जवळपास दीड महिन्यात तयार जाऊ होऊ शकते. ह्या जातीच्या उत्पादनाचा विचार केला तर हेक्टरी 40-42 क्विंटल उत्पादन देण्यास ही वाण सक्षम आहे. ही जात रोगप्रतिरोधक व किडप्रतिरोधक आहे. ह्या जातींचे गव्हाचे दाणे हे टपोरे आणि तपकिरी-पिवळे असतात.
HI-1636 वाणीची विशेषता
गव्हाची वाण HI-1636 (पुसा वाकुला) ही जास्त पाणी असलेल्या भागासाठी विकसित केली गेली आहे. ह्या जातीच्या गव्हाची पेरणी ही हिवाळ्यात करावी. 7 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान ह्या वाणीची पेरणी करण्याचा सल्ला दिला जात आहे. गव्हाच्या या जातीला 4 ते 5 वेळेस पाणी भरण्याची गरज भासते. खाण्यासाठी ही जात चविष्ट आहे. ह्या जातीत लोह, तांबे, जस्त, प्रथिने सारखे पोषकतत्वे भरपुर आहेत त्यामुळे आरोग्यासाठी उत्तम आहे. गव्हाची ही वाण 118 दिवसात काढणीसाठी तयार होते. ह्या जातींचे उत्पादन 60-65 क्विंटल/हेक्टर एवढे दमदार असल्याचे सांगितले जात आहे.
Share your comments