भारतात आता शेतकरी बांधव पारंपरिक पिकपद्धतीला फाटा देत आहेत. आणि नगदी पिकांची लागवड करताना दिसत आहेत. देशात आता औषधी वनस्पतींच्या लागवडीला शेतकरी बांधव पसंती देताना बघायला मिळत आहे, तसेच या पिकांच्या लागवडीतून शेतकरी बांधवांना चांगला मोठा नफा देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका औषधी वनस्पती विषयी जाणून घेणार आहोत याची लागवड शेतकरी बांधवांसाठी फायद्याची ठरू शकते. आज आपण जिरेनियमच्या शेती विषयी जाणून घेणार आहोत, चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया आहे जिरेनियम शेती विषयी.
जिरेनियम विषयी थोडक्यात माहिती
जिरेनियम एक औषधी वनस्पती आहे, जिरेनियम ची फुलं औषधे उपयोगात आणली जातात. याची फुले ही खूप सुगंधित असतात. जिरेनियम च्या झाडाला गरिबाचे गुलाब असे म्हणून देखील संबोधले जाते. या कोरोना नामक महाभयंकर आजारापासून बाजारात आयुर्वेदिकऔषधांची मागणी कमालीची वाढली आहे. जिरेनियम च्या फुलांपासून तेल काढले जाते, हे तेल आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण असते, त्यामुळे तेलाची बाजारात मोठी मागणी बघायला मिळते. जिरेनियमच्या तेलाला अगदी गुलाबाच्या फुला सारखा वास येतो. आणि याचा वापर सौंदर्यप्रसाधने बनवणार्या मोठमोठाल्या कंपनीत मोठ्या प्रमाणात केला जातो.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की जिरेनियम ची शेती हे मुख्यता विदेशात बघायला मिळते भारतात अजून तरी याची लागवड पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळत नाही. जिरेनियमच्या तेलाला अगदी सोन्यासारखा भाव प्राप्त होतो जिरेनियम च्या प्रतिलिटर तेलाला जवळपास 12 हजार ते 20 हजार रुपये दर मिळतो.
जिरेनियम शेती साठी आवश्यक हवामान आणि जमीन
बघायला गेले तर जिरेनियम ची शेती प्रत्येक प्रकारच्या हवामानात केली जाऊ शकते आणि चांगले उत्पन्न प्राप्त केले जाऊ शकते. मात्र यासाठी कमी आर्द्रता असलेले हवामान उपयुक्त ठरते. ज्या प्रदेशात वार्षिक शंभर ते दीडशे सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो त्या प्रदेशात जिरेनियमची लागवड यशस्वीरीत्या केली जाऊ शकते व त्यापासून दर्जेदार उत्पादन देखील प्राप्त केले जाऊ शकते. जिरेनियम ची शेती जीवाश्मयुक्त, वाळूमिश्रित चिकन सुपीक माती असलेल्या जमिनीत केली तर अधिक फायदा मिळतो. जिरेनियम लागवड अशा जमिनीत केली गेली पाहिजे ज्या जमिनीचा पीएच साडेपाच ते साडेसात दरम्यान असतो.
जिरेनियम च्या सुधारित जाती
अल्जीरियण, बोरबन, ईजिप्सीएन, सिम पवन इत्यादी जेरेनियम च्या सुधारित जाती आहेत. एक हेक्टर क्षेत्रात जिरेनियम लागवड करण्यासाठी जवळपास दहा हजार रोपांची आवश्यकता असते. जिरेनियम ची लागवड नोव्हेंबर महिन्यात केल्यास उत्पादनात वृद्धी होते.
Share your comments