1. कृषीपीडिया

Farming Business Idea: 'या' औषधी वनस्पतीची शेती करा अन कमवा लाखों; कसं ते वाचा

शेतकरी मित्रांनो सध्या देशात सर्वत्र औषधी वनस्पतीची मोठी मागणी बघायला मिळत आहे. यामुळे औषधी वनस्पतीची शेती शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर ठरत आहे. मित्रांनो तुम्हीदेखील शेती व्यवसायातून कमी खर्चात अधिक उत्पन्न प्राप्त करू इच्छित असाल तर निश्चितच औषधी वनस्पतींची शेती आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
aloe vera farming

aloe vera farming

शेतकरी मित्रांनो सध्या देशात सर्वत्र औषधी वनस्पतीची मोठी मागणी बघायला मिळत आहे. यामुळे औषधी वनस्पतीची शेती शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर ठरत आहे. मित्रांनो तुम्हीदेखील शेती व्यवसायातून कमी खर्चात अधिक उत्पन्न प्राप्त करू इच्छित असाल तर निश्चितच औषधी वनस्पतींची शेती आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

औषधी वनस्पती पैकी प्रमुख असलेले कोरफडची शेती देखील शेतकऱ्यांना अधिक फायद्याची ठरणार आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते कोरफड शेतीतून खर्चापेक्षा पाचपट अधिक नफा मिळवला जाऊ शकतो. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया कोरफड शेतीविषयी सविस्तर.

महत्वाच्या बातम्या:

Successful Farmer: झेंडूची शेती ठरली शेतकऱ्यासाठी वरदान! झेंडु शेतीतुन कमवतोय लाखों

बातमी कामाची! या फळाची शेती करा आणि कमवा चार लाखांचा नफा; वाचा सविस्तर

मित्रांनो माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की, सध्या कोरफडीची मागणी झपाट्याने वाढत आहे. कॉस्मेटिक उत्पादन असो किंवा आयुर्वेदिक औषध असो, कोरफड सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. यामुळे बाजारात याला चांगला भाव मिळतं आहे.

यामुळे कोरफड शेतीतून भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. याची शेती आजकाल भारतात खूप प्रचलित होतं आहे. कोरफड पिकासाठी शेतात जास्त ओलावा लागतं नाही. जिथे पाणी साचत नाही अशा शेतात हे पीक घेतले जाते. वालुकामय माती असलेल्या जमिनीत याची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळत असल्याचे सांगितले जाते.

मित्रांनो कोरफड शेती करण्यासाठी चांगली माहिती असणे मात्र आवश्यक आहे. कोरफड शेतीमध्ये स्वच्छता ठेवावी लागते यासाठी वेळोवेळी निंदनी तसेच खुरपणी करणे अति महत्त्वाचे आहे. या झाडांना कीटकांचा प्रादुर्भाव लवकर होतो, त्यामुळे कीटकनाशकांचा वापर करणे आवश्यक आहे. परंतु कीटकनाशकासाठी युरिया किंवा डीएपीचा वापर करू नये अल्ला कृषी वैज्ञानिक देत असतात. खरं पाहता कोरफडीच्या अनेक जाती आहेत.

मात्र बार्बाडेन्सिस प्रजाती सध्या व्यावसायिक स्तरावर शेती करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवड करत आहेत. ही जातं चांगल्या कमाईसाठी सर्वाधिक वापरली जात आहे. ज्यूस बनवण्यापासून ते कॉस्मेटिक वस्तू बनवण्यापर्यंत त्याचा वापर केला जातो. या जातीच्या कोरफडला अधिक मागणी असल्यामुळे, शेतकर्‍यांना देखील या जातीच्या कोरफडीचे उत्पादन घ्यायला अधिक आवडते. या जातीच्या कोरफडची पाने मोठी असतात आणि त्यातून अधिक जेल मिळतं असते. इंडिगो प्रजाती देखील चांगली मानली जाते, जी सामान्यतः आपल्या घरांमध्ये बघायला मिळते.

केव्हा केली जाते कोरफड लागवड 

कोरफडीची लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यात केली जाते. मात्र, असे असले तरी या शेतीची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची वर्षभर कधीही लागवड केली तरी नुकसान होत नाही. एका रोपापासून दुस-या रोपातील अंतर 2 फूट असावे. एकदा लागवड केल्यानंतर त्यांची वर्षातून दोनदा काढणी करून त्यांची विक्री करून नफा कमावता येतो. शिवाय कोरफड पिकाला वन्यप्राण्यांपासून कोणतेही नुकसान होतं नाही.

कोरफडीपासून 5 पट फायदा

एका बिघा शेतात 12,000 कोरफडीची रोपे लावता येतात. कोरफडीच्या रोपाची किंमत 3 ते 4 रुपये असते. म्हणजेच एका बिघामध्ये कोरफडीची लागवड करण्यासाठी सुमारे 36 हजार रुपये रोपांसाठी खर्च करावे लागतील याशिवाय दहा हजार रुपये मजुरीवर खर्च येणार आहे. कोरफडीच्या एका रोपातून 4 किलो पर्यंत पाने निघतात. एका पानाची किंमत सात ते आठ रुपयांपर्यंत आहे.

किती होणार कमाई 

कोरफडीची पाने विकून तुम्ही मोठा नफा कमवू शकता. याशिवाय याच्या जेलपासून देखील तुम्ही चांगला बक्कळ नफा कमवू शकता. कोरफडीची पाने तसेच कोरफड जल थेट कंपन्यांना विकू शकता. ज्यातून भरपूर पैसे मिळतील. केवळ एक बिघामध्ये पाने विकून लाखो रुपये कमवले जाऊ शकतात.

English Summary: Farming Business Idea: Cultivate 'or' Medicinal Plants and Earn Millions; How to read it Published on: 10 May 2022, 02:07 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters