1. कृषीपीडिया

टोमॅटो वरील सर्वात खतरनाक रोग आहे फ्युजरियम विल्ट,अशापद्धतीने करा रोगनियंत्रण

टोमॅटो पिकावर विविध बुरशीजन्य,सूक्ष्म जिवाणू जन्यआणि विषाणूजन्यरोगांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो.टोमॅटो पिकाच्या विविध भागांवर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. यामुळेच विविध रोग टोमॅटो पिकावरील भागाप्रमाणे उदा. मुळावरील रोग मर, खोड वरील कूज, फळांची कूजसड इत्यादी प्रमाणे ओळखले जातात. या लेखात आपण टोमॅटो पिकावरील फ्यूजरियमविल्ट म्हणजेच मरया रोगाची माहिती घेणार आहोत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
tomato crop

tomato crop

 टोमॅटो पिकावर विविध बुरशीजन्य,सूक्ष्म जिवाणू जन्यआणि विषाणूजन्यरोगांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो.टोमॅटो पिकाच्या विविध भागांवर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. यामुळेच विविध रोग टोमॅटो पिकावरील भागाप्रमाणे उदा. मुळावरील रोग मर, खोड वरील कूज, फळांची कूजसड इत्यादी प्रमाणे ओळखले जातात. या लेखात आपण टोमॅटो पिकावरील फ्यूजरियमविल्ट म्हणजेच मरया रोगाची माहिती घेणार आहोत.

मर रोगाचे प्रसाराची कारणे

  • ज्या ठिकाणीटोमॅटो पिकाखाली सततचे बागायती क्षेत्र असते अशा भागात हा गंभीर रोग जास्त प्रमाणात आढळतो. या रोगाचा प्रसार जास्त करून ऊष्ण व आद्रता हवामान असलेल्या भागात होतो.
  • हा रोग हवामानातील तापमानावर अवलंबून असतो.साधारणपणे 28 सेंटीग्रेड तापमान असते तेव्हा या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो.जवा किमान तापमान 18.3 सेमी पेक्षा कमी व कमाल तापमान 37.7 सेमीपेक्षाजास्तअसतेतेव्हायारोगाचाप्रसारकमीअसतो.
  • टोमॅटो रोपांचे मर व मूळकूज हे दोन्ही रोग फुजेरियम ऑक्सिपोरम ह्या बुरशीमुळेहोतात.
  • या रोगाची बुरशी गवतावर व इतर पिकांवर जमिनीत जिवंत राहिल्याची आढळते. हा रोग मूळ आणि खोडामार्फत पसरतो.
  • जेव्हा रोपांची पूर्ण लागावड होते तेव्हा तुटलेल्या मुळामधून या रोगाचा पुढे जमिनीतून प्रसार होतो. त्याच्या परिणामामुळे टोमॅटो रोपाच्या मुळावरील भाग वाळतो व पूर्ण झाडांची मरहोते.
  • हा रोग टोमॅटो पिकावर आल्यास सुरुवातीस जुनी पानेपिवळी पडतात व नंतर नवीन शेंड्याकडील पाने पिवळी पडलेली दिसतात.
  • जास्त नत्र व कमी पालाश पिकास मिळाल्यास ह्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्याचे आढळते. जेव्हा सूक्ष्मकृमीचा प्रादुर्भा व होतो, त्या वेळे हीह्या रोगाची लागण मोठ्याप्रमाणात आढळते.
  • उष्णहवामानामुळे हा रोगमोठ्या प्रमाणात  फैलावलेला आढळतो.

उपाययोजना

1-सिंचनाचणी पिकाला योग्यप्रमाणात व ठिबक पद्धतीने दिल्यास ह्या रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो व पिकांचे उत्पादनही   चांगलेयेते.

2

-पीकव्यवस्थापनामध्ये जमिनीमध्ये हवा खेळती ठेवणे व मुळांची वाढ योग्य प्रमाणात होऊ देणे याचा अंतर्भाव केल्यास रोग आटोक्यात असल्याचे आढळते.

3-बुरशीनाशक प्रक्रियायुक्त बियाण्यांचा वापर करावा.

4- रोपवाटिका मधील रोपांच्या गादीवाफे मध्ये बाविस्टीन एक ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात द्रावण जमिनीत मुरवावे म्हणजेच ड्रेंचिंग करावे.त्यासोबतफवारणीहीकरूनघ्यावी.

 

 

English Summary: fujerium wilt disease management in tommato crop Published on: 27 September 2021, 02:23 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters