इम्युनिटी (Immunity) पांढऱ्या रक्तपेशी, लिम्फ नोड्स आणि एंटीबॉडीज यांच्या मार्फत बनलेली असते. मजबूत इम्युनिटीसाठी शरीराला वायरस, बॅक्टेरियल, फंगल किंवा Protozoan यांचा संसर्ग होण्यापासून संरक्षण मिळतं. तर इम्युनिटी बाहेरच्या संक्रमणापासून शरीराचं बचाव करण्यास मदत करत असते. आपली इम्युनिटी (Immunity) कमी आहे? कशी ओळखावी? पहा सविस्तर.
इम्युनिटी कमी झाल्याची ही लक्षणं आहेत –
1) सतत थकवा येणं –
रात्री 7-8 तासांची झोप घेतल्यावर प्रत्येकाला सकाळी खूप उत्साही वाटते. परंतु ज्याची इम्युनिटी (Immunity) कमी आहे, त्यांना रात्री पुरेशी झोप घेऊनही दुसऱ्या दिवशी खूप सुस्ती येते. यावर एक उपाय म्हणजे व्यायाम किंवा योगासनं. या दोन्हीमुळे शरीरातील एनर्जी लेव्हल वाढते.
ताण घेतल्याने पांढऱ्या रक्त पेशी आणि लिम्फोसाइट्सची संख्या कमी होते.
2) दीर्घकाळ सर्दी-खोकला
प्रौढ व्यक्तींना वर्षातून 2-3 वेळा सर्दी होणं सामान्य आहे. परंतु काही लोकांमध्ये, सर्दी जास्त काळ राहते किंवा वारंवार होते.
3) पोटासंदर्भातील समस्या
जर एखाद्याचं पोट खराब असेल तर त्याचं आरोग्य कधीही चांगले राहू शकत नाही. आपल्या शरीरातील सुमारे 70% इम्युनिटी वाढवणाऱ्या ऊती आपल्या आतड्यात असतात. जर तुम्हाला सतत अतिसार, सूज येणं, बद्धकोष्ठता या पोटाच्या समस्या होत असतील तर ते कमकुवत इम्युनिटीचं लक्षणं आहे.
4) अधिक ताणतणाव
जर एखाद्याने जास्त ताण घेतला तर त्याची इम्युनिटी कमी होते. ताण घेतल्याने पांढऱ्या रक्त पेशी आणि लिम्फोसाइट्सची संख्या कमी होते. त्यामुळे तणावापासून दूर राहणं फायदेशीर आहे.
5) जखम भरण्यास उशीर
दैनंदिन काम करताना दुखापत होणं सामान्य असतं. मात्र जर दुखापतीदरम्यान झालेली जखम बरी होण्यास जास्त वेळ लागत असेल तर ते कमकुवत इम्युनिटीचं लक्षण असू शकतं.
Share your comments