शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन पिके घेऊन चांगले उत्पन्न घेत असतात. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना नवीन पिकांविषयी माहिती नसते, त्यामुळे भारतात नवीन पिके खूप उशिरा घेतली जातात. आज आपण अशाच एका नवीन पिकाविषयी माहिती घेणार आहोत.
आज जांभळा टोमॅटो याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ज्याच्या लागवडीने शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. अँटी-ऑक्सीडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे ते कर्करोग, हृदयविकार आणि वृद्धत्वाची समस्या देखील दूर करेल.
देशातील बहुतांश शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन टोमॅटो लागवड आहे. याशिवाय आरोग्यासाठीही अनेक फायदे देतात. सहसा बाजारात हिरव्या, पिवळ्या आणि लाल, केशरी रंगाच्या चमकदार टोमॅटोने भरलेले असते. परंतु आता लवकरच जांभळा टोमॅटो देखील लागवडीमध्ये सामील होणार आहे.
ऐण सणासुदीच्या काळात तांदूळ महागणार; सर्वसामान्यांना मोजावे लागणार जादा पैसे
जांभळा टोमॅटो हा सामान्य टोमॅटो नसून त्यात कॅन्सरविरोधी गुणधर्म आहेत, ज्याची लागवड केल्यावर शेतकऱ्यांची कीड-रोगांच्या समस्येपासून सुटका होईल. टोमॅटोची ही विविधता युरोपियन शास्त्रज्ञांनी स्नॅपड्रॅगन फ्लॉवरच्या डीएनएपासून तयार केली आहे.
सरकारच्या 'या' योजनेत 1 लाख रूपयांचे होतील 5 लाख रुपये; एकदा गुंतवणूक करून पहाच
जांभळा टोमॅटो ही गुणांची खाण आहे
माहितीनुसार सुमारे 14 वर्षांपूर्वी, इटली, यूके, जर्मनी आणि नेदरलँडच्या शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय टीमने एका संशोधन प्रयोगशाळेत जांभळा टोमॅटो विकसित केला होता. इतक्या वर्षांनंतर आता अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) त्याला मान्यता दिली आहे.
यूएस कृषी विभागाने अहवाल दिला आहे की जांभळ्या टोमॅटोमध्ये सामान्य जातींपेक्षा अळीचा प्रादुर्भाव कमी असतो. आता या जीएम टोमॅटोची लागवड आणि प्रजनन अमेरिकेतही करता येईल.
जांभळ्या टोमॅटोची शेती विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, ज्यांना सामान्य भाज्या खायला आवडत नाहीत त्यांच्यासाठी जांभळा टोमॅटो हा पर्याय उत्तम ठरू शकतो. संशोधनानुसार या जांभळ्या टोमॅटोच्या साली आणि आतील लगदा सामान्य टोमॅटोपेक्षा जास्त अँथोसायनिन्स आढळतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
महत्वाच्या बातम्या
रात्री शांत झोप लागत नसेल तर एकदा 'हा' झोपेचा चहा प्या; मिळेल आरामदायक फायदा
दिवसाला फक्त 45 रुपये वाचवा आणि व्हा 25 लाखांचे मालक; जीवन आनंद योजना देतेय संधी
२४ सप्टेंबरला तब्बल ५९ वर्षांनी राजयोग: 'या' ५ राशींना पद, पैसा, प्रतिष्ठेचे मिळणार वरदान
Published on: 20 September 2022, 11:13 IST