आपल्या शेतजमिनीचे आरोग्य जर उत्तम असेल तर त्यातील जिवाणू आणि पिकांच्या आरोग्य उत्तम राहते. त्यामुळे आपल्या जमिनीच्या आरोग्यास महत्त्व देणे ही काळाची गरज आहे.
आपल्या राज्यातील विभागानुसार प्रत्येक हंगामात विविध प्रकारची पिके घेण्यात येतात यामध्ये तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य,भाजीपाला पिके, फुल पिके तसेच फळपिकांचा समावेश होतो.
पिकांची पेरणी करताना ज्या पिकास आपल्याला हमखास आणि चांगला बाजारभाव मिळेल याचा विचार प्रथम करून पिकांची पेरणी करताना सर्व प्रक्रियांमध्ये पिकांची फेरपालट या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.
जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी पिक फेरपालट आवश्यक….
ज्या पिकांना चांगला बाजारभाव मिळतो. आता आपले चुकते कुठे!आपण शेतीमध्ये तेच ते पिके एकाच क्षेत्रातून घेतो. त्यामुळे जमिनीचा कस हमखास कमी होऊन तिची उत्पादन क्षमता कमी झाली की पिकांचे उत्पादन कमी मिळते. त्याचबरोबर पिकांवर काही रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढतो व पीक त्यास हमखास बळी पडते. यासाठी पिकांची फेरपालट करणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे जादा उत्पादन मिळवण्यासाठी जमीन मुळात उत्पादनक्षम असणे गरजेचे आहे. जमिनीस दोन ते तीन वर्षातून एका वेळेस सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा पुरवठा केल्याने पिकांची उत्पादकता मिळत नाही. तसेच जमिनीकडून पिकांचे चांगले उत्पादन मिळवण्यासाठी जमिनीला वरचेवर गरजेनुसार आणि पिकांच्या वाढीच्या अवस्थे प्रमाणे सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक खतांचा पुरवठा करणे आवश्यक असते. याच सोबतच पिकांचे योग्य प्रकारे नियोजन करून म्हणजेच योग्य पद्धतीने पिकांची फेरपालट करून जमिनीचे आरोग्य टिकवणे आवश्यक आहे. जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी पिकांची फेरपालट करताना पुढील बाबी विचारात घेणे गरजेचे आहे.
पिकांची फेरपालट करताना लक्षात ठेवण्याजोग्या बाबी..
वर्षातून किमान एकदा जमिनीची मशागत करून एक महिना जमीन उन्हात तापू देणे तसेच जमिनीची शक्यतो हिवाळ्यात मशागत करून म्हणजेच खोलगट नांगरट करून मातीचा खालचा थर पृष्ठभागावर आणि पृष्ठभागावरील माती खोलीवरील थरात केली म्हणजेच जमिनीची उलथापालथ केली असता, जमिनीमधील खोलवर असलेल्या किडींचे कोष उघडे पडतात. पक्षी हे कोश खातात. हे कोश उनात उघडे पडल्यामुळे त्यातील किडींचे अवशेष मरतात आणि एकात्मिक कीड नियंत्रण द्वारे किडींचा बंदोबस्त होतो. त्याशिवाय मातीचे कण उन्हामुळे तापतात आणि पावसाच्या पहिल्या सरी बरोबर मातीच्या कणांचे विघटन होऊन त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात. त्यासाठी वर्षातून एकदा जमीन किमान एक महिना चांगल्या कडकउन्हाततापवणे गरजेचे आहे. पिकांची फेरपालट करत असताना ही बाब प्राधान्याने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
जमिनीच्या आरोग्यासाठी वर्षातून एकदा हिरवळीच्या खतांची पिके घेणे आवश्यक..
खरीप हंगामाच्या सुरुवातीला आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीस किंवा हंगामाच्या शेवटी आणि उन्हाळी हंगामाच्या सुरुवातीस किंवा पाण्याच्या उपलब्धतेनुसार ताग, धैचाआणि चवळी यासारखी जलद वाढणारी आणि कमी कालावधीत भरपूर वाढ होऊन हिरवा पाला देणारी हिरवळीच्या खतांची पिके जमिनीमध्ये घेणे आवश्यक आहे.
दोन हंगामाच्या मध्ये पहिल्या पिकांची काढणी झालेली असते आणि पुढील हंगामाच्या पिकांची पेरणी व्हावयाची असते. एवढ्या कालावधीत हिरवळीच्या पिकांची पेरणी केल्यास आणि हिरवळीचे पीक फुलावर येण्यापूर्वी जमिनीत गाडले अस मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळले जातात. त्यामुळे जमिनीचा पोत आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते. तसेच जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंचा खाद्य मिळाल्याने त्यांची संख्या वाढते आणि उपलब्ध नसलेली अन्नद्रव्य पुढील पिकांना उपलब्ध होतात.
आंतरपीक पद्धतीचा किंवा मिश्रपीक पद्धतीचा अवलंब करणे..
लागवड करण्यात येणाऱ्या म्हणजेच पेरणी करण्यात येणाऱ्या सर्व पिकांची वाढ व त्यांची अन्नद्रव्ये घेण्याची पद्धत एकसारखे नसते. काही पिकांची मुळे तंतुमय असतात व ती जमिनीच्या पृष्ठभागापासून जास्तीत जास्त 90 सेंमी खोलीपर्यंत जातात. तेवढ्याच खोलीवर अन्नद्रव्ये शोषून घेतात. त्यामुळे शेतामध्ये पिकांची पेरणी करताना एकाच प्रकारच्या पिकांची पेरणी न करता दोन किंवा अधिक वेगवेगळ्या पद्धतीने मुळांची वाढ होणार या पिकांचीम्हणजे तृणधान्य सोबत कडधान्य किंवा गळीत धान्य पिकांची आंतरपीक पद्धतीने किंवा मिश्र पीक पद्धतीने शिफारशीनुसार पेरणी करावी.
एकाच क्षेत्रात दोन हंगामात एकाच वर्गातील पिके न घेता भिन्न वर्गातील पिकांची पेरणी करणे….
तृणधान्य पिके हवेतील नत्र शोषून घेत नाहीत. तर कडधान्य पिके हवेतील नत्र शोषून घेतात, गळित धान्य पैकी भुईमुगाचे पीक हवेतील नत्र शोषून घेते. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी पिकांची फेरपालट करताना हवेतील नत्र शोषून नघेणाऱ्या पिकानंतर हवेतील नत्र शोषून घेणाऱ्या पिकांची लागवड करावी.
त्यामुळे जमिनीतील प्रमुख अन्नद्रव्यांचे पातळी कायम राखले जाऊन पिकांची वाढ चांगली होते.
जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी जमिनीचा सतत वापर आवश्यक…..
जमीन ही भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांनी बनलेली आहे. त्यामधील रासायनिक आणि जैविक गुणधर्मांनी बनलेली आहे. त्यामधील रासायनिक आणि जैविक क्रिया जमिनीमध्ये हवा आणि पाणी यांच्या सारखे प्रमाण असताना मोठ्या प्रमाणात होतात. जमिनीतील सर्व पोकळ्या पाण्याने भरल्यास जीवाणू गुदमरतात आणि त्यांची क्रिया थांबते तर सर्व पोकळ्या हवेने भरल्यासजमिनीत ओलावा नसल्याने जिवाणू मरतात. या दोन्ही प्रक्रियेत पिकांना अन्नद्रव्ये उपलब्ध न झाल्यामुळे पिकांची वाढ होत नाही. यासाठी जमिनीत हवा आणि पाणी यांचे प्रमाण सारखे असणे गरजेचे आहे. पिकांची चांगली वाढ होणे व जादा उत्पादन मिळण्यासाठी जमीन सतत वापर अवस्थेत ठेवावी.
लेखक
मिलिंद जे.गोदे
मो.नं.-9423361185
Share your comments