कपाशीचा वाण निवडताना कोरडवाहू किंवा बागायती लागवडीचा प्रकार व वाणाचे गुणधर्म यांचा विचार करावा. सर्व प्रकारच्या हवामानास व जमिनीस अनुकूल वाण असावे. आपल्या भागात उत्पादनात सरस असणारा वाण निवडावा.
वाऱ्यामुळे न पडणारे वाण असावे. रसशोषण करणाऱ्या किडी व रोगांना सहनशील/ प्रतिकारक्षम वाण असावा. शेवटपर्यंत पाने हिरवी राहिल्यास अन्न तयार करण्याचे काम अखेरपर्यंत चालते. त्यामुळे उशिरा लागणार्या बोंडांचा सुद्धा आकार मोठा राहतो व बोंडे फुटण्याचे प्रमाण वाढते.
बागायती लागवडीसाठी माध्यम ते उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे वाण निवडावे.
बोंडांचा आकार बागायती लागवडीसाठी मोठा व कोरडवाहू लागवडीसाठी मध्यम असावा.
राज्यातील काँग्रेसच्या एकमेव खासदाराचे निधन! चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे निधन
पाण्याचा ताण सहन करणारा वाण निवडावा. बोंडे चांगली फुटणारा व धाग्याची प्रत चांगली असणारा वाण निवडावा, त्यामुळे कपाशीला चांगला बाजारभाव मिळू शकेल. वरील गुणधर्माप्रमाणे आपला मागील हंगामातील अनुभव तसेच आपण स्वतः इतर शेतकर्यांच्या शेतावरील पीक पाहून कपाशीच्या वाणाची निवड करावी.
गुलाबी लसूण एक वरदान! खासियत आणि फायदे जाणून वाटेल आश्चर्य
अधिक उत्पादन देणारे वाण बाजारात उपलब्ध असून त्यांचे त्या-त्या वाणाच्या गुणधर्मानुसार योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास निश्चितपणे चांगले उत्पादन मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल.
भारतात सोन्याच्या माशांचा व्यवसाय ठरतोय फायदेशीर, एक लाख रुपये गुंतवून होतोय फायदा..
गुलाबी लसूण एक वरदान! खासियत आणि फायदे जाणून वाटेल आश्चर्य
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील 25 हजार शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर
Share your comments