1. कृषीपीडिया

जाणून घ्या ! पिकातील पाणी नियोजनाचे महत्त्व

पीक उत्पादनात पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पिकाच्या वाढीवर व पर्यायाने उत्पादनावर गरजेपेक्षा की अथवा अधिक पाणी दिल्यास अनिष्ट परिणाम होतो. याकरिता पिकासाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे जरूरीचे आहे. पाण्याचे नियोजन हे प्रमुख्याने पीक प्रकार, जमिनीचा प्रकार, पिकाच्या वाढीच्या अवस्था हवामान व हंगामा या बाबींवर अवलंबून आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
पिकातील पाणी नियोजनाचे महत्त्व

पिकातील पाणी नियोजनाचे महत्त्व

पीक उत्पादनात पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पिकाच्या वाढीवर व पर्यायाने उत्पादनावर गरजेपेक्षा की अथवा अधिक पाणी दिल्यास अनिष्ट परिणाम होतो. याकरिता पिकासाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे जरूरीचे आहे. पाण्याचे नियोजन हे प्रमुख्याने पीक प्रकार, जमिनीचा प्रकार, पिकाच्या वाढीच्या अवस्था हवामान व हंगामा या बाबींवर अवलंबून आहे. पाण्याचे योग्य नियोजन करणे म्हणजे एखाद्या पिकास हंगामानुसार व त्याच्या गरजेनुसार किती पाणी द्यावे ? पाण्याची गरज भागविण्यासाठी पाण्याच्या किती पाळ्या व प्रत्येक पाळीस किती पाणी द्यावे ? पाणी कसे द्यावे ? या सर्व गोष्टींचा समावेश होतो.

पाण्याचे नियोजन :

पिकास पाणी देत असताना जमिनीचा विचार करणे आवशयक आहे. जमिनीतील ओलावा धरून ठेवण्याचे प्रमाण, पाणी मुरण्याचा वेग, पाण्याचा निचरा हे जमिनीच्या प्रकारानुसार बदलत असते. भारी जमिनीमध्ये उपलब्ध पाणी धारणा शक्ती ही हलक्या जमिनीपेक्षा जास्त असते.

हेही वाचा : पंतप्रधान कृषी सिंचन योजना : शेतकर्‍यांना कसा मिळतो लाभ, अनुदानबाबत काय आहेत नियम?

या उलट जमिनीत पाणी मुरण्याचा वेग हा हलक्या जमिनीपेक्षा कमी असतो. तसेच भारी जमिनीची खोली ही हलक्या जमिनीपेक्षा तुलनेने जास्त असते त्यामळे पाणी साठवून ठेवण्याची क्षमतासुद्धा भारी जमिनीत जास्त असते. त्यामुळे भारी जमिनीत पाणी देण्याच्या दोन पाळ्यातील अंतर हलक्या जमिनीपेक्षा जास्त असते.

 

पिकाची पाण्याची गरज तेथील हवामानावर म्हणजे आर्द्रता, बाष्पीभवनाचा वेग, तापमान, पाऊस इत्यादी बाबींवर अवलंबून असते. बाष्पीभवन पात्रातून दररोज जेवढे पाणी बाष्पाच्या स्वरूपात उडून जाईल तेवढेच पाणी अथवा थोडे कमी पाणी पिकाच्या व जमिनीच्या माध्यमातून उडून जाते असे गृहित धरले जाते. तसेच जमिनीतील ओलाव्याच्या प्रमाणानुसार पाण्याची मात्रा ठरविली जाते.

मनोहर पाटील जळगाव
प्रतिनिधी गोपाल उगले

English Summary: Find out! Importance of crop water planning Published on: 19 June 2021, 02:31 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters