MFOI 2024 Road Show
  1. कृषीपीडिया

फुले ११०८२! ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर वाण...

शेतकऱ्यांचे लक्ष लागलेला नॅनो- डीएपीला अधिकृत मान्यता येत्या एक ते दोन दिवसांत मिळण्याची अपेक्षा आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) ते तात्पुरते एक वर्षासाठी जारी करण्याचे सुचवले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नॅनो-डीएपी बाजारात आल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
sugarcane factory

sugarcane factory

उसाचे एकमेव असे पीक आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना हक्काचे चार पैसे मिळतात. तसेच या पिकाला अवकाळी आणि गारपिटीचा धोका जास्त प्रमाणावर नसतो. असे असताना आता उसाच्या नवीन जाती आल्या असून यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. फुले ११०८२ (कोएम ११०८२) हा वाण महाराष्ट्रात लागवडीसाठी अधिसूचित करण्यात आला आहे.

याचे कोसी ६७१ पेक्षा ऊस आणि साखर उत्पादन अधिक मिळते. उसातील व्यापारी शर्करा प्रमाण हे कोसी ६७१ पेक्षा किंबहुना बरोबरीत असल्याने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये साखर कारखान्याचा साखर उतारा वाढविण्यासाठी हा वाण फायदेशीर ठरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना देखील चांगला फायदा होणार आहे.

फुले ११०८२ (कोएम ११०८२) ) (Sugarcane Phule 11082) हा उसाचा लवकर पक्व होणारा नवीन वाण आहे. महाराष्ट्रात सुरू आणि पूर्वहंगामातील लागवडीसाठी याची शिफारस करण्यात आली आहे. या वाणाची जाडी, उंची, कांडीची लांबी जास्त असल्याने सरासरी वजन जास्त मिळते. वाणाचा जेठा कोंब काढल्यास फुटव्यांची संख्या भरपूर मिळते.

हिंगोलीतील शेतकऱ्याची पोलिसांत तक्रार, उपमुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलले असल्याची तक्रार

याचे कोसी ६७१ पेक्षा ऊस आणि साखर उत्पादन अधिक मिळते. उसातील व्यापारी शर्करा प्रमाण हे कोसी ६७१ पेक्षा किंबहुना बरोबरीत असल्याने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये साखर कारखान्याचा साखर उतारा वाढविण्यासाठी हा वाण फायदेशीर ठरणार आहे. पाडेगाव, कोल्हापूर, पुणे आणि प्रवरानगर येथे २०१२-१३ मधील बहुस्थानी चाचणीमध्ये फुले ११०८२ या वाणाचे अनुक्रमे पूर्व हंगामी आणि सुरू लागवडीमध्ये हेक्टरी ११८.३४ टन आणि १०३.३३ टन ऊस उत्पादन आणि साखर उत्पादन १७.१९ टन आणि १५.७८ टन मिळाले आहे.

आता राजू शेट्टी करणार पालकमंत्र्यांच्या घरासमोर बिऱ्हाड आंदोलन..

कोसी ६७१ या लवकर पक्व होणाऱ्या वाणापेक्षा अनुक्रमे १४.२१ टक्के आणि ८.२६ टक्के अधिक ऊस उत्पादन आणि १५.७९ आणि ४.६४ टक्के साखर उत्पादन मिळाले. पूर्व आणि सुरू हंगामातील फुले ११०८२ या वाणामध्ये व्यापारी शर्करा १४.१२ आणि १३.९४ टक्के मिळाली असून को.सी. ६७१ मध्ये १३.९४ आणि १४.४९ टक्के मिळाली.

महत्वाच्या बातम्या;
नॅनो-डीएपीला दोन दिवसांत मान्यता मिळणार, नेहमीच्या खताच्या तुलनेत निम्म्या भावात उपलब्ध होणार..
उजनीत हिरवे विष! पशुधन धोक्यात
नवीन वर्षांत शेतकऱ्यांना बसणार महागाईची झळ! खतांच्या किमती 40 टक्क्यानी वाढल्या

English Summary: Flowers 11082! Beneficial varieties for sugarcane farmers... Published on: 31 December 2022, 04:48 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters