शेतीमध्ये व्यवस्थापनाचे विविध पैलू असतात. खतांचे व्यवस्थापन हा यापैकी एक महत्वाचा पैलू कारण कोणत्याही पिकाला जर योग्य खत योग्य प्रमाणात दिले गेले तर त्याचा फायदा निश्चितच दिसून येतो. मिरची व टोमॅटो या पिकांसाठी खत व्यवस्थापन कसे करावे हे जाणून घेऊया.
“मिरची” खत व्यवस्थापन :
लागवडीसाठी वाफे तयार करण्यापूर्वी २० ते २५ टन चांगले कुजलेले शेणखत प्रति हेक्टरी जमिनीत मिसळावे.
मिरची पिकासाठी १००:५०:५० किलो नत्र: स्फुरद : पालाश प्रति हेक्टरी द्यावे.
लागवडीच्या वेळी संपूर्ण स्फुरद, पालाश व अर्धा नत्राचा हफ्ता लागवडीनंतर ४ ते ६ आठवड्यांनी म्हणजे फलधारणेच्या वेळी द्यावा.लागवडीच्या वेळी २० ते २५ किलो फेरस सल्फेट व झिंक सल्फेट पर हेक्टर द्यावे.निंबोलीपेन्ड ८ ते १० बॅग प्रती हेक्टर द्यावे.
वरील सर्व खते म्हणजे NPK, मिक्रोनुट्रिएन्ट व निंबोलीपेन्ड हे बेड मध्ये भरावे व मातीने झाकावे.खतांची मात्रा दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे व नंतर मिरचीचे रोप लावावे.
“टोमॅटो” खतांचे व्यवस्थापन:
टोमॅटो हे पीक रासायनिक तसेच जैविक खतांचा चांगला प्रतिसाद देते.लागवडीसाठी क्षेत्र तयार करताना चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी २० टन शेतामध्ये मिसळावे.रासायनिक खतांमध्ये सरळ जातीसाठी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व १५० किलो पालाश.संकरित वाणासाठी ३००:१५०:१५० किलो नत्र: स्फुरद : पालाश प्रति हेक्टरी वापरावे.त्या रासायनिक खतांपैकी निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या अगोदर वाफ्यात टाकावे तर उरलेल्या निम्म्या नत्राच्या ३ ते ४ समान मात्रा २० दिवसाच्या अंतराने द्याव्यात.लागवडीच्या वेळी 20 ते 25 किलो फेरस सुल्फेट व झिंक सुल्फेट पर हेक्टर द्यावे.
निंबोलीपेन्ड 8 ते 10 बॅग पर हेक्टर द्यावे.वरील सर्व खते म्हणजे NPK, मायक्रोन्युट्रिएन्ट (सुक्ष्म अन्नद्रव्ये ) व निंबोलीपेन्ड हे बेड मध्ये भरावे व मातीने झाकावे. खते टाकल्यावर ताबडतोब पाणी देणे जरुरीचे आहे. रोपांची लागवड वरंब्याच्या बगलेत वाफ्यांना अगोदर पाणी देऊन करावी. त्यावेळी रोपांची मुळे सरळ खाली राहतील याची काळजी घ्यावी.
“मिरची व टोमॅटो” साठी फवारणी व ड्रीप द्वारे खत व्यवस्थापन
१९ : १९ : १९ लागवडीनंतर १५ व २५ दिवसांनी फवारणीतून ५ ग्रॅम प्रती लिटर किंवा ड्रीप मधून २ किलो प्रती एकर असे दोन वेळेस द्यावे.मायक्रोन्युट्रिएन्ट लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी फवारणीद्वारे ५ मि. ली प्रती लिटर किंवा ड्रीप मधून १ लिटर प्रती एकर द्यावे.फुलोरा अवस्थेत १३ : ४० : १३ व १२ : ६१ : १० दिवसाच्या आंतराने फवारणीद्वारे ७ ग्रॅम प्रती लिटर किंवा ड्रीप मधून ३ किलो प्रती एकर द्यावे.
मायक्रोन्युट्रिएन्ट लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी फवारणीद्वारे ५ मि. ली प्रती लिटर किंवा ड्रीप मधून १. ५ लिटर प्रती एकर द्यावे.
फळ धारण होत असतांना 00 : ५२ :३४ दोन वेळा १० दिवसांच्या आंतराने फवारणीद्वारे १० ग्रॅम प्रती लिटर किंवा ड्रीप मधून ५ किलो प्रती एकर द्यावे.फळ पोसत असतांना १३ : 00 : ४५ व 00 : 00 :५०, १० दिवसांच्या आंतराने फवारणीद्वारे १० ग्रॅम प्रती लिटर किंवा ड्रीप मधून ५ किलो प्रती एकर द्यावा.
Share your comments