सध्या च्या काळात शेतीमध्ये मोठे बदल घडून आले आहेत आणि शेती सुद्धा एक कमर्शियल व्यवसाय बनत चालला आहे. बळीराज्याने सुद्धा पीक पद्धती मध्ये खूप बदल केले आहेत. वाढते उत्पन्न आणि बक्कळ होणारा नफा यामुळे शेतकरी नवनवीन पिकांची लागवड करून भरघोस नफा मिळवत आहे. सुरवातीच्या काळापेक्षा सध्या च्या स्थितीला भुसार पिके अत्यंत कमी प्रमाणात घेतले जाते.काशीभोपळा या पिकाचे उत्पादन दोन्ही हंगामात घेतले जाते. कमी वेळात आपण या पिकाची लागवड करून लाखो रुपये कमवू शकतो. या साठी आवश्यक लागवड प्रक्रिया आणि व्यवस्थापन याचबरोबर मार्केट चा अभ्यास सुद्धा खूप गरजेचा असतो. या हंगामी पिकाचा कालावधी हा 3 महिन्यांचा असतो. शिवाय या 3 महिन्यांच्या काळात एक एकर क्षेत्रामधून आपण लाखो रुपये कमवू सुद्धा शकतो.
ही एक वेलवर्गीय फळभाजी आहे शिवाय सणासुदीच्या काळात या फळाला बाजारात प्रचंड मागणी सुद्धा असते. त्यामुळे जर का योग्य व्यवस्थापन केले तर यापासून बक्कळ फायदा आपल्याला मिळू शकतो. गोड पदार्थ निर्मितीसाठी याचा वापर केला जातो शिवाय शरीरासाठी आवश्यक असलेली जीवनसत्त्वे यामध्ये मुबलक प्रमाणात असतात.
अशी करा लागवड:-
काशीभोपळा या पिकाचा कालावधी हा 3 महिन्यांचा आहे. त्यामुळे काशी भोपळा लागवडीच्या आधी शेताची मशागत करणे खूपच गरजेचे आहे. शेत नांगरून घ्यावे आणि शेतातील माती भुसभुशीत करून घ्यावी शिवाय शेतामध्ये बेड वाफे तयार करून त्यावर बियांची लागवड करावी. त्यानंतर खतांचा एक डोस द्यावा त्यामुळे ते अधिकच पोषक होतात. त्यानंतर शेताची खुरपणी करावी आणि खत घालावे. आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
काशीभोपळ्यात आढळणारे पोषक घटक:-
काशी भोपळा आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो कारण यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये अ, क आणि इ ही जीवनसत्त्वे आढळतात.याचबरोबर काशी भोळ्यामध्ये प्रथिने, प्रोटीन, कर्बोदके, कॉपर, पोटॅशिअम, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम हे पोषक घटक सुद्धा आढळतात जे की आपल्या आरोग्याला खूप फायदेशीर ठरत आहेत. चकाशीफळाचे सेवन केल्यास हृदयाचे व डोळ्याचे आरोग्य चांगले राहते. याचबरोबर पचनक्रिया चांगली सुधारते, शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. आणि थकवा कमी होण्यास मदत होते.
दोन्ही हंगामात लागवड करणे शक्य:-
आपल्याला उन्हाळी आणि खरीप हंगामात सुद्धा या काशी भोपळ्याचे उत्पादन घेता येते. म्हणून आपण वर्ष्यातून 2 वेळा काशी भोपळ्याचे उत्पन्न घेऊ शकतो. परंतु पाण्याचे योग्य व्यवस्थापन असेल तरच हे पीक घ्यावे. या पिकाचा कार्यकाळ हा 3 महिन्यांचा असल्यामुळे कमी कष्ट करून आपण यामधून अधिक चे उत्पन्न मिळवू शकतो.
Share your comments