1. कृषीपीडिया

फनेल ट्रॅप:- एक अष्टपैलू सापळा

या सापळ्याचे नाव फनेल ट्रॅप आहे. जो लेपीडोप्टेरा वर्गातील किडींचे पतंग पकडन्यासाठी वापरला जातो. कामगंध सापळ्यांमध्ये विविध प्रकारचे सापळे येतात.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
फनेल ट्रॅप:- एक अष्टपैलू सापळा

फनेल ट्रॅप:- एक अष्टपैलू सापळा

डेल्टा ट्रॅप,वॉटर ट्रॅप,बकेट ट्रॅप, आय.पी.एम.ट्रॅप,मॅक्सप्लस ट्रॅप तर अश्या प्रकारचे सापळे विविध किडींचे पतंग पकडण्यासाठी तयार केलेले असतात.

तर असे वेगवेगळे सापळे का?

कारण प्रत्येक किडीच्या पतंगाची/माश्यांची/भुंग्याची उडण्याची पद्धत वेगवेगळी असते त्यामुळे त्यांना व्यवस्थित पद्धतीने पकडण्यासाठी सापळ्यांची रचना केलेली असते.म्हणूनच फळमाशीसाठी, भुंगे,पतंग पकडण्यासाठी वेगळी ल्युर व योग्य सापळा लावावा लागतो.

फनेल ट्रॅप:-

हा सापळा नरसाळ्याच्या आकाराचा असतो. त्यास नरसाळ्याच्या खालील बाजूस प्लॅस्टिक पॉलिबॅग अडकवलेली असते. हिरव्या प्लेट खाली व्यवस्थित ल्युर लावून नरसाळ्याच्या वरील बाजूच्या तीन स्टँडवर प्लेट लावली जाते.मग आपण हा सापळा काठीच्या सहाय्याने पिकाच्या उंचीच्यावर अर्धा ते एक फूट वर लावाला जातो.जेणे करून विशिष्ट किडीचे कोणताही अडथळा न येता,योग्य रित्या सापळ्यात अडकतील.

 कोणकोणत्या किडी साठी वापरला जातो?:-

फनेल ट्रॅप हा सोयाबीन मध्ये येणारी पाने खाणारी अळी(Spodoptera litura),हरभऱ्यामध्ये येणारी घाटेअळी(Helicovorpa armigera),मक्क्यामध्ये येणारी अमेरिकन लष्करी अळी, वांगी पिकामध्ये येणारी शेंडे व फळ अळी,कपाशीत येणाऱ्या गुलाबी बोंड अळी या सर्व घातक किडींचे पतंग या सापळ्याद्वारे पकडू शकतो. 

हे हि वाचा कामगंध सापळा(फेरोमोन ट्रॅप) आपल्या शिवारचा आरसा

कारण या सर्व किडींच्या पतंगाची उडण्याची पद्धत एकसारखी आहे.फक्त आपण कोणते पीक घेतले आहे त्यामध्ये येणारी कीड कोणती हे अभ्यास पूरक पाहून ल्युर निवडावी व दर 45 दिवसांनी बदलावी.

आपण पिकामध्ये लावलेल्या सापळ्यांचा संख्येवर किडीचे नियंत्रण अवलंबून असते.

सापळे लावल्यानंतर घ्यावयाची काळजी:-

1.सापळ्यामध्ये ल्युर लावताना हात स्वच्छ असावे.ल्युरला डायरेक्ट हात लावू नये.

  1. कोणतीही फवारणी घेताना फवारा ट्रॅप व ल्युर वर जाऊ देऊ नये.

- IPM SCHOOL

English Summary: Funnel Trap is a versatile trap Published on: 28 October 2021, 06:52 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters