आपला प्रश्न चांगला आहे. माझ्या अनुभवानुसार काही व्यक्ती नोकरी करून निवृत्ती नंतर शेती करण्याचा प्रयत्न करतात.
जुन्या काळात एक म्हण होती, "उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी".
आता हीच म्हण उलटी झाली आहे. याला कारण म्हणजे भाऊ वाटण्या मध्ये शेतीचे लहान लहान झालेले हिस्से आहेत.
शेती जर लहानपणा पासुन करत असाल, तर तिच्यात भांडवल किती टाकले, मजुरी किती, घराची मेहनत किती व मिळालेला नफा किती हे समजते. शेतीवर कर्ज काढणे, बँकेच्या नोटीसा, ट्रॅक्टर जप्त करणे, अशा बऱ्याच गोष्टी बद्दल जास्त धास्ती वाटत नाही, कारण या सर्व गोष्टी त्यांना माहीत असतात. परंतु अचानक शेती करायला लागलेल्या शेतकऱ्याला याची अजिबात कल्पना नसते.
एक साधा माणुस नांगरणी, ही फक्त नांगरणी म्हणून समजेल. पण नांगरणी अगोदर, शेती पाणी कशी पिते, हे एक तंत्रज्ञान असते. हे अनुभवाने समजते. त्यामुळे जेथे उंचावटा किंवा सखल भाग असेल, ते नांगरणीतुन आपल्या गरजे प्रमाणे बदलवता येते. हे तंत्र आवगत असणे जरुरी आहे. फक्त कृषी विद्यापीठातील ज्ञान शेती करण्यास पुरेसे नाही.
दुसरी गोष्ट आपण जे पण पिक घेणार, त्याचा कालावधी, बीयाने कोणते वापरणार यावर मागे पुढे होत असतो, तसेच काही पिकासाठी ठराविक ऋतुत योग्य ते हवामान असल्याने पिक निरोग येते. या पिकाचा कालावधी बदलवयाचा असल्यास संभाव्य निसर्गाचे बदल लक्षात घेऊन रोग राई बद्दल अगोदरच माहिती असणे फार जरुरी आहे.
शेती व्यवसायामध्ये वेळेला किती महत्व आहे, हे तर एका म्हणीवरून लक्षात येईल.
"आधी शेती मग माती", म्हणजे एखादे वेळेस अंत्यविधी पेक्षापण शेतीचा हंगाम जास्त महत्वाचा, असा अर्थ होतो.
तसेच पिकाला रासायनिक खते किती व केव्हा द्यायचे याचे पण तंत्रज्ञान आहे. लहान वयात खताचे प्रमाण जास्त झाल्यास मुळी खराब होऊन पिकाचा नाश होऊ शकतो. पाणी सुद्धा प्रमाण बद्ध प्रमाणात द्यावे लागते, नाही तर पीक पिवळे पडू शकते.
द्राक्षे, ऊस, व इतर नगदी पिकाची वाढ पण निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असते. या सर्व गोष्टींचा अंदाज अनुभवाने बांधता येतो.
आपण प्रथमच शेती करत असाल, तर आपल्याकडे तीन वर्षे पुरेल एवढं भांडवल असेल, तर या वेळेत आपल्याला अनुभव येईल व आपण मानसिकरीत्या शेतीतील खाचा खोचा स्वतः समजुन घ्याल.
नविन पिढी शेती करण्यासाठी समोर का येत नाहीत?
प्रश्न खुप गहन आहे आणि विषय गंभीर!
याला खूप कारणं आहेत :-
१) शेतकऱ्यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन.
२) स्वत चा माल पिकवायचा पण भाव ठरवण्याचा अधिकार नाही.
३) सरकारचं धोरण योजना फक्त कागदावरच अंमलबजावणी शुन्य.
४) आपल्या बापाचे काय हाल झाले वरील कारणांमुळे त्यामुळे देखील शेती न करण्याचा विचार मनात येतो.
५) बी, खते, किटकनाशक यामध्ये शेतकरी गुरफटून जातो परिणाम उत्पन्न आज वाढते, भविष्य खराब यासाठी (Organic farming) जैविक शेती हा पर्याय योग्य राहील पण हेच सरकारचं धोरण आहे,बी खते, किटकनाशक बनवणार्या कंपण्या पाठिमागे घालून शेतकरी पार पिळवुन घ्यायचा.
६) दिवसेंदिवस कमी होत चाललेली जमीन (शेत)
Share your comments