खोडवा उसाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास,कमी खर्चात लागवडीची च्या ऊसा एवढेच उत्पादन मिळते व फायदेशीर ठरते. पश्चिम महाराष्ट्रात असे काही यशस्वी शेतकरी आहेत की ज्यांनी दहा खोडवे घेऊन चांगले उत्पादन घेतले आहे.
खोडवा उसाच्या अधिक उत्पादनासाठी टिप्स
- प्रभावी खोडवा उसाचे व्यवस्थापनासाठी- सर्वसाधारणपणे 15 फेब्रुवारी पर्यंत तुटलेला उसाचा खोडवा ठेवावा. 15 फेब्रुवारी नंतर घेतलेल्या खोडवा ऊसावर खोड किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
2.ऊस तोडणीच्या वेळी,पाचट ओळीत न लावता जागच्याजागी ठेवावे.शेतात एखाद्या ठिकाणी पाचटाचा डिग राहिल्यास तोपसरून द्यावा त्यानंतर उसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला सरीमध्ये लोटावेव वरून उसाचे बुडखे मोकळे करावेत. जेणेकरून त्यावर सूर्यप्रकाश पडून येणारे नवीनकोबं/ फुटवे जोरदार येतील.
- उसाचे बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत. त्यामुळे जमिनीखालील कोंब / डोळे फुटण्यास वाव मिळतोव फुटव्यांची एकूण संख्या वाढते.
जमिनीखालील येणारे कोंब / फुटवे जोमदार असतात. बुडख्याची छाटणी न केल्यास जमिनीच्या वरील काडीपासुन डोळे फुटतात असे येणारे फुटवे कमजोर असतात व क्वचितच त्यांचे उसात रूपांतर होते.
4.बुडख्याच्या छाटणीनंतर लगेचच o.1% टक्के बाविस्टीन ( एक ग्रॅम बाविस्टीन एक लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणाची ) या बुरशीनाशकाची फवारणी करावी. त्यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगाचा प्रतिबंध होतो.
. शेतात सरीमध्ये ठेवलेल्या पाचटावर प्रति हेक्टरी 80 किलो युरिया +100 किलो दाणेदार सुपर+10 पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धन सेंद्रिय खतामध्ये अथवा ओलसर मातीमध्ये मिसळून समप्रमाणात पाचटावर पसरून टाकावे. पाचट कुजण्यास आधी नत्र,स्फुरद व पाचट कुजविणारे जिवाणूंची गरज असते.
- खोडव्याला पाणी दिल्यानंतर तीन ते चार दिवसांनी वाफसा आल्यावर रासायनिक खतांचा पहिला डोस द्यावा. ही खते पहारी सारख्या अवजाराच्या साहाय्याने जमिनीत वाफसा असताना दोन समान हप्त्यात विभागून द्यावी.
7.पहिला खताचा डोस- 15 दिवसाच्या आत पूर्ण करावा. यासाठी पहारीने किंवा कुदळीने बुडख्यापासून15 ते 20से.मीअंतरावर वरंब्याच्या बगलेत15ते 20से. खोल सर घेऊन, दोन चरातील अंतर 30. से. मी ठेवून सरीच्या एका बाजूला पहिला रासायनिक खतांचा डोस द्यावा.
- दुसरा खताचा डोस – सरीच्या विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने 120 दिवसांनी (4 महिन्यांनी )द्यावा. ही खते दिल्यानंतर नेहमीप्रमाणे पाणी द्यावे.
- सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता टाळण्यासाठी एकरी 25 किलो Fes04 20 किलो zns04 10 किलो mns04 व 5 किलोBorax ही सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते 1:10या प्रमाणात सेंद्रिय खतात मिसळून द्यावीत.
- खोडवा उसाच्या अधिक उत्पादनासाठी हेक्टरी 60 किलो सल्फर( म्हणजेच एकरी 25 किलो सल्फर हे महादन FRTबसल्फ याखतातून द्यावे.
- खोडवा उसाचे अधिक व हमखास उत्पादनासाठी,खोडवा उसावर विद्राव्य खतांच्या 2 फवारण्या खोडवा घेतल्यानंतर 30 व 45 दिवसांनी घ्याव्यात.
- विद्राव्य खतांच्या पहिल्या फवारणीसाठी Chelated combi 1ग्रॅम +calium Nitrate + 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. यामुळे नवीन मुळे व जोमदार फुटवे येतात.
- विद्राव्य खताचा दुसरा फवारणीसाठी -24:24:00+13:00:45 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. यामुळे शाखीय वाढीचा जोम वाढतो.
Share your comments