भारत, अमेरिका आणि आफ्रिका समवेतच अनेक देशांमध्ये अंजीरांची लागवड केली जाते. त्याची फळे ताजी आणि सुकवून देखील वापरली जातात. तसेच, त्याचे पिकलेले फळ मुरंबा बनवण्यासाठी वापरता येते. साधारणपणे, अंजीर लागवड अशा ठिकाणी केली जाते, जिथे हवामान समशीतोष्ण आणि कोरडे असते. जर आपण भारताबद्दल बोललो तर त्याची लागवड तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात केली जाते.
अंजीरची झाडे सुमारे दोन वर्षांनी फळे देण्यास सुरवात करतात. चार ते पाच वर्षांच्या झाडापासून सुमारे 15 किलो फळे मिळतात. तज्ञांच्या मते, पूर्ण विकसित झालेल्या अंजीरच्या झाडातून एका वेळी 12000 रुपयांपर्यंत कमाई करता येते.
अंजीर लागवड आणि महाराष्ट्र
व्यापारी तत्वावर अंजीरची लागवड फक्त महाराष्ट्रात केली जाते. सध्या, महाराष्ट्रात एकूण 417 हेक्टर क्षेत्रामध्ये अंजिरची लागवड केली जाते, अंजीरची लागवड ही महाराष्ट्रात मुख्यता पश्चिम महाराष्ट्रात केली जाते, त्यापैकी 312 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र एकट्या पुणे जिल्ह्यात आहे. सातारा आणि पुणे जिल्ह्यांच्या हद्दीतील निरा नदीच्या खोऱ्यात खेड-शिवरा ते जेजुरी (पुरंदर-सासवड तालुका) पर्यंत 10-12 गावांचा परिसर महाराष्ट्रातील अंजीर उत्पादनाचा प्रमुख भाग आहे.
आता, पश्चिम महाराष्ट्रातील अजून एका जिल्ह्यात म्हणजे सोलापूरमध्ये अंजीरची लागवड केली जात आहे तसेच विदर्भात पण अंजीरची लागवड होताना दिसत आहे विदर्भातील उस्मानाबादमधील शेतकऱ्यांनी अंजीराची लागवड सुरू केली आहे. यावरून असे म्हणता येईल की दुष्काळग्रस्त भागात अंजीरची वाढ चांगली होते.
केव्हा लावायचा अंजीर?
अंजीर उष्ण आणि कोरडे हवामानात वाढणारे पिक आहे. यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अंजीर लागवड करण्यास वाव आहे. अनेक शेतकरी सांगतात की, कमी तापमान या पिकासाठी हानिकारक नाही आहे पण दमट हवामान नक्कीच धोकादायक ठरते. अंजीर विशेषतः कमी पर्जन्य असलेल्या भागात घेतले जाऊ शकते, जेथे ऑक्टोबर ते मार्च पर्यंत पाण्याची कमतरता असते तिथे अंजीर लागवड केली जाऊ शकते.
जमीन कशी बरं असावी?
अंजीरची लागवड मध्यम काळ्या आणि लाल माती असलेल्या जमिनीत करता येते. मोठ्या प्रमाणात चुनखडी असलेल्या खारट काळ्या जमिनीत अंजीर खूपच चांगले वाढते असे विशेषज्ञ म्हणतात. चांगली निचरा होणारी आणि कमीत कमी जमिनीत एक मीटर खोलपर्यंत माती अंजिरच्या वाढीसाठी चांगली असते, मात्र या जमिनीत चुनाचे प्रमाण असावे.
या फळाच्या झाडासाठी दांदगी काळी जमीन चांगली नसते, अंजीरला डाळिंबसारखीच हलकी जमीन चांगली असल्याचे मानले जाते. झाड उथळ आणि चांगल्या निचरा होणाऱ्या जमिनीत पाहिजे तसे वाढत नाही.
Share your comments