ज्वारी पिकासाठी महाराष्ट्रातील हवामान पोषक असल्यामुळे उत्पादन व क्षेत्रही चांगल्या प्रकारे आहे. खरीप व रब्बी या दोन्ही हंगामामध्ये ज्वारीचे पीक घेतले जाते. जनावरांना उत्तम चारादेणारे हे पीक असल्यामुळे जनावरांवर अवलंबून असणारी ज्यांची शेती आहेअशा ठिकाणी ज्वारीचा पेरा अधिक केला जातो.
सध्या जगभरात ज्वारीचे क्षेत्र भारतात पहिल्या क्रमांकाच्याआहे.मात्र उत्पादनामध्ये आपला क्रमांक दुसरा आहे.रब्बी ज्वारी तिच्या उत्पादनात सोलापूर जिल्हा प्रथम असून त्यानंतर अहमदनगर व पुणे जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. अशा या महत्त्वपूर्ण पिकावर काहीरोगांचा प्रादुर्भाव होऊन अतोनात नुकसान होते.या लेखामध्ये आपण ज्वारी पिकावरीलकाही महत्त्वाच्या रोगांविषयी माहिती व त्यांचे नियंत्रण कसे करावे याबद्दल माहिती घेणार आहोत.
- रोगांची ओळख:
- दाण्यावरील बुरशी:-(ग्रेन मोल्ड)
रोगाची लक्षणे :- या रोगातबुरशी संक्रमणामुळे दाणे पांढरट किंवा गुलाबी होतात. रोगाला कारणीभूत बुरशीमुळे त्यासकाळा रंग येतो.
रोगामुळे होणारे नुकसान :- ज्वारी फुलोरा अवस्थेत अथवा दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना सतत पाऊस असल्यास खरीप हंगामात दाण्यांवरील बुरशी रोगाचा प्रादुर्भाव उद्भवतो. यामुळे ज्वारीच्या दाण्यांचा रंग बदलतो.( पांढऱ्या व करड्या रंगाचा ) व जास्त प्रमाणात संसर्ग झाल्यास दाणे काळे पडतात. त्यामुळे दाण्यांचे वजन घटते. दाण्यांचा आकार लहान होतो.उत्पन्नात100 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. तसेच दाण्याची उगवणशक्ती कमी होते. बुरशी रोगाची लागण झालेली ज्वारी खाल्यास जनावरांना विषबाधा होतो
- रोगाचे नियंत्रण :-
- हमखास पाऊस येण्याच्या काळात परिपक्व होणारे ज्वारीचे वाण पेरणीसाठी वापरू नयेत.
- पिकपावसात सापडून नुकसान होऊ नये म्हणून शारीरिक दृष्ट्या पक्वतेच्या 12-15 दिवसात कापणी करावी.
- पीक फुलोरा अवस्था सुरू असताना कॅप्टन किंवा मॅन्कोझेब तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. गरजेनुसार दहा दिवसांच्या अंतराने पुढील फवारणी करावी.
- कणसावरील चिकटा :-
- रोगाची लक्षणे :-
- कणसाच्या फुलाच्या गुच्छातून मधासारखा चिकट द्रव्यस्रवूनसंपूर्ण कणीस काळे पडते. या चिकट द्रव यामध्ये या रोगाची असंख्य बिजेअसतात. या रोगास साखऱ्याअसेही म्हणतात.
- परागीकरण न केलेले मादी वाण संपूर्णपणे या रोगास बळी पडून दाणे भरण्यावर विपरीत परिणाम होतो.
- रोगाचे नियंत्रण :- या रोगाच्या नियंत्रणासाठी बांधावरील दुय्यम पोशिंदया वनस्पती (उदा. बहुवार्षिक गवत)नष्ट कराव्यात.
- रोगाचा प्रसार बियाणे मार्फत होतो रोगग्रस्त शेतीतील बी वापरण्यापूर्वी तीस टक्के मिठाच्या द्रावणातून काढावे.(10 लिटर पाणी अधिक 3 किलो मीठ ) पाण्यावर तरंगणारे हलके व पोचट, बियाणे काढून टाकावे. नंतर बियाणे स्वच्छ पाण्यात धुऊन,वाळवून पेरणीसाठी वापरावे. किंवा बियाण्यास थायरम ( 75% ) या बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
- रासायनिक नियंत्र:-ती 50 टक्के फुलोरा अवस्था सुरू झाल्यानंतर 15 दिवसांच्या अंतराने थायरम दोन ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारावे पुढील फवारणी गरजेनुसार करावी.
- काणीकाजळी :-
1)दाणे कानी :-ज्वारीच्या कणसात दाणे भरणे या ऐवजी तेथे काणीयुक्त दाणे तयार होतात. हे काणीयुक्त पांढरे जाणे टोकास निमुळती असून फोडली असता त्यातून काळीभुकटी पडते.हे विषाणू बियांवर चिटकून शेतात पोचतात. ज्वारीच्या मुळावाटे ताटात प्रवेश करतात.
2) मोकळी काणी:- यामुळे रोगग्रस्तताटा मध्ये लवकर फुलोरा अवस्था येते. त्यात अनेक फुटवे येतात. कणीस अतिशय मोकळेअसून सर्व बीजांडात हा संसर्ग होतो.
3)लॉगस्मर्ट :- हा कणसावरील फुलकळी अवस्थेत प्रतिबंध करतो याचा प्रसार मुख्यत: हवेद्वारे होतो. संसर्गित बिजूकाशय पुंज हे मोकळीकानी पेक्षा मोठे आणि रुंद असतात
4) हेड स्मर्ट :- याद कनिस अंशत: वा पूर्णत: मोठ्या पांढरट पापुद्रेनेवेस्टीलेले असते. या रोगामुळे ज्वारीचे कणसात दाणे भरणे ऐवजीकणसाचा आकार बदलतो.त्या ठिकाणी काळा केसांचा गुच्छ तयार होतो. म्हणून याला शेतकरी ‘काळा’ गोसावी म्हणतात.
- रोगाचे नियंत्रण:- पेरणीपूर्वी शिफारसीनुसार बीज प्रक्रिया करावी. किंवा गंधकाची पाच ग्रॅम प्रतिकिलो बीजप्रक्रिया केल्यास हा रोग टाळता येतो
- खडखड्या रोग :-
हा रोग बुरशीमुळे होतो हलक्या जमिनीवरील कोरडवाहू रब्बी ज्वारीचे पीक या रोगास मोठ्या प्रमाणावर बळी पडते. या रोगाची लागण पीक फुलोरा अवस्थेत असताना किंवा त्यानंतरच्या काळात ताटाच्या जमिनीलगतच्या दुसर्या किंवा तिसर्या कांड्याला होते रोगग्रस्त कांडे आतून पोकळ होतात. अशा कांड्यांचा उभा छेद घेतला असता मध्ये फक्त काळे धागे आढळून येतात.
अशी रोगग्रस्त झाडे वाऱ्यासोबत हलताना खडखड असा आवाज करतात. म्हणून या रोगास खडखड्या रोग असे म्हणतात. अशा झाडांच्या कणसात दाणे बरोबर भरत नाहीत. रोगग्रस्त झाडे जनावरांनी खाल्ल्यास त्यांच्या आरोग्यास धोका संभवतो. या रोगामुळे धान्य उत्पादनात घट तर होतेच त्याच बरोबर कडब्याची प्रत सुद्धा खराब होते.
- नियंत्रण:-
- पिकाची फेरपालट करावी.
- हलक्या जमिनीवर जिरायती रब्बी ज्वारी पेरणी करताना खडखड्या रोगास प्रतिकारक्षम जातीचा वापर करावा.
- पीक फुलोरा अवस्थेत असताना शक्यतो पाण्याची एक पाळी द्यावी.
- खताचीयोग्य मात्रा दिल्यास या रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी करता येतो.
- हमखास खडखड्या रोगाचा प्रादुर्भाव होणाऱ्या भागात स्युडोमोनासक्लोरोरॅफिसया जीवाणूजन्य घटकाची बीज प्रक्रिया करावी.
Share your comments