वांगी या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर सर्वर हंगामात खरीप,रब्बी आणि उन्हाळ्यात ही करता येते. कोरडवाहू शेतीत आणि मिश्र पीक म्हणूनही वांग्याची लागवड करतात.आहारात वांग्याची भाजी भरीत,वांग्याची भजी इत्यादी अनेक प्रकारे उपयोग होतो.
पांढरी वांगी मधुमेह असलेल्या रोग्यांना गुणकारी असतात. वांग्यामध्ये खनिजे अ ब क ही जीवनसत्वे तसेच लोह व प्रथिने यांचे प्रमाण पुरेसे असते. महाराष्ट्रात या पिकाखाली अंदाजे 28 113 हेक्टरी क्षेत्र लागवडीखाली आहे.
जाती : सुधारित :
मांजरी गोटा:
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड होणारा हा वाण मांजरी ( जिल्हा पुणे ) येथील स्थानिक जातीपासून निवड पद्धतीने शोधून काढण्यात आला आहे. या वानाचे झाड बुटके आणि पसरट असते.पाने आणि फळांच्या देठावर काटे असतात.मध्यम ते मोठ्या आकाराची आणि गोल असतात. फळांचा रंग जांभळट गुलाबी असून फळांवर पांढरे पट्टे असतात.फळे चवीला रुचकर असून काढणीनंतर 4 ते 5 दिवस टिकतात.पिकाचा कालावधी 150-170दिवसाचा असून सरासरी हेक्टरी उत्पादन 70ते 30टन मिळते.
वैशाली :
वांग्याच्या या वाणाचे झाड बुटके आणि पसरट असून, पाने खोड आणि फळांच्या देठावर काटे असतात.फुले आणि फळे मध्यम आकाराची आणि अंडाकृती असून फळांचा रंग आकर्षक जांभळा असून फळांवर पांढरे पट्टे असतात. फळे झुबकयात लागतात व 55-60 दिवसात काढणीस तयार होतात. सरासरी एकरी 30 टन उत्पादन मिळते. वैशाली या जातीच्या फळाची गुणवत्ता साधारण असली तरी भरघोस उत्पादन आणि लवकर येणारी असल्यामुळे ही जात शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. फळे 60 दिवसात तोडणीला येतात. हा वाण अर्का कुसुमाकर आणि मांजरी गोटा यांच्या संकरातून निवड पद्धतीने विकसित केला आहे.
प्रगती :
हा वाण मांजरी गोटा आणि वैशाली यांच्या संकरातून तयार झाला आहे. वांग्याच्या या जातीची झाडे उंच आणि काटक असतात. पाने गडद हिरव्या रंगाची असून पाने, फळे आणि फांद्यांवर काटे असतात. या जातीची फुले आणि फळे झुपकयानीं येतात.फळांचा आकार अंडाकृती असून रंग आकर्षक जांभळा व फळांवर पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात.
या जातीचे सरासरी हेक्टरी 30 ते 35 टन उत्पादन मिळते. हा वाण बोकड्या आणि मर रोगास कमी प्रमाणात बळी पडतो.
अरुणा :
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे विकसित झालेल्या वांग्याच्या या जातीची झाडे मध्यम उंचीची 60-70से.मी. असून, फळे भरपूर आणि झुपक्यात लागतात .फळे मध्यम आकाराची,गोलाकार अंडाकृती असून त्यांचा रंग चमकदार जांभळा असतो. उत्पादन हेक्टरी 25-30 टन मिळते.
Share your comments