ग्रामीण भागातील बहुसंख्य नागरिक हे मोठ्या प्रमाणात शेती करतात. आर्थिक मदत होण्यासाठी शेतकरी अनेक प्रकारच्या फळ भाज्यांची लागवड करतात. यात भाजीपाल्याची शेती भेंडी एक फळ भाजी आहे, ही भाजी भारतात जवळ-जवळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते. भेंडीच्या फळात कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्य आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात.
जमीन व हवामान
भेंडीचे पीक हलक्या मध्यम तसेच भारी जमिनीत घेता येते. परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी. खरीप व उन्हाळी हंगामात पीक चांगले येते. विकास 20 ते 40 सेल्सिअस तापमान चांगले मानवते. पाण्याची कमतरता असताना इतर भाज्यांपेक्षा भेंडीचे पीक चांगले येते. उन्हाळ्यात भाज्यांचे कमतरता असताना तर भेंडीला बाजारात फारच मागणी असते.
वर्णन
भेंडीवरील व्हायरस हा रोग पांढऱ्या माशीमुळे होतो. येलो वेध मोसाइक व्हायरस सारखा रोग भेंडीमध्ये 50 ते 90 टक्के नुकसान करतो.
लक्षणे
पानांमधील पूर्ण शिरा पिवळसर होतात. मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे नवीन पाने पिवळी पडतात. पानांचा आकार कमी होतो आणि झाडांची वाढ खुंटते.
प्रतिबंधक उपाय
प्रतिरोधक वाण लावा. भेंडीच्या पिकामध्ये झेंडू पीक सापळा पीक म्हणून लावा. इमिडाक्लोप्रिड कॉन्फिडोर (बायर) प्रमाण 4.0 मिली प्रति किलो बियाणे
हेही वाचा : शेतीतून अधिक उत्पन्न येण्यासाठी अशी करावी शेतीची पूर्व तयारी
उपायोजना
थायोमिथक्सा सिजेंटा प्रमाण 80.0 ग्रॅम प्रती एकर. वाण पुसा सावनी सिलेक्शन 2-2 फुले उत्कर्षा, परभणी क्रांती, अनामिका या सुधारित जाती लागवडीस योग्य आहे.
बियांचे प्रमाण
खरीप हंगामात फॅक्टरी आठ किलो आणि उन्हाळ्यात 10 किलो बियाणे पुरेसे होते एक किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन ग्रॅम थायरम चोळावे.
पूर्वमशागत व लागवड
जमिनीची मशागत एक नांगरट व दोन कुळवणी करून जमीन भुसभुशीत करावी. एकतरी पेरणीसाठी खरीप हंगामात दोन ओळीतील अंतर सहा सेमी ठेवावे. आणि उन्हाळ्यात 45 सेमी ठेवावे. एक ओळीतील दोन झाडातील 30 सेंमी अंतर राहील अशा बेताने बी टोकावे. प्रत्येक ठिकाणी दोन बिया यांनी टोकणी करावी. उन्हाळ्यात सऱ्या पाडून वरंब्याच्या पोटाशी बी टोकावे. शेतात ओलवणी करून वापसा आल्यानंतर बी पेरावे.
Share your comments