1. कृषीपीडिया

हिरवळीचे खत जमिनीचा पोत सुधारत वाढवेल सुपीकता

जमिनीमध्ये हिरवी वनस्पती अथवा पाने, कोवळ्या फांद्या, इत्यादी भाग पुरले असता त्याचा जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी उपयोग होतो. यालाच हिरवळीचे खत असे म्हणतात . हिरवळीच्या खतांमुळे जमिनीचा पोत सुधारतो , सुपीकता वाढते, तसेच जमिनीच्या भौतिक गुणधर्मात , जमिनीची घडण , पाण्याचा निचरा करण्याची क्षमता, पाणी धारणक्षमता, इत्यादी मध्ये उत्पादकता वाढते . तसेच जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
हिरवळी खताचे फायदे

हिरवळी खताचे फायदे

जमिनीमध्ये हिरवी वनस्पती अथवा पाने, कोवळ्या फांद्या, इत्यादी भाग पुरले असता त्याचा जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी उपयोग होतो. यालाच हिरवळीचे खत असे म्हणतात . हिरवळीच्या खतांमुळे जमिनीचा पोत सुधारतो , सुपीकता वाढते, तसेच जमिनीच्या भौतिक गुणधर्मात , जमिनीची घडण , पाण्याचा निचरा करण्याची क्षमता, पाणी धारणक्षमता, इत्यादी मध्ये उत्पादकता वाढते . तसेच जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते.

हिरवळीच्या खताचे दोन प्रकार आहेत:

१. जागेवरच हिरवळीचे खत करणे. उदाहरणार्थ: ताग, धैंचा, चवळी इत्यादि पिके शेतात पिकवून ती पूर्णपणे जागीच गाडतात .

२.हिरवळीची पाने, फांद्या जमिनीत गाडणे. उदाहरणार्थ: गिरीपुष्प, सुबाभूळ,यासारख्या वनस्पती बांधांवर वाढवून त्यांच्या फांद्या कापून जमिनीत गाडतात.

हिरवळीच्या खताचे फायदे :

१. जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढते .

२. हिरवळीच्या खतासाठी वापरलेल्या वनस्पतींनी जमिनीपासून घेतलेली मूलद्रव्ये जमिनीतच परत केली जातात.

३. जमिनीचा पोत सुधारतो.

४. जमिनीचा निचरा सुधारतो .

५. हिरवळीच्या खतामुळे मूलद्रव्यांचा निचरा कमी होतो .

६. हवेतील नत्राचे स्थिरीकरण होते व जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढते.

७. जमिनीतील स्फुरद, कॅलसिम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, इत्यादी मुद्रव्यांची उपलब्धता वाढते.

 

हिरवळीच्या खताचे तोटे :

१. पाण्याची उपलब्धता भरपूर असल्यास जागीच गाडावयाच्या हिरवळीच्या खतांमुळे एका पिकाचा हंगाम वाया    

   जातो.

२. हिरवळीच्या खताचा खर्च रासायनिक नत्रयुक्त खतांपेक्षा अधिक असू शकतो.

३. जमीन कोरडी राहिल्यास हिरवळीचे खत चांगले कुजत नाही. त्यामुळे पुढील पिकाची उगवण चांगली होत नाही.

४.पुरेश्या पाण्याअभावी हिरवळीच्या पिकाची वाढ चांगली होत नाही.

५. रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो.

६. रासायनिक खताइतका प्रतिसाद मिळत नाही.

७. हिरवळीची पिके आंतरपीक म्हणून घेतल्यास मुख्य पिकावर अनिष्ट परिणाम होती.

८. हिरवळीची पिके फुलावर येण्यापूर्वी कापली गेली नाहीत तर त्याचा हवा तो परिणाम दिसत नाही.

 हिरवळीची पिके कशी असावीत ?

१. हिरवळीचे पीक द्विदलवर्गीय असावे व त्याच्या मुळावर  

    गाठी असाव्यात .

२. त्या पिकाची पाण्याची गरज कमी असावी .

३.त्या पिकाच्या  मुळ्यांची  वाढ चांगली  असावी.

४. त्याला भरपूर पाने असावीत

५. ते पीक लवकर कुजणारे असावे व त्यात भरपूर  

    ओलावा व नत्राचे प्रमाण असावे.

६. ते रोग व किडींस प्रतिकारक्षम असावे.

हिरवळीच्या पिकातून मिळणारे नत्र:

                        तक्ता १: निरनिराळ्या हिरवळीच्या पिकातून मिळणारे खत

पिकाचे नाव

(क्विंटल /हे.)

हिरव्या पाल्याचे उत्पन्न

(क्विंटल /हे.)

ओल्या अवस्थेत नत्राचे शेकडा प्रमाण %

एकूण मिळणारे नत्र  (किलोग्रॅम / हेक्टर )

ताग

212

0.43

91

धैंचा

202

0.42

86

मूग

80

0.53

42

चवळी

150

0.49

74

गवार

200

0.34

68

बरसीम

144

0.43

67

शेवरी (शुष्क अवस्थेत )

250

2.4

156

 

लेखक :

तेजश्री अ. शिरोळकर

  (सहाय्यक प्राध्यापिका )

  राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सांगली.

अजय शा. सोळंकी

  (सहाय्यक प्राध्यापक )

  कृषी महाविद्यालय कौंधारा, जि. यवतमाळ

अजय डि. शेळके

  (सहाय्यक प्राध्यापक )

  डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय , बुलढाणा

रेश्मा ग. पोंडकुले

  (सहाय्यक प्राध्यापिका )

  कृषी महाविद्यालय , बारामती

English Summary: Green manure improves soil texture, increases fertility Published on: 25 June 2021, 10:56 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters