1. कृषीपीडिया

भाजीपाल्यामध्ये फळधारणा वाढवायची आहे; तर करा या उपाय योजना

vegetable crop

vegetable crop

भाजीपाला म्हटले म्हणजे आपल्या दैनंदिन आहारात भाजीपाल्याचा सगळ्यात जास्त उपयोग होतो. भाजीपाला पिकामध्ये भाजीचे उत्पादन फळांच्या संख्येवर अवलंबून असते. फुले व फळांची गळ होणे किंवा फळधारणा न होणे अशा विविध कारणांमुळे फळांची संख्या कमी होऊन भाजीपाला उत्पादनात घट येऊ शकते. या लेखामध्ये आपण  भाजीपाला पिकाची फळधारणा वाढवण्यासाठीचे  चे उपाय कोणते ते पाहणार आहोत.

 अशा पद्धतीने भाजीपाला पिकातील फळधारणा वाढवा

  • सगळ्यात अगोदर म्हणजे भाजीपाला पिकांची लागवड योग्य हंगामात व योग्य वेळी करणे फार महत्वाचा आहे. त्यामुळे भाजीपाला च्या दृष्टिकोनातून फळधारणा होण्यासाठी आवश्यक ते तापमान मिळते.ज्या तापमानासाठी ज्याहंगामात ज्याजातीची शिफारस करण्यात आली आहे त्याच भाजीपाला जातीची लागवड करावी.
  • वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये मादी फुलांचे प्रमाण वाढवून फळधारणा वाढवण्यासाठी शिफारस केलेल्या संजीवकांचा वापर करावा.तसेच कृत्रिम परागसिंचन करून फळधारणा वाढविण्यात येते. उदाहरणार्थ जर आपण काकडीचा विचार केला तर काकडी पिकामध्ये 10 पीपीएम जिब्रेलिक एसिड किंवा  दहा पीपीएम मॅलिक हायडरॉक्साइड किंवा 50 पीपीएम इथ्रेलयापैकी कोणत्याही एका संजीवकाची फवारणी रोपे दोन ते चार पानांवरअसतानाकेल्यास मादी फुले लवकर येतात. त्यांची संख्या वाढते आणि पर्यायाने अधिक फळधारणा होऊन उत्पादन वाढते.
  • फुले येण्यापूर्वी पिकाला खतांचा वापर करावा आणि पुढे येताना आणि फळधारणा होताना पाण्याचा ताण अजिबात पडू देऊ नये.
  • फळांची गळ थांबवण्यासाठी मिरची, वांगे या सारख्या पिकांमध्ये सुरुवातीला नॅपथ्यलिक ऍसिटिक ऍसिड सारख्या संजीवकांचा वापर करावा.
  • भाजीपाला पिकावर रोग व कीड येऊ नयेत यासाठी योग्य वेळी नियंत्रण करावे. पिक जेव्हा फुलोरा मध्ये येते किंवा आल्यानंतर तसेच फळधारणा होताना परपरागीकरण होणाऱ्या पिकांमध्ये मधमाशांना हानिकारक असणारी कीटकनाशके वापरू नये.भुकटीयुक्त कीटकनाशकांचा वापर टाळावा.
  • झाडांवर जर फळांची संख्या अधिक असेल तर पुढील फुलांमध्ये फळधारणा होत नाही. त्यामुळे फळे नियमितपणे तोडून पिकाला अन्नपुरवठा आणि पाणीपुरवठा नियमितपणे करणे आणि फळांची विरळणी करून घेणे अत्यावश्यक आहे.
  • कांद्याचा विचार केला तर कांदा पिकात बीजधारणा वाढविण्यासाठी बीजोत्पादन घेण्यामध्ये मधमाशांच्या पेट्या ठेवल्यास परागीभवन वाढून बीजधारणा वाढण्यास मदत होते.

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters