1. कृषीपीडिया

बडीशोपचे खत, पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि नियोजन

भारता मसाल्याच्या पदार्थासाठी प्रसिद्ध देश असून खाण्याच्या पदार्थांची रुची, स्वाद, सुगंध व खमंग पणा वाढवणारे मसाल्याचे पदार्थांमध्ये जिरे,ओवा,जायफळ, दालचिनी आणि लवंग यांच्यासोबत बडीसोफचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळी मध्ये बडीसोप ही लोकप्रिय आहे या लेखात आपण बडीसोप च्या व्यवस्थापना विषयी माहिती घेऊ.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
fennel crop

fennel crop

भारता मसाल्याच्या पदार्थासाठी प्रसिद्ध देश असून खाण्याच्या पदार्थांची रुची, स्वाद, सुगंध व खमंग पणा वाढवणारे मसाल्याचे पदार्थांमध्ये जिरे,ओवा,जायफळ, दालचिनी आणि लवंग यांच्यासोबत बडीसोफचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळी मध्ये बडीसोप ही लोकप्रिय आहे या लेखात आपण बडीसोप च्या व्यवस्थापना विषयी माहितीघेऊ.

 बडीसोप पिकाचे व्यवस्थापन

1 अन्नद्रव्य व्यवस्थापन- बडीसोप च्या अधिक आणि चांगल्या उत्पादनासाठी हेक्‍टरी 15 ते 20 टन सेंद्रिय खते लागवडीपूर्वी शेवटच्या वखराची पाळी सोबत जमिनीत मिसळून द्यावी. त्यासोबतच रासायनिक खतांना सुद्धा बडीशोप हे पीक अधिक चांगला प्रतिसाद देते.हॅक्टरी 90 किलो ग्रॅम नत्र, चाळीस किलो ग्रॅम स्फुरद आणि जमिनीच्या आवश्यकतेनुसार पालाश यांची मात्रा विभागून पिकाला दिल्यास उत्पादनावर चांगला परिणाम दिसून येतो. नत्रयुक्त खतांची अर्धी व स्फुरदयुक्त खतांची पूर्ण मात्रा लागवडीनंतर 30 दिवसांनी आणि उरलेली नत्राचीअर्धीमात्रा लागवडीपासून 60 दिवसांनी पिकाला द्यावे.

पाणी व्यवस्थापन- बडीसोप पिकाला पाणी व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. लागवडीच्या वेळेस जर जमिनीत ओलावा कमी असेल तर हलके ओलीत करावे. या नंतर जमिनीचा मगदूर आणि वातावरण लक्षात घेऊन 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पिकाला पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

3- काढणी व्यवस्थापन- बडीसोप च्या दाण्याच्या आकारावरून त्याची चव ठरत असते.साधारणपणे पूर्ण परिपक्व दाण्याच्या आकाराच्या निम्मा आकाराचे बडीसोप चवीला गोड व स्वादिष्ट असते. त्यामुळे अशा प्रकारचे बडीसोप काढणीस, फुले येणाऱ्या दिवसापासून 30 ते 40 दिवसांनंतर तयार होते. यावेळी पीक पिवळे होण्यास सुरुवात होते. अशा वेळेस उपरोक्त अवस्थेतील फांद्या, त्यावरील आंबेल काढून त्यांना सावलीत बांदल बांधून सुकवतात चांगल्या प्रतीची बडीसोप उत्पादनाकरिता परिपक्वतेच्या आधारावर पिकाचे पाच ते सहातोडेघेणे गरजेचे असते.

4-कीड व रोग व्यवस्थापन- बडीसोप पिकावर मोठ्या प्रमाणावर कीड व रोगाचे अतिक्रमण होत नाही. परंतु दमट हवामान व अतिशय थंडी यामुळे मावा याकिडीचा पिकावर उपद्रव होऊ शकतो. या किडीच्या नियंत्रणाकरिता डायमेथोएट पस्तीस टक्के प्रवाहीदहा मिलीप्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे. तसेच थंडीच्या दिवसात दहीया या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारी गंधकाची भुकटी 20% तीव्रतेची दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे.

English Summary: fertilizer water and cultivation management of fennel crop Published on: 27 January 2022, 05:56 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters