1. कृषीपीडिया

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केली लसणाच्या नव्या वाणाची निर्मिती

पिकांच्या नवीन वाणांच्या आणि विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे अग्रस्थानी आहेत. पिकांच्या नवनवीन उत्पादनक्षम वाणांची निर्मिती विद्यापीठांनी केली आहे. अशाच प्रकारे अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अधिक दर्जेदार आणि भरघोस उत्पादन देणाऱ्या लसणाच्या नवीन वाणाची निर्मिती केली आहे. हे एक वैशिष्ट्यपूर्ण, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण वाण असून त्याचा कालावधी केवळ 125 दिवसांचा आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
garlic

garlic

 पिकांच्या नवीन वाणांच्या आणि विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे अग्रस्थानी आहेत. पिकांच्या नवनवीन उत्पादनक्षम वाणांची निर्मिती विद्यापीठांनी केली आहे. अशाच प्रकारे अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अधिक दर्जेदार आणि भरघोस उत्पादन देणाऱ्या लसणाच्या नवीन वाणाची निर्मिती केली आहे. हे एक वैशिष्ट्यपूर्ण, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण  वाण असून त्याचा कालावधी केवळ 125 दिवसांचा आहे.

 जर या वाहनाचा उत्पादनाचा विचार केला तर हेक्टरी 110 क्विंटलपर्यंत लसणाच्या या वाणाचे उत्पादन शेतकरी घेऊ शकतात. सध्या शेतकरी वर्गही शेती पिकातील उत्पादनक्षम आणि नवीन संशोधित करण्यात आलेल्या वाणांना पसंती देताना दिसत आहे. तसेच कमी पाण्याच्या उपलब्धतेत आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांना शेतकरी आता महत्त्व देत आहेत.

याच दृष्टिकोनातून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, कमी दिवसात अधिक उत्पन्न देणाऱ्या लसून वाण विकसित केले आहे. या नवीन वानाच्या वाढीसाठी  थंड व कंद भरल्यानंतर उष्ण वातावरण पोषक असल्याने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात या वाणाची लागवड करण्याची शिफारस विद्यापीठाने केली आहे. शेतकऱ्यांना अगदी कमी दिवसात कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न मिळावे व विदर्भातील, उर्वरित राज्यातील लसणाची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने हे वाण विकसित केले आहे. गुणवत्तापूर्ण, दर्जेदार व कमी दिवसात अधिक उत्पादन देणारे हे वान असून कीड व रोगांना प्रतिकारक आहे.

 

 सन 2013 14 पासून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर या वाणाचे संशोधनात्मक प्रात्यक्षिके घेण्यात आली असून आता एकेजी 07( अकोला गार्लिक 07) नवीन लसूण वाण प्रसारित करण्यात आले आहे. इतर लसुन वाणा पेक्षा हे वान 15 ते 20 दिवस आधी तयार होते. तसेच मिळणारा लसूण हा आकाराने मोठा, रंगाने  सफेद, जाड पाकळ्या व पाकळ्यांची संख्या अधिक असलेले हे वान आहे. या वाहनात विद्राव्य घटकांचे प्रमाण इतर वाणांच्या तुलनेत 40 ते 42 टक्के व इतर प्रचलित वानांच्या तुलनेत 20 ते 22 टक्के जास्त उत्पादन मिळते.

English Summary: garlic species Published on: 26 June 2021, 01:46 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters