1. कृषीपीडिया

औधषगुणी अद्रकची शेती: चांगल्या उत्पादनासाठी करा अशी लागवड

KJ Staff
KJ Staff
छायाचित्र  लोकसत्ता

छायाचित्र लोकसत्ता


आले या वनस्पतीची लागवड पौराणिक काळापासून केली जाते. आल्यातील विशिष्ट चव व स्वाद यामुळे दररोजच्या जेवणातील मसाल्यात आल्याचे महत्वाचे स्थान आहे. भारत हा देश फार पूर्वीपासून मसाल्याच्या पिकांचा देश म्हणून ओळखला जातो. मसाल्यांच्या पिकांमध्ये मिरी, दालचिनी, वेलची, लवंग, आले, हळद इ. पिकांना मानाचे स्थान आहे. भारतामध्ये आल्याचा वापर कमी -जास्त प्रमाणात सर्वत्र केला जातो.  दरम्यान आल्याची लागवड ही जम्मू -काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत केली जाते. केरळ, ओडिसा, मेघालय, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये आल्याची मोठी लागवड केली जाते. देशात घेतलेल्या जाणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी ४० टक्के उत्पादन हे केरळ आण मेघालयात घेतले जाते.

 दरम्य़ान महाराष्ट्रातही हे पीक आता घेतले जात असून व्यापारी पीक म्हणून याकडे पाहिले जात आहे. . राज्यात प्रामुख्याने सातारा, सांगली, रायगड, ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यामध्ये आल्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. खानदेश व विदर्भातही आल्याची लागवड आता केली जात आहे.आल्याचे आयुर्वेदातील स्थान महत्त्वाचे आहे. आल्याचा वापर मुख्यत: सर्दी, खोकल्यावरील औषधे तसेच पेय बनविण्यासाठी, जैविक किटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे आल्याचे महत्त्व दिवसेंदिवास वाढत आहे. आल्याचा वास व तिखटपणा आल्हाददायक असतो. आले पाचक असल्याने अनेक पदार्थात आल्याचा उपयोग करतात. आल्याचा किंवा सुंठीचा काढा पाच मिनिटे पाण्यात उकळून करतात. या उष्ण पेयामुळे रक्ताभिसरणात सुधारण होते. सर्दी, पडसे नाहीसे होते. डोकेदुखी थांबते. आल्यात जंतुनाशक व उत्तेजक गुणधर्म आहेत.

अतिसारावर आल्याच्या रसाचा बेंबीवर लेप करावा. आल्याचा रस व मध समप्रमाणात बाटलीमध्ये साठवून २ -२ चमचे २ वेळा घेतल्यास सर्दी, खोकला पडसे व स्वरभंग बरे होतात. अजीर्ण झाल्यास आल्याचे रसात लिंबाचा रस व मीठ घालून पाणी प्यावे. आले तोंडात ठेवताच लाळग्रंथी सक्रिय होतात. लाळ पाझरू लागते. आल्याचे सेवनाने पोटात गॅस तयार होत नाही.  अशा औषधी पिकाच्या लागवडीविषयी आपण माहिती घेऊया.

आल्यासाठी अद्रकासाठी उष्ण व दमट प्रकारचे हवामान चांगले असते. पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम काळी भुसभुशीत जमीन आले पिकास फार उपयुक्त ठरते.

लागवड करण्याची वेळ

आले  अद्रक संपूर्ण मे महिना आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात केल्यास उत्पादनात वाढ होते.

सुधारीत वाण  वरदा, रियो डी जानेरो,

हिमगीरी, सुरुची

सुप्रिया, सुरभी

व्यानाड, माहीम

जर आपल्याला अद्रकाचे तेल काढायचे असेल तर एरनाड, चेरनाडू, चायना, कुरुप्पमपाडी, रिओ- डी- जानिरिओ या वाणांची लागवड करावी. महाराष्ट्रातच रिओ-डी-जानिरिओ, माहीम, स्थानिक या नावाने ओळखले जाणाऱ्या अद्रकची शेती केली जाते.  तर काही जाती बाहेरच्या देशातून आयात केल्या आहेत. त्यामध्ये रिओडी जानरो, चायना, जमेका या जातींचा समावेश होतो.

बीजप्रक्रिया

किडीचा व बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बीजप्रक्रिया करावी.

बीजप्रक्रियेसाठी १०० ग्रॅम कार्बेन्डाजिम + क्विनोल्फोस प्रति १०० लिटर पाण्यात चांगले ढवळून द्रावण करुन घ्यावे. नंतर त्यात १५ मिनीट आल्याचे बेने भिजत ठेवावे. यासर्व प्रक्रियेनंतर बेणे  सावलीत सुकून घ्यावे.

  लागवड करण्याची पध्दत

   सरी वरंबा पध्दतीने ३० x २२.५ सेमी अंतरावर लावावे.

 खत व्यवस्थापन

आले या पिकास हेक्टेरी ५०किलो नत्र २५ किलो स्पुरद आणि  २५ किलो पालाश या प्रमाणात द्यावे लागते.  या शिफारस केलेल्या मात्रेपैकी संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. अर्धे नत्र लागवडीच्या ३० दिवसानंतर व उरलेले अर्धे नत्र त्यानंतर ६० दिवसांनी द्यावे.  पिकाच्या आवश्यकतेनुसार दर ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.

 अंतरमशागत

 आले या पिकासाठी शेत तणविरहित राहणे फार महत्वाचे आहे.यासाठी २-३वेळा निदान /खुरापणी करणे फार आवश्यक आहे.  कंद जमीनीत वाढत असल्यामुळे झाड़ांना मातीचे भर देने आवश्यक असते. त्यासाठी ४५आणि ९० दिवसानी पिकास मातीची भर द्यावी.

 पिक कालावधी व काढणी - आले साधारण २५०-३०० दिवसात तयार होते. पिकाची ५०% पेक्षा पाने पिवळी पडून सुकू लागले की समजावे की पिक काढणीस आले आहे. काढणीच्या वेळी कंदाला कोणतीही जाऊ नये याची दक्षता घ्यावी. प्रति हेक्टरी १०० ते १५० क्विंटल ओल्या आल्याचे उत्पादन मिळते,.


Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters