1. कृषीपीडिया

Garlic Fertilizer Management: लसुन खत व्यवस्थापन आणि वेलवर्गीय पिकावरील कीड नियंत्रण

सध्या लसुन लागवडीचे प्रमाण महाराष्ट्रामध्ये बहुतांशी भागात वाढत आहे. लसन पिकाचे योग्य रीतीने व्यवस्थापन केले तर हातात चांगले उत्पादन येते व त्या माध्यमातून उत्पन्नही चांगले मिळते.या लेखात आपण लसून पिकाला करायच्या खत व्यवस्थापन याविषयी माहिती घेऊ.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
garlic crop

garlic crop

सध्या लसुन  लागवडीचे प्रमाण महाराष्ट्रामध्ये बहुतांशी भागात वाढत आहे. लसन पिकाचे योग्य रीतीने व्यवस्थापन केले तर हातात चांगले उत्पादन येते व त्या माध्यमातून उत्पन्नही चांगले मिळते.या लेखात आपण लसून पिकाला करायच्या खत व्यवस्थापन याविषयी माहिती घेऊ.

 लसुन पिकासाठी खत व्यवस्थापन

1-लसुन लावण्यासाठी वाफे तयार करताना त्या अगोदर प्रति एकर सहा टन कुजलेले शेणखत मिसळावे किंवा जर कोंबडी खत टाकायचे असेल तर तीन टन खत चांगली पसरून जमिनीत मिसळावे.

2- लसुन पिकासाठी रासायनिक खते देताना एका एकर साठी 30 किलो नत्र,स्फुरद 20 किलो व पालाश 20 किलो याप्रमाणे द्यावी.या एकूण मात्र पैकी दहा किलो नत्र आणि स्फुरद,पालाशच्या पूर्ण मात्रा द्याव्यात. उरलेली नत्राची मात्रा दोन समान हप्त्यांत विभागून 30 आणि 45 दिवसांनी द्यावे.

3-बसून लागवडीनंतर 60 दिवसांनी नत्राची मात्रा देऊ नये.त्यामुळे उत्पादनावर व लसूण साठवण यावर विपरीत  परिणाम होऊ शकतो.

 लसूण हे पीक गंधकयुक्त खतांना चांगला प्रतिसाद देतात.त्यासाठी लसुन पिकाला भर खत देताना जर अमोनियम सल्फेट व सिंगल सुपर फास्फेट यासारख्या खतांचा वापर केला तर गंधकाचे पुरेशी मात्रा लसूण पिकाला उपलब्ध होते.

5- मिश्रखते वापरल्यानंतर देखील तर गंधकाचीपूर्तता होत नसेल तर लागवड करण्यापूर्वी प्रतीएकर 20 किलो गंधक जमिनीत मिसळावे.

6-सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा करण्यासाठी झिंक सल्फेट, मॅग्नीज सल्फेट, कॉपर सल्फेट, फेरस सल्फेट यांची फवारणी 0.5टक्के या प्रमाणात करावी.

 वेलवर्गीय पिकावरील किड नियंत्रण

1-नागअळी-वेलवर्गीय पिकांमध्ये नाग अळी ही पानांच्या आतल्या भागात राहून आतील हरित द्रव्यांचा भाग खाऊन घेते.त्यामुळे पानांवर नागमोडी रेषा तयार होतात.

 नियंत्रण

अझाडिरेक्टिन( दहा हजार पीपीएम)तीन मिली  किंवा इथिओन+सायपरमेथ्रीन 2 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

2- फळमाशी-फळमाशी फळांच्या वरील भागातअंडी घालते. त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या फळात राहून गर खातात.त्यामुळे फळे सडतात व वेडीवाकडी होतातआणि अकाली पक्व होतात.

 नियंत्रण

क्यूल्युरचेएकरी पाच सापळे लावावेत.मॅलेथिऑन (50ईसी) 2 मिली+ गुळ दहा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात नॅपसॅक पंपाने फवारणी करावी.

English Summary: garlic fertilizer management important for more garlic production Published on: 23 December 2021, 01:27 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters