1. कृषीपीडिया

मेंथा लागवड: मेंथा शेतीच्या माध्यमातून होऊ शकता झटपट श्रीमंत, जाणून घेऊ मेंथा लागवडीबाबत

शेतकरी देशाला अन्नपुरवठा परंतु शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हवे त्या प्रमाणात सुधरत नाही.शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पारंपारिक शेतीसोबतच नवीन पर्याय निवडण्यास ही योजनांच्या माध्यमातून सरकारकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
mentha crop

mentha crop

शेतकरी देशाला अन्नपुरवठा परंतु शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हवे त्या प्रमाणात सुधरत नाही.शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पारंपारिक शेतीसोबतच नवीन पर्याय निवडण्यास हीयोजनांच्या माध्यमातून सरकारकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे

याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांमध्येऔषधी वनस्पतींच्या लागवडीचा कल वाढत आहे.औषधी वनस्पतींची मागणी जगभरात कायम आहे आणि उत्पादन कमी आहे.त्यामुळेच त्याला चांगले दर मिळतात. या औषधी वनस्पती मध्ये मेंथा हा एक उत्तम पर्याय आहे. मेंथा हेपिक 100 ते 110 दिवसात तयार होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीवर खर्च केलेला पैसा मोठा नफ्याच्या स्वरूपात परत शेतकऱ्यांना लवकर मिळतो.या औषधी वनस्पतीची वैशिष्ट्ये म्हणजे,मेंथा तेल प्रति लिटर एक हजार रुपये दराने विकले जाते.

मेंथा बद्दल माहिती

 मेंथा उत्पादनात भारत हा मुख्य उत्पादक देश असला तरी मेंथा ही मुख्यता युरोपियन वनस्पती आहे.

मेंथापासून पेपरमिंट, वेदना कमी करणारी औषधे आणि मलम बनतात. आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा उपयोग केला जातो.मेंथा लागवडीसाठी प्रथम योग्य जागेची निवड करणे आवश्यक आहे. शेतात पाण्याचा निचरा व्हायला हवा.दमट आणि चिकन माती मध्ये याचे उत्पादन चांगले येते. लागवडीपूर्वी शेतकऱ्यांनी माती परीक्षण केले पाहिजे. मातीचे पीएच मूल्य साडेसात ते सात दरम्यान असले पाहिजे.

 रब्बीच्या पिकानंतर रोपन पद्धतीने याची लागवड केली जाते. त्यामध्ये प्रथम वनस्पतींची रोपवाटिका तयार केली जाते. 30 ते 40 दिवसात वनस्पती तयार होते.

मार्च आणि एप्रिल मध्ये ही रोपे मुख्य शकत लागवड केली जातात. योग्य वेळात मेंथा कापणी करावी.अन्यथा पीक आणि गुणवत्तेवर परिणाम होतो.उशिरा कापणीच्या वेळी मेंथाची मात्रा कमी होतेआणि पानांमधून तेलाचे प्रमाण कमी होते.वनस्पतीच्या वयानुसार तेल आणि मेंथाचेप्रमाण वाढत जाते. सर्वसाधारणपणे मिथाची पहिली कापणी 100 ते 120 दिवसांनी करावी आणि दुसरी कापणी 60 ते 70 दिवसांनी करावी. अशा पद्धतीने लागवड केल्यास चांगले पीक येऊ शकते आणि त्यातून चांगली कमाई होऊ शकते.

English Summary: for more product and income cultivate mentha medicinal plant Published on: 05 December 2021, 03:03 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters