पिकांमधील तण हे पीक वाढीच्या दृष्टीने एक मोठी समस्या असते. पिकांमधील तणाचे प्रमाण जास्त असेल तर त्याचा परिणाम हा पिकाच्या उत्पादन वाढीवर होतो. त्यामुळे योग्य पद्धतीने आणि वेळेत तण नियंत्रण करणे हे गरजेचे असते. तणनियंत्रणासाठी शेतकरी अनेक प्रकारचे प्रयोग करताना दिसतात. खुरपणी किंवा तणनाशकाच्या वापराने तणनियंत्रण हे प्रामुख्याने केले जाते.
तसेच पीक पेरणी करण्याअगोदर देखील मशागत करून तण नियंत्रित करण्यात येते. परंतु बऱ्याचदा मशागत करून देखील तन हे उगवून येतेच त्यामुळे पिकांची वाढ नीट होत नाही.त्यामुळे त्यांचा वेळीच बंदोबस्त करणे फार गरजेचे असते. त्याकरिता योग्य पद्धतीने तणनाशकांचा वापर करावा. त्यासंबंधीची माहिती या लेखात घेऊ.
तणनाशकांची निवड
- उत्पादनवाढीचे अनुषंगाने तणांचे व्यवस्थापन ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे.
- आतापर्यंत पीक उगवून आल्यावर सणाचा नियंत्रणाबाबत उपाय योजना केली जात होती. पण आता पीक उगवण्यापूर्वी तनांचे नियंत्रण केले जाते.
- पेरणीनंतर पीक उगवणीपूर्वी एकदल पिकांमध्ये ऍट्राझीन, द्विदल पिकासाठी पेंडीमेथिलिन तणनाशके वापरावीत.
- उभ्या पिकातील तण नियंत्रणासाठी सुद्धा तणनाशकांचा वापर करता येतो.
- त्यासाठी पिकांचा वर्ग माहीत असणे आवश्यक आहे.
उद्या पिकामध्ये जर तणनाशकांचा चांगला परिणाम मिळवायचा असेल तर तन हे दोन ते चार पानांवर असताना तर नाशकाची फवारणी करावी
पिकनिहाय तणनाशके
- जेव्हा तुम्हाला तननाशक फवारायचे असेल तेव्हा जमिनीत पुरेसा ओलावा असावा. फवारणीसाठी पाठीवरील साधा स्प्रे पंप वापरावा.
- इतर पिकांवर फवारणीचा अंश जाऊ नये यासाठी वाऱ्याचा वेग कमी असताना फवारणी करावी.
- हरभरा हे पीक उगवण्यापूर्वी पेंडीमेथिलिन अडीच लिटर हे तणनाशक प्रति हेक्टरी 300 लिटर पाण्यात मिसळून फवारावे लागणार आहे.
- फवारणी केल्यानंतर ही सहा आठवड्यांनी खुरपणी ही शेतकऱ्यांना करावी लागणार आहे.
मका
वेळ-पीक उगवणीपूर्वी ऍट्राझीन (50 डब्ल्यू पी ) 1000 ग्रॅम हे 300 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी क्षेत्रावर फवारणी करता येते. रब्बी हंगामातील कांद्याच्या उगवणीपुर्वी किंवा लागवडीपूर्वी ऑक्सीफ्लोरफेनएक लिटर किंवा पेंडीमेथिलिन अडीच लिटर हे 300 लिटर पाण्यात मिसळून एका हेक्टरवरील क्षेत्रावर फवारणी करावी लागणार आहे. मात्र फवारणी करूनही सहा आठवड्यांनी पुन्हा कांद्याचे खुरपणी ही करावीच लागणार आहे.
करडई
यावर्षी करण्याच्या क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे. करडई उगवण्यापूर्वी ऑक्सिफ्लोरफेनएक लिटर हे तन नाशक 300 लिटर पाण्यात मिसळून एक हेक्टर वरील पिकावर फवारणी करता येणार आहे.
यामुळे पीक उगवून येईपर्यंत तण नियंत्रणात येईल.पण पुन्हा पेरणी नंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी करावी लागणार आहे.
पेरणीपूर्वी फवारणी चे फायदे
पेरणीपूर्व फवारणीचे प्रमाण आता वाढत आहे. कारण पूर्वी पिकांची उगवण होण्यापूर्वी तन वाफतहोते. त्यामुळे खुरपणी वर अधिकचा खर्च करूनही पीक जोमात येत नव्हते.पण आता पेरणीपूर्व तणनाशकाची फवारणी केली जात आहे. यामुळे अधिकचा खर्च होत असला तरी पिकांची वाढ जोमाने होते. शिवाय पेरणी नंतर काही काळ खुरपणी करण्याची आवश्यकता भासत नाही.
( संदर्भ- हल्लो कृषी )
Share your comments