भारतातील जवळपास सर्व राज्यात केळीची लागवड केली जाते. महाराष्ट्रात केळीची लागवड हे विशेष उल्लेखनीय आहे, एवढेच नाही तर जळगाव जिल्ह्यातील केळी ला जिआय टॅग देखील देण्यात आला आहे. यावरून केळीच्या लागवडीत महाराष्ट्राचे स्थान आपल्या लक्षात येईल.केळी मध्ये अनेक प्रकारचे पोषकतत्वे आढळतात, जे की आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त असल्याचे सांगितले जाते आणि यामुळे डॉक्टर देखील केळीचे सेवन करण्याचा आपणास सल्ला देतात. केळी हे फळ म्हणून तर खाल्ले जाते शिवाय याचे अनेक प्रॉडक्टस देखील बनवले जातात तसेच याची भाजी देखील बनवली जाते त्यामुळे याची मागणी ही वर्षभर कायम असते.
केळीचा उपयोग हा फक्त खाण्यासाठी होतो असे नाही तर त्याला हिंदू धर्मात एक विशिष्ट असे महत्त्व देखील आहे अनेक धार्मिक कार्यक्रमात, पूजा-अर्चना मध्ये केळीचा उपयोग केला जातो. त्यामुळे दिवसेंदिवस केळीची मागणीही वाढतच आहे. त्यामुळे आज आपण केळीच्या एका विशिष्ट जाती विषयी जाणून घेणार आहोत ज्याद्वारे केळी उत्पादक शेतकरी चांगली मोठी कमाई करू शकतात चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून ठेवूया केळीच्या जी नाईन G9 जातीविषयी. केळीची ही वाण केळी उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यास कारगर सिद्ध होऊ शकते, परिणामी यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न हे दृष्टीने वाढेल अशी आशा देखील व्यक्त केली जात आहे चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या जातीची विशेषता.
G9 या केळीच्या जातीची विशेषता
- असे सांगितलं जात की, या केळीच्या जातीची उत्पादन क्षमता ही इतर केळीच्या वानपेक्षा खुपच अधिक आहे. म्हणून या जातीच्या केळीची लागवड केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
- केळीची ही जात पिकल्यानंतरही बरेच दिवस टिकून राहते ज्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल.
- केळीच्या झाडांना वादळ, तीव्र हवा यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, परंतु ही केळीची जात मध्यम ते तीव्र प्रकारचे वादळ वारा सहन करण्यास सक्षम आहे.
- केळीच्या या जातीमध्ये रोगप्रतिकारक क्षमता अधिक आहे त्यामुळे केळीला रोग लागण्याचा धोका कमी होतो आणि सहाजिकच त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार आहे.
- या जातीची केळीची झाडे आकाराने लहान असतात परंतु इतर केळीच्या झाडापेक्षा मजबूत असतात.
Share your comments