भारतातील अर्थव्यवस्था हि शेतीवर अवलंबून आहे म्हणुन आपल्या देशाला कृषिप्रधान देश म्हणुन तमगा प्राप्त आहे. शेती व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे पिकांची निवड, जर बारामाही मागणी असणाऱ्या पिकाची लागवड केली तर शेतीतुन चांगले उत्पन्न हे प्राप्त केले जाऊ शकते. आज आपण अशा पिकांच्या लागवडिविषयी जाणुन घेणार आहोत ज्याची मागणी हि हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात असते शिवाय संपूर्ण वर्षभर ह्या पिकाची मागणी हि बनलेली असते.
ह्या पिकाची लागवड करण्यासाठी केंद्र सरकार देखील प्रोत्साहन देते, अनुदान देते. आम्ही अद्रक लागवडिविषयी बोलत आहोत, अद्रक लागवड करून शेतकरी बांधव चांगली कमाई करू शकतात. अद्रकचा वापर चहा मध्ये केला जातो तसेच मसाल्यात, लोणचे बनवण्यासाठी इत्यादी ठिकाणी अद्रकचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. एवढेच नाही तर अद्रक औषधी गुणांनी भरपूर आहे त्यामुळे याची मागणी हि कायम बनलेली असते चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणुन घेऊया अद्रक शेतीविषयी सविस्तर.
अद्रक चा वापर हा भारतीय स्वयंपाकघरात कॉमन आहे. चहापासून तर भाजीपर्यंत सर्व्या ठिकाणी अद्रक वापरला जातो. अद्रक ची शेती शेतकऱ्यांसाठी नफ्याचा सौदा ठरू शकते. अद्रक लागवड हि कंद लावून केली जाते. बेसिकली अद्रकच्या मोठे मोठे कंद निवडले जातात आणि त्यांना अशा पद्धतीने कट केले जाते की एका तुकडयात दोन ते तीन अंकुर हे राहतील. अद्रक लावण्याआधी शेतीची पूर्वमशागत करणे महत्वाचे ठरते त्यासाठी शेत हे दोन तीन वेळा चांगले नांगरून घ्यावे लागते. जेणेकरून जमीन हि चांगली भुसभूशीत होईल. नागरणी झाल्यानंतर शेतात चांगल्या क्वालिटीचे शेणखत हे टाकले गेले पाहिजे त्यामुळे अद्रक उत्पादनात वाढ घडून येते.
कशी केली जाते अद्रक शेती
भारतात अद्रकची लागवड हि पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. अद्रकची लागवड हि फळबाग पिकात आंतरपीक म्हणुन देखील केली जाते. पपईसारख्या फळबाग पिकात जास्तकरून अद्रक लावले जाते. एक एकर अद्रक लागवडीसाठी 1 ते 1.5 टन अद्रक कंद लागतात असे सांगितले जाते. अद्रक लागवड हि बेड तयार करून करण्याचा सल्ला कृषी वैज्ञानिक देतात. सारंग मधून पावसाचे पाणी सहज वाहून जाते त्यामुळे शेतात पाणी साचत नाही.
आल्याची लागवड हि ज्या जमिनीत पाणी साचते अशा शेतात करू नये, त्यामुळे अद्रक पिकाचे मोठे नुकसान होते. अद्रक पिकासाठी अशा जमिनीची निवड करावी ज्या जमिनीचा pH 6 ते 7 दरम्यान असतो.
अद्रक लागवडीसाठी ओळीपासून ओळीचे अंतर हे 30 ते 40 सें.मी आणि रोपपासुन रोपचे अंतर हे 20 ते 25 सें.मी. असावे असे सांगितले जाते. अद्रक टोपनी करतांना चार ते पाच सेंटीमीटर खोलीवर कंद टोपावेत आणि कंदवर हलकी माती किंवा शेणखत टाकून कंद झाकून टाकावे. अद्रक साठी ठिबक पद्धतीने पाणी भरावे. त्यामुळे पाण्याची बचत होते आणि पिकाला हानी पोहचत नाही, तसेच ठिबक केल्याने पिकाला लिक्विड देखील सहजरीत्या देता येते.
Share your comments