1. कृषीपीडिया

अद्रक लागवड करा आणि मिळवा बक्कळ उत्पन्न, जाणुन घ्या अद्रक लागवडीविषयी

भारत हा शेतीप्रधान देशाचा तमगा मिरवतो, आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही देखील शेतीवर आधारित आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था ही पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. देशातील 60 टक्के जनसंख्या ही शेतीवर आधारित आहे. शेतकरी बांधव आता पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देताना दिसत आहेत, तसेच आधुनिकीकरणाचे कास धरून शेती क्षेत्राकडे बघत आहेत. आता अनेक सुशिक्षित युवा शेतकरी शेतीकडे वळले आहेत, युवा शेतकरी शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून चांगले मोठे उत्पन्न पदरी पाडत आहेत. शेतीत कालानुरूप बदल घडवून आणणे हे महत्त्वाचे असते, तसा बद्दल शेतकरी घडवताना दिसत आहे. आता अनेक शेतकरी नगदी पिकांची लागवड करत आहेत, तसेच अनेक शेतकरी औषधी वनस्पतींची लागवड करून चांगले मोठी कमाई करत आहेत. आज आपण अद्रकच्या लागवडीविषयी जाणून घेणार आहोत, अद्रक लागवड करून शेतकरी बांधव चांगली मोठी कमाई करू शकतात. आद्रक ला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते याचा उपयोग चहा पासून भाजी पर्यंत तर लोणच्यामध्ये देखील केला जातो. अद्रकला संपूर्ण वर्षभर मोठ्या प्रमाणात मागणी असते शिवाय याला बाजार भाव देखील चांगला प्राप्त होतो. अद्रकला विशेषतः हिवाळ्यात जास्त मागणी असल्याचे बघायला मिळते. अद्रक लागवडीतून इतर पिकांच्या तुलनेत अधिक उत्पन्न कमावले जाऊ शकेल. तसेच याच्या शेतीला प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकार द्वारे मदत देखील दिली जाते. चला तर मग मित्रांनो आज आपण जाणून घेऊया अद्रकच्या लागवडीविषयी ए टू झेड माहिती.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
ginger crop

कशी केली जाते अद्रकची शेती

अद्रक ची लागवड पूर्णता पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. याची लागवड ही पपईच्या बागेत किंवा इतर दुसऱ्या फळबागेत केली जाऊ शकते. तसेच याचे स्वातंत्र्य लागवड देखील केली जाऊ शकते. अद्रक ची लागवड करण्याचा जर आपला विचार असेल तर आपणास हेक्‍टरी दोन ते तीन क्विंटल अद्रकच्या कंदाची गरज पडेल. अद्रक ची लागवड हे सरी पद्धतीने केली जाऊ शकते. ज्या जमिनीत पावसाचे पाणी जास्त प्रमाणात साचते त्या जमिनीत आद्रक लागवड केली जाऊ शकत नाही. अद्रकची लागवड ज्या जमिनीत करायची आहे त्या जमिनीचा पीएच म्हणजेच मातीचा पीएच हा सहा ते सात दरम्यान असावा. अद्रकची लागवड प्रामुख्याने कंदाद्वारे केली जाते.

लागवडीची पद्धत

अद्रक ची लागवड करताना बियाणे ते बियाणे पंचवीस सेंटीमीटर चे अंतर असावे. तसेच सरि ते सरी 30 ते 40 सेंटीमीटर चे अंतर असावे. तसेच अद्रक सेकंड हे चार ते पाच सेंटीमीटर खोलवर रुजले जावेत. त्यानंतर त्यावर माती किंवा शेणखत टाकावे.

किती येतो खर्च

अद्रक चे पीक हे जवळपास नऊ महिन्यांनी काढणीसाठी तयार होते. असे सांगितले जाते की जर समजा एक हेक्टर क्षेत्रात अद्रक ची लागवड केली गेलेली असेल तर त्या क्षेत्रातून 200 क्विंटलपर्यंत अद्रकचे उत्पादन हे मिळू शकते. एक हेक्‍टर अद्रक लागवडीसाठी लागवडीच्या दिवसापासून ते काढणी पर्यंत जवळपास आठ लाख रुपये खर्च येऊ शकतो.

किती राहतो नफा

असे सांगितले जाते की, अद्रक ला 80 रुपये प्रति किलोने बाजार भाव मिळतो, जर आपण फक्त 60 रुपये प्रति किलो बाजारभाव पकडला तरी एका हेक्‍टरमध्ये 200 क्विंटल अद्रक चे उत्पादन होते म्हणजे एका हेक्टरमध्ये 25 लाख रुपयांची कमाई केली जाऊ शकते यात खर्च वजा केला असता 15 लाख रुपये हेक्‍टरी निव्वळ नफा राहू शकतो.

English Summary: ginger cultivation is profitable do ginger cultivation and earn more money Published on: 25 December 2021, 10:45 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters