1. कृषीपीडिया

नोव्हेंबरमध्ये करावयाची शेतीची कामे

रब्बी पिकाची काळजी अशी घ्या गहू :गव्हाची पेरणी करणेसाठी ऑक्टोबर महिन्यातील संदेशाचा अवलंब करावा. पेरणीपुर्वी प्रति किलो बियाण्यास थायरम अथवा कँप्टन २.५ ग्रॅम या बुरशीनाशकाची अधिक प्रती १० किलो बियाण्यास अँझोटोबँक्टर किंवा अँझोस्पीरीलम आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणूचे प्रत्येकी २५० ग्रँमचे एक पाकीट घेऊन बिजप्रक्रीया करावी बागायती गव्हास अर्धे नत्र, संपुर्ण स्फुरद, पालाश पेरणीचेवेळी द्यावे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
नोव्हेंबरमध्ये करावयाची शेतीची कामे

नोव्हेंबरमध्ये करावयाची शेतीची कामे

हरभरा :

बागायती हरभरा पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी. पेरणीचे अंतर ३० ×१० सें.मी. ठेवावे. २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद प्रति हेक्टरी पेरणीचे वेळी द्यावे बियाणे जाती परत्वे ६० ते १०० किलो प्रति हेक्टरी वापरावे प्रतिकिलो बियाण्यास २ ग्रँम थायरम + २ ग्रँम कार्बेन्डँझीम यांची बिजप्रक्रीया करावी. तसेंच पेरणीपुर्वी बियाण्यास रायझोबियम व स्फुरद जिवाणूसंवर्धनाची २५० ग्रँमचे प्रत्येकी एक पाकीट घेऊन प्रति १० किलो बियाण्यास बिजप्रक्रीया करावी या सोबतच अगोदर दिलेले हरभरा लागवड तंत्रज्ञान मेसेचा अवलंब करावा.

 

करडई :

पेरणी झालेल्या पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच पुढीलपैकी एक किटकनाशक फवारावे. डायमिथोएट (रोगार) ३० इ.सी. ५०० मि.ली. किंवा मँलेथिऑन ५० इ.सी. १००० मि.ली. ५०० लिटर पाण्यातून फवारावे किंवा क्विनॉलफॉस १.५ टक्के भुकटी २० किलो प्रतिहेक्टरी धुरळावी. अथवा ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी क्रायसोपर्ला कार्नीयाच्या १० ते १५ हजार अळ्या प्रतिहेक्टरी पिकावर सोडाव्यात.

 

पुर्वहंगामी ऊस लागवड 

लागवड १५ नोव्हेंबर पर्यत पूर्ण करावी.या पूर्वी दिलेले पूर्व हंगामी ऊस लागवड तंत्रज्ञान सर्व भाग अवलंब करावा.

रब्बी सुर्यफुल :

पेरणी १५ नोव्हेंबर पर्यत करावी. पेरणीपुर्वी बियाण्यावर अँझोटोबँक्टर व स्फुरद जीवाणू प्रत्येकी २५० ग्रँम प्रती १० किलो बियाण्यावर बिजप्रक्रीया करावी. रासायनिक खते ६०:३०:३० किलो नत्र, स्फुरद पालाश प्रति हेक्टरी द्यावे. यापैकी ३० किलो नत्र, संपुर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्यावेळी दुचाडी पाभरीने पेरून द्यावे उरलेले ३० किलो नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी पाण्याच्या पाळीपूर्वी द्यावे.

रब्बी ज्वारी :

बागायत रब्बी ज्वारीस राहीलेला ५० टक्के नत्राचा हप्ता पीक पेरणीनंतर ३० दिवसांनी द्या. पीक पहिले ३० ते ३५ दिवस कोळपण्या किंवा खुरपण्या देऊन तणमुक्त ठेवा शक्य असल्यास कोरडवाहू ज्वारीस आच्छादनांचा वापर करा कोरडवाहू पिकात २ ते ३ वेळा आंतरमशागत करून जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणेचा प्रयत्न करा.

 

तूर :

तुरीवरील शेंगाचे नुकसान करणा-या पिसारी पतंग, शेंगावरील माशी, घाटेअळीच्या नियंत्रण करा. किनॉलफॉस २५ इ.सी. ८०० मि.ली. किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ डब्ल्यू. एस. सी. ५५० मि.ली. ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेंगा पोखरणा-या अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेण्झोएट यांची फवारणी करावी.तुरीवरील घाटेअळीच्या नियंत्रणासाठी एचएनपीव्ही च्या रोगग्रस्त २५० अळ्यांची (एलई/हे.) पहिली फवारणी पीक फुलो-यात असताना करावी.

 

 

पेरू :

मृग बहाराच्या फळाची काढणी चालू ठेवावी. ज्याठिकाणी आंबेबहार धरावयाचा असेल त्या बागेचे पाणी तोडावे. ज्या बागेतील पूर्वीच्या हंगामातील फळे संपली आहेत त्या बागा स्वच्छ करून झाडांना व्यवस्थीत आकार द्यावा. पेरूवरील फळकुजवा देवी रोगाच्या नियंत्रणासाठी प्रोपिकोनाझोल ५०० ग्रँम किंवा कार्बेन्डँझिम ५०० ग्रँम किंवा मँन्कोझेब १२५० ग्रँम यांची ५०० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या कराव्यात.

 

बोर :

फळ पोखरणा-या अळीच्या बंदोबस्तासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के १० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच भुरीरोगाच्या बंदोबस्तासाठी बुरशीनाशकाच्या ८-१० दिवसाचे अंतराने २-३ फवारण्या कराव्यात.

अंजीर :

अंजिरावरील तांबेरा रोग नियंत्रणासाठी क्लोरोथँलोनिल १००० ग्रँम प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून दर १५ दिवसांचे अंतराने फवारावे. तुडतुडे व खवले किडीच्या नियंत्रणासाठी वरील औषधात डायमेथोएट ३० इ.सी. ५०० मि.ली. फवारावे.

 

लिंबू :

हस्तबहार धरला असल्यास राहिलेला नत्राचा अर्धा हप्ता प्रतिझाड ४०० ग्रँम द्यावा लिंबावरील किड व खै-या रोगाचे नियंत्रणासाठी ५०० लिटर पाण्यात मोनोक्रोटोफॉस ३६ डब्ल्यू.एस. ७०० मि.ली. अथवा डायमेथोएट ३० इ.सी.८२५ मि.ली. अथवा मँलेथिऑन ५० इ.सी. ७०० मि.ली. + स्ट्रीप्टोमायसीन ५० ग्रँम व मॅनकोझेब एकत्र मिसळून फवारावे. आवश्यकतेनुसार १५-१५ दिवसांच्या अंतराने ४ फवारण्या कराव्यात.

 

जनावरांची काळजी अशी घ्या 

खरीपातील काढणी केलेल्या चा-याची व्यवस्थीत साठवणूक करा.

सुबाभळमध्ये मायमोसीन व इतर सर्व झाडपाल्यामध्ये टँनिन हे अपायकारक पदार्थ आहेत. प्रमाणापेक्षा जास्त झाडपाला खाऊ घातल्यास जनानरांच्या शरीरात अपायकारक पदार्थाचे प्रमाण वाढते, सुबाभळीचा पाला जास्त खाऊ घातल्यास जनावरांच्या अंगावरील केस गळून पडतात. यामुळे दिवसभरात खाऊ घातलेल्या चा-यात सुबाभळीच्या चा-याचे प्रमाण १/३ पेक्षा कमी ठेवा त्यामुळे कोणताहि उपाय होत नाही.

रब्बी हंगामातील ओट या चारा पिकाची ३० सें.मी. अंतरावर पेरणी करा. पेरणीसाठी १०० कि.ग्रँ. प्रती हेक्टर बी वापरावे व पेरणीच्यावेळी हेक्टरी १०० कि.ग्रँ. व ५० कि.ग्रँ. स्फुरद द्यावे ओट पिकाच्या केंट, आर.ओ.१९ किंवा फुले हरीता या वाणांचा वापर करा. तसेच मका या चारापिकाची ३० सें.मी. अंतरावर पेरणी करा. पेरणीसाठी हेक्टरी ७५ कि.ग्रँ. बी वापरा पेरणीच्यावेळी हेक्टरी १०० की.ग्रँ. नत्र ५० कि.ग्रँ. पालाश द्यावे. मका चारा पिकासाठी ऑफ्रीकन टॉल, मांजरी कंपोझीट, गंगा सफेद-२ या वाणांचा वापर करा. लसूण घास, बरसीम या चारा पिकांची ३० सें.मी. अंतरावर पेरणी करा. पेरणीसाठी हेक्टरी २५ कि.ग्रँ. बी वापरा, लसूण घासास पेरणीचेवेळी हेक्टरी १५ कि.ग्रँ. नत्र, १५० कि.ग्रँ. स्फुरद व ४० कि.ग्रँ. पालाश द्या तर बरसीम पिकास पेरणीचेवेळी १५ कि.ग्रँ. नत्र, ९० कि.ग्रँ. स्फुरद ३० कि.ग्रँ. पालाश द्या. लसूण घासाचे आर.एल. ८८, सिरसा-९, आनंद-२, आनंद-३ हे वाण पेरावेत तसेंच बरसीम या चारा पिकाच्या वरदान-४, जे.बी.-१, मेस्काबी या वाणांची लागवड करावी. हिवाळा हा निरोगी ऋतू समजला जातो. जनावरांचे, पक्ष्यांचे योग्य व्यवस्थापन केल्यास चांगला फायदा मिळतो. पशुखाद्यामध्ये अधिक ऊर्जा निर्माण करणाऱ्या पदार्थांचा (उदा. ज्वारी, गहू, मका यांचा भरडा इत्यादी) वापर करावा. पैदाशीकरिता वापरण्यात येणाऱ्या वळूंना योग्य आहार व्यायाम द्यावा आहारात भरडधान्य, शेंगदाणा पेंड, खनिज, क्षारमिश्रण व वाळलेला चारा यांचा समावेश करावा. जनावरांच्या वापरासाठी जास्त थंड पाण्याचा वापर टाळावा. यासाठी हौदात साठविलेल्या पाण्यापेक्षा विहीर अथवा बोअरच्या ताज्या पाण्याचा वापर करावा. ते पाणी साठविलेल्या पाण्याच्या तुलनेत कमी थंड असते.

एका महिन्यापर्यंतच्या वासरांची विशेष काळजी घ्यावी लहान वासरे, गाभण गाईंच्या बसण्याच्या ठिकाणी भुश्‍याच्या आच्छादनाचा वापर करावा. गाभण जनावरांची वेगळी व्यवस्था अधिक उबदार ठिकाणी करावी. जेणेकरून त्यावर लक्ष ठेवणे शक्‍य होईल. जनावरांच्या गोठ्यात सिमेंटचा कोबा असल्यास खबरदारी महत्त्वाची आहे, कारण असा कोबा तुलनेने अधिक थंड असतो. याशिवाय थंडीचा जोर अधिक असणाऱ्या कालावधीमध्ये उष्णतानिर्मितीसाठी शेकोटी, विद्युत बल्बचा वापर करावा दूध काढतेवेळी कास धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. जनावरांना सतत धुण्यापेक्षा केवळ खरारा करण्यास प्राधान्य द्यावे. शक्य असल्यास जनावर धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा पहाटेच्या वेळी जनावरांचे निरीक्षण काळजीपूर्वक करावे.  थंडीमुळे जनावरांच्या आरोग्यास अपाय नसला तरी व्यवस्थापनाच्या दृष्टीने जनावरे रात्री व पहाटे गोठ्यातच ठेवावीत. जनावरांची क्षय, बुळकांडी, सांसर्गिक गर्भपात विषयक तपासणी करून घ्यावी पावसाळ्यातील अस्वच्छ पाण्यामुळे पोटात झालेले परजीवी कमी करण्यासाठी जंतनाशक औषधांची मात्रा जनावरांना हिवाळ्याच्या सुरवातीसच द्यावी.  चांगल्या आरोग्यामुळेच जनावरांच्या प्रजननाची क्रिया हिवाळ्यात सुरू राहते. या ३ ते ४ महिन्यांत प्रत्येक जनावराची प्रजनन प्रक्रिया सुरू आहे किंवा नाही याबाबत पशुपालकांनी जागरूकता ठेवावी.

हिवाळ्याच्या पोषक वातावरणाचा फायदा जनावरांच्या प्रजननाच्या दृष्टीने पुरेपूर घेण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी व्यायलेल्या गाई, म्हशीसुद्धा या काळात माजावर येऊन गाभण राहतील याकडे लक्ष द्यावे. कोंबड्यांच्या व्यवस्थापनाचीही या काळात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. याकरिता कोंबड्याच्या खाद्यात अधिक ऊर्जेचा पुरवठा करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढवावे. कोंबड्यांच्या पिल्लांच्या शरीराचे तापमान नियंत्रित करता येत नाही. तापमान नियंत्रित करण्यासाठी पिलांना अतिरिक्त उष्णतेची आवश्‍यकता असते. दर आठवड्याला खालीलप्रमाणे पिलांच्या शरीराचे तापमान राहील याची व्यवस्था करावी.

संकलन : प्रविण सरवदे,कराड

English Summary: Farming to be done in November Published on: 08 November 2021, 07:01 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters