शेतकरी आता परंपरागत पिके सोडून विविध प्रकारची नगदी पिके मोठ्या प्रमाणात घेऊ लागले आहेत. त्यामध्ये विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड, विदेशी भाजीपाला तसेच फळ पिकांमध्ये स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रुट आणि एवढेच नाही तर सफरचंदाचा प्रयोग देखील बऱ्याच भागात शेतकरी यशस्वी करताना दिसत आहेत.
आता जर आपण फुलशेतीचा विचार केला तर यामध्ये विविध प्रकारच्या फुलांचा समावेश करता येतो. यामध्ये शेवंती, गुलाब, झेंडू, अस्टर, कार्नेशन आणि जरबेरा इत्यादी फुलांचा समावेश होतो. यामध्ये आपण जर जरबेरा फुल लागवडीचा विचार केला तर फुल शेती शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. अगदी कमी खर्चा मध्ये चांगले उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता या फुलशेती मध्ये आहे. जरबेरा फुलांच्या लागवडीसाठी तर झारखंड राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना विविध प्रकारे चांगले प्रोत्साहन देण्यात येत असून त्या माध्यमातुन शेडनेट, ठिबक इत्यादी मोफत दिली जात आहे. या लेखात आपण जरबेरा फुल शेती विषयी माहिती घेऊ.
30 बाय 30 चे शेडनेटमध्ये चांगली कमाई होणे शक्य
फुलांना देशात आणि विदेशातून चांगली मागणी असल्यामुळे त्यामध्ये जरबेरा फुलांना खूप मागणी वाढली आहे. जरबेरा फुल दिसायला अतिशय आकर्षक व सुंदर असून त्यामुळे चांगल्या किमतीत त्याची विक्री करता येते. जरबेरा फुलांची चांगली मागणी पाहता शेतकऱ्या कडून मोठ्या प्रमाणात जरबेरा लागवड वाढत आहे. आयुर्वेदिक औषधे तसेच सजावटीसाठी या फुलाचा मोठा उपयोग होतो.
लागणारे हवामान
जरबेरा फूल लागवडीसाठी समशीतोष्ण हवामान आवश्यक असते. याच्या लागवडीसाठी हिवाळ्यात सूर्यप्रकाश आणि उन्हाळ्यामध्ये हलकी सावली लागते. जर शेडनेटमध्ये लागवड केली तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. जरबेरा लागवडीसाठी कमाल तापमान 20 ते 25 अंश सेंटिग्रेड असणे आवश्यक आहे.या तापमानामध्ये ही फुले योग्य प्रकारे विकसित होतात. त्यामुळे शेडनेटमध्ये जरबेरा लागवड करणे फायद्याचे ठरते. जर आपण जमिनीचा विचार केला तर कुठल्याही प्रकारच्या जमिनीत लागवड करता येते. वालुकामय मुद्दा असेल तर खूपच उत्तम. त्यासोबतच चिकन माती मध्ये देखील हे चांगले वाढते. यासाठी मातीचा पीएच हा पाच ते 7.2 यादरम्यान असणे महत्वाचे आहे.
लागवडीआधी पूर्वमशागत
जरबेरा फुलाच्या 70 पेक्षा जास्त जाती असून त्यापैकी काही जाती या व्यवसायिक लागवडीसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये फ्लोरिडा, फ्रेडकिंग, फ्लेमिंगो,डस्टी इत्यादी जाती व्यवसायिक दृष्टीने महत्त्वाचे आहेत. इतर पिकांप्रमाणेच पूर्वमशागत करताना जुन्या पिकांचे अवशेष शेतातून उचलून नष्ट करावे व चांगली नांगरट करावी. त्यानंतर शेती तसेच पडू द्यावे व त्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत मिसळून दोन ते तीन वेळा तिरप्या पद्धतीने शेततळे करावे व शेतात पाणी घातल्यानंतर तीन ते चार दिवस तसेच ठेवावे.
त्यानंतर पुन्हा नांगरणी करावी जेणेकरून शेतीची माती चांगली भुसभुशीत होईल. जरबेरा फुलांची लागवड आणि बीज लागवड अशा दोन्ही पद्धतीने करता येते. ठिबक सिंचन पद्धतीने या पाण्याची व्यवस्था राहिली तर खूप महत्त्वाचे आहे. जरबेरा ला दररोज सिंचनाची आवश्यकता असते. या पार्श्वभूमीवर झारखंड राज्य सरकार जरबेरा लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत ठिबक, मल्चिंग पेपर, अर्धा एचपी मोटर पंप आणि शेडनेट प्रदान करत आहे.
जरबेरा फुलशेती मधून नफ्याचे गणित
जरबेरा लागवडीपासून नव्वद दिवसात फुले यायला सुरुवात होते. पिकाला फुलोरा सुरू झाल्यानंतर एक महिन्यात दहा वेळा फुले तोडणे शक्य आहे. शेतकरी 3200 ते 3300 जरबेराची रोपे 30 बाय 30 मीटर शेडनेट मध्ये लावू शकतात. इतक्या रोपांच्या माध्यमातून शेतकरी प्रत्येक तोड्याला सातशे ते आठशे फुले तोडू शकतात. जर आपण झारखंड राज्याचा विचार केला तर बाजारात एका फुलाची किंमत 50 ते 60 रुपये आहे.
एका दिवसात 700 फुले आली तर शेतकरी तीन हजार पाचशे रुपयांच्या फुले एका दिवसात विकू शकतात. त्याचप्रमाणे महिन्यातील दहा दिवसाची कमाई पस्तीस हजार रुपये असेल. त्याच्या लागवडीसाठी पाच हजार रुपये खर्च येतो अशाप्रकारे निव्वळ नफा तीस हजार रुपये आहे. 30 बाय 30 मीटर शेडनेटमध्ये शेती करून शेतकरी सहा महिन्यात 1 लाख 80 हजार रुपये कमवू शकतो.(स्त्रोत-किसानराज)
महत्वाच्या बातम्या
Share your comments