1. कृषीपीडिया

चिंता सोडा! सागाची लागवड करून एकरात कमवा कोट्यावधी रुपये

सागाचे लाकूड आपल्याला सर्वांना माहिती आहे. सगळ्या लाकडाच्या प्रकारांमध्ये सागाचे लाकूड जास्त महाग आणि मजबूत असते. तसेच औषध निर्मितीमध्ये सुद्धा सागा चा उपयोग केला जातो. सागाचे लाकूड हे दीर्घकाळ टिकते तसेच बाजारात याची मागणी नेहमीच राहते. जर एका आकडेवारीनुसार विचार केला तर देशात दरवर्षी 180 कोटी घनफूट सागवानी लाकडाची आवश्यकता असते. परंतु दरवर्षी फक्त 90 दशलक्ष लाकडाची पूर्तता होते. विशेष म्हणजे सागवान लागवडीत जोखीम फारच कमी आहे आणि नफा उत्तम मिळतो.या लेखात आपण साग लागवड विषयी माहिती घेऊ.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
greens(saag)tree

greens(saag)tree

 सागाचे लाकूड आपल्याला सर्वांना माहिती आहे. सगळ्या लाकडाच्या प्रकारांमध्ये सागाचे लाकूड जास्त महाग आणि मजबूत असते. तसेच औषध निर्मितीमध्ये सुद्धा सागा चा उपयोग केला जातो. सागाचे लाकूड हे दीर्घकाळ टिकते तसेच बाजारात याची मागणी नेहमीच राहते. जर एका आकडेवारीनुसार विचार केला तर देशात दरवर्षी 180 कोटी घनफूट सागवानी लाकडाची आवश्यकता असते. परंतु दरवर्षी फक्त 90 दशलक्ष लाकडाची  पूर्तता होते. विशेष म्हणजे सागवान लागवडीत जोखीम फारच कमी आहे आणि नफा उत्तम मिळतो.या लेखात आपण साग लागवड विषयी माहिती घेऊ.

साग लागवड

सागाची लागवड पडीक डोंगर उताराला केल्यास यातून शेतकऱ्यांना भरपूर नफा मिळतो. सागाच्या झाडांची लागवड केल्यास भविष्यात मोठा आर्थिक स्त्रोत उपलब्ध होऊ शकतो. इमारती, फर्निचर व औद्योगिक अशा नित्य उपयोग वस्तूंसाठी  सागाच्या लाकडाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. लाकडाचा आकर्षक रंग व त्यात असलेला चिवटपणा, तास कामासाठी उत्तम, पाण्यात अधिक काळ टिकून राहण्याची क्षमता इत्यादी गुणधर्मामुळे सागाच्या लाकडासफार महत्व आहे.

साग लागवडीसाठी आवश्यक जमीन

 सागाच्या झाडाच्या वाढीसाठी जमिनीचा सामू साडेसहा ते साडेसात असावा. चहा पेक्षा कमी सामू असेल तर सागाची झाडे दिसत नाहीत. तसेच जमिनीचा सामू हा साडे आठ पेक्षा अधिक असेल तर झाडांची वाढ व्यवस्थित होत नाही. तसेच सागाला जांभ्या खडकाची जमीन मानवत नाही. अशा जमिनीत झाडे खुरटी राहतात. तसेच काळी जमीन देखील सागाच्या झाडाला मानवत नाही. चुन्याच्या खडकाचेखोलपोयटा  जमिनीत रूपांतर झालेले असल्यास ही झाडे जमिनीत चांगली वाढतात. पुण्याच्या टणक खडकातील उथळ जमिनीत या झाडांची वाढ कमी होते. सागाच्या झाडाची वाढ ही प्रामुख्याने जमिनीची सुपीकता, खोली, जमिनीतील ओलावा आणि निचरा इत्यादींवर अवलंबून असते.

साग लागवडीच्या पद्धती

  • बियांचीपेरणी मध्य प्रदेश आणि उत्तर महाराष्ट्रात शेतातील खड्ड्यात सागाचे बी पेरतात. एका खड्ड्यात दोन किंवा तीन बिया टोकतात. पण या पद्धतीमध्ये सागाची बारीक रोपे मरतात व अनेक ठिकाणी गॅप पडतो.
  • रोपांची किंवा कलमांची लागवड- महाराष्ट्र, मध्य प्रदेशात काही भाग व ओरिसातील शेतात सागाची रोपे लावतात. सागाची रोपे रानात तयार करतात किंवा नर्सरीतून आणतात. रोपांचे वय आहे तीन चार महिने आणि उंची 30  सेंटीमीटर वाढलेली शेतात लागवडीसाठी योग्य होतात.
  • खोड स्टंपांची लागवड नर्सरी मधुन एक याकरिता योग्य नसलेली रोपे वाफ्यात जागीच वाढू देतात. पुढील वर्षी या रोपापासून स्टंप तयार करतात. लागवडीसाठी निवडलेल्या स्टंपच्या च्या मुळ्या सरळ असावेत.दुभागलेल्या नसाव्यात. सिंचनाकरिता पाणी उपलब्ध असल्यास 15 महिन्याच्या रोपापासून स्टम्प तयार करता येतात.

आवश्यक हवामान

सागाच्या झाडाच्या वाढीसाठी तेजस्वी सूर्यप्रकाश आवश्यक असतो. या झाडांना पाणी तळजमीन सहन होत नाही. तसेच जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त प्रमाणात मानवत नाही. वार्षिक 1000 ते 1500 मी पर्जन्यमानाच्या प्रदेशात दक्षिणेतील उष्ण, दमट पानझडीचे जंगलात वाढतात. या झाडांना जून ते ऑगस्ट महिन्यात फुले लागतात. नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात झाडांची पाने गळतात तेव्हा जंगलातील जमिनीवर वाळलेल्या पानांचा दाट थर जमलेला असतो उन्हाळ्यात पानेकुजून झाडांना नैसर्गिक खत मिळते. सागाच्या बियांवरील कवच मऊ करून अंकुर येण्यास सुलभ करण्यासाठी पावसाळ्यात मोकळ्या जागेत बियाणी पसरून दररोज खालीवर करावे लागते.चार ते सहा आठवड्यांनंतर बियांवरील कवच मऊ होऊन बी रुजण्यास मदत होते. जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर दोन बाय दोन मीटर अंतरावर  30 बाय 30 बाय 30 सेंटिमीटर आकाराचे सेंटी मीटर आकाराचे खड्डे खोदून त्यामध्ये लागवड करावी. लागवड केल्यानंतर रोपाच्या व स्तंपस च्या बाजूला पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. सागाची वाढ चांगली होण्यासाठी प्रति रोपाला दहा ग्रॅम नत्र व दहा ग्रॅम स्फुरद आळे पद्धतीने द्यावे. लागवड केल्यानंतर दोन वर्षांपर्यंत पाणी देणे गरजेचे आहे. नियमित पाणी व वर्षातून तीन वेळा खते दिल्यास सागाची वाढ जोमाने होते.

 सागाची काढणी व उत्पादन

 सागाच्या झाडांचा मध्य प्रदेश, महाराष्ट्र, अंदमान, आंध्र प्रदेश,गुजरात,कर्नाटक इत्यादी राज्यांचा अभ्यास केला असता भारतात सागाच्या झाडांची फेरपालट स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असते.

भारतातील सागाच्या पहिल्या प्रतीच्या जागेतून 50, 70 व 80 वर्षे वयाच्या झाडापासून अनुक्रमे 417 घनमीटर, 510 व 539 घनमीटर लाकूड मिळते. छातीच्या उंचीपर्यंत सागाच्या खोडाचा व्यास साठ सेंटीमीटर असल्यास 26 मीटर, 35 मीटर व 50 मीटर उंच झाडापासून अनुक्रमे 2.10 घनमीटर,2.861 घनमीटर व 4.115 घनमीटर लाकूड मिळते.

 लागवड अंतर

 उत्कृष्ट  प्रतीचे लाकूड मिळवण्यासाठी सागाच्या दोन ओळीतील अंतर चार मीटर आणि दोन झाडातील अंतर दोन मीटर ठेवावे. म्हणजे एक हेक्टर जमिनीत 1250 सागाची झाडे लागवड करता येतात. सुरूवातीला सागाच्या शेतातील रोपातील 1.8×1.8 मीटर अंतर योग्य मानतात.जास्तव मध्यम पावसाच्याप्रदेशात रोपाचे अंतर 2.5×2.5 किंवा 2.7×2.7 ठेवल्याने वाढ जलद होते आणि झाडाचा मुकुट लवकर तयार होतो.

English Summary: greens cultivation process and earn crore rupees in acre Published on: 09 October 2021, 11:39 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters