औषधी वनस्पतींची लागवड हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करण्याची गरज पडत नाही या माध्यमातून तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवू शकता. आज कालच्या परिस्थितीचा विचार केला तर नैसर्गिक उत्पादनांना खूप मागणी आहे. अनेक औषधी या कंपन्या करारावर औषधी वनस्पतींचे लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देतात. या लेखात आपण या हरबल फार्मिंग बद्दल माहिती घेऊ.
यांना आहे सर्वाधिक मागणी
आपण पाहतो की, नैसर्गिक औषधे आणि उत्पादनांना नेहमीच मोठ्या प्रमाणात मागणी असते. जर आपण विचार केला तर प्रत्येक घरामध्ये हर्बल उत्पादने वापरले जातात. या हर्बल उत्पादनांसाठी तुळशी, कोरफड, मुळे, कुठ,कुटकी, करंजा, कपिकाचूआणि शंखपुष्पी यासारख्या गोष्टींची गरज असते. या वनस्पती मधील काही वनस्पती ची लागवड भांड्यांमध्ये ही करता येते. अशा वनस्पतींची आपण आपल्या घरात किंवा प्लॉटमध्ये सहजपणे वाढवू शकतो. टेरेस वर कुंड्यांमध्ये लागवड करता येते. यासाठी आपल्याला हजारांमध्ये खर्च येतो. या माध्यमातून आपण लाखो रुपये कमवू शकता. सध्या आपल्याकडे अनेक कंपन्या ही पिके घेण्याची आणि खरेदी करण्याचे करार करतात.
भारतातील हर्बल उत्पादनांची बाजारपेठ
इकॉनोमिक टाइम्स अहवालानुसार, आपल्या भारतामध्ये हर्बल प्रोडक्ट बाजारपेठ सुमारे 50 हजार कोटी रुपयांचा आहे. दरवर्षी त्यामध्ये 15% दराने वाढ होत आहे. परंतु अजूनही आपल्याकडे पेरणी खालील क्षेत्र खूपच कमी आहे.
या माध्यमातून होणारी कमाई
या सर्व हरबल उत्पादनांच्या लागवडीच्या माध्यमातून भरपूर कमाई होते. यामध्ये तुळशीचा विचार केला तर तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यात युजेनॉल आणि मिथाइल सिनामेंट असतात. जे कर्करोगावर औषध बनवण्यासाठी वापरले जातात.एका हेक्टर वर तुळस पिकविण्यासाठी फक्त पंधरा हजार रुपये खर्च येतो. परंतु तीन महिन्यानंतर हे पीक सुमारे तीन लाख रुपयांना विकले जाते. तसेच अतिश नावाचे एक औषधी वनस्पती आहे. या औषधी वनस्पतीची लागवड केल्यास एकरी अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न सहज मिळू शकते.
ही वनस्पती आयुर्वेदिक औषधांमध्ये मुख्यता वापरली जाते. याशिवाय लव्हेंडर ची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति एकर एक लाख वीस हजार ते एक लाख 50 हजार रुपये सहज मिळतात.लव्हेंडर पासून तेल काढले जाते. तसेच त्यापासून विविध सुगंधी उत्पादने तयार केली जातात. या सगळ्या हरबल वनस्पतींच्या लागवडीसाठी पतंजली, डाबर, वैद्यनाथ सारखा आयुर्वेदिक औषधे बनवणारी कंपनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतात.
तुम्ही येथून घेऊ शकता प्रशिक्षण
तुम्ही या पिकांच्या लागवडीचे प्रशिक्षण सेंट्रल इन्स्टिट्यूट अप मेडिसिनल अंड ॲरोमॅटिक प्लांट लखनऊ येथून घेऊ शकता. या संस्थेच्या माध्यमातून अनेक फार्मास्युटिकल कंपन्या देखील तुमच्याशी करार करतात.
Share your comments