गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये अनेक बदल होत गेले आहेत. आधुनिक शेती करून शेतकरी मोठ्या प्रमाणावर पैसे कमवत आहेत. अनेक शेतकरी मोठी पिके घेण्यापेक्षा छोट्या पिकांकडे वळाले आहेत. टोमॅटो देखील एक प्रमुख भाजीपाला वर्गीय पिकं (Vegetable Crop) आहे, टोमॅटोची शेती (Tomato Cultivation) आपल्या देशात मोठ्या प्रमाणात केली जाते. टोमॅटोमध्ये देखील अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर पैसे कमवत आहेत.
अनेक शेतकरी हे नित्यनियमाने टोमॅटोची लागवड करतातच, टोमॅटोच्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी बरेच शेतकरी प्रगत शेती (Agriculture) तंत्राचा अलीकडे वापर करू लागले आहेत. टोमॅटोची आधुनिक तंत्रज्ञानाने लागवड केल्यास दुप्पट उत्पन्न मिळत असल्याचा दावा केला जात आहे. या आधुनिक शेती तंत्रांमध्ये स्टॅकिंग तंत्राचा समावेश आहे, ज्याचा अवलंब केल्याने केवळ उत्पादनच वाढत नाही तर कीटक आणि रोगांसारखे धोके देखील कमी होत आहेत.
टोमॅटोमधून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी पेरणी-लावणीची कामे काळजीपूर्वक करणे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे लागवडीपूर्वी मुळांमध्ये बुरशीनाशकासह बिजोपचार केले पाहिजे. मुळांवर बिजोपचार केल्याने टोमॅटोला योग्य रंग, दर्जेदार आणि निरोगी फळे मिळतात. यामुळे ठिबकद्वारे ते सोडल्यास त्याचा फायदा होतो. तसेच बाजार भावाचा अंदाज घेऊन चांगल्या प्रकारे अजून जास्तीचे पैसे मिळू शकतात.
आता सर्व सोलरपंप अर्जांना मिळणार मंजुरी, शिंदे सरकारचा मोठा निर्णय
सिंचनानंतर वेलीवर्गीय भाजीपाला कुजण्यास सुरुवात होते, परंतु स्टॅकिंग पद्धतीने ही समस्या देखील दूर केली जाते. या पद्धतीने टोमॅटो पिकवल्याने जमिनीवर फारसे अतिक्रमण होत नाही. तसेच या पद्धतीने प्रत्येक ओळीत 5 मीटर अंतरावर 2 मीटर उंच बांबू किंवा जाळी लावली जाते, जेणेकरून त्यावर वेली गुंडाळता येतील. अनेक शेतकरी नायलॉन दोरी वापरतात आणि वेलींच्या वरच्या टोकाला दोरीने बांधतात. यामुळे चांगले उत्पादन मिळेल.
काय सांगता! आता 3 दिवस काम 4 दिवस सुट्टी, वाचा नवीन अपडेट
दरम्यान, वर्षातून दोन दोन पीक घेऊन अनेक शेतकरी लाखो रुपये कमवत आहेत. एका शेतकऱ्याने अडीच कोटी रुपये देखील कमवल्याच्या बातम्या येत होत्या, अनेककदा दर पडल्याने शेतकरी टोमॅटो हा फेकून देतात. यामुळे कधी कधी मोठे नुकसान देखील होते. कोरोनानंतर काही दिवसांपासून टोमॅटोला चांगले दर मिळत आहेत. यामुळे शेतकरी समाधानी आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांना कोट्यावधील गंडा घालणारा अटकेत! उकीरड्यात पुरुन ठेवलेले लाखो रुपये..
शेतकऱ्यांनो दुग्धव्यवसायातील यशाचा पासवर्ड जाणून घ्या..
जायकवाडी धरण 60 टक्के भरले, मराठवाड्यातील शेतकरी खुश...
Share your comments