नियंत्रणाचे उपाय
तापमानवाढ आणि आर्द्रतेत घट झाल्यास उसावरील खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढत जातो. जे शेतकरी हलक्या जमिनीत उसाची लागण करतात, त्याचप्रमाणे 15 फेब्रुवारीनंतर खोडवा ठेवतात, अशा भागात या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसतो. नुकसानीचा प्रकार पाहता खोडकिडीची मादी पानांच्या खालच्या बाजूस अंड्याचे पुंजके घालते. ही अंडी लांब, गोलाकार, सपाट व एका रेषेत असून रंगाने पांढरी असतात.
अंड्यातून बाहेर आलेली अळी 17 ते 38 तास पानांवर फिरते व नंतर ती उसाच्या सुरळीत अगर जमिनीलगत खोडात शिरते आणि आतील गाभ्यावर उपजीविका करते, त्यामुळे पोंगे वाळतात व कोंब मरतो. शिवाय फुटवा आल्यावर त्याच्यावरही प्रादुर्भाव होऊन फुटवेही मरतात. या सुरळीचा वास उग्र येतो. खोडकिडीमुळे 22 ते 33 टक्के उसाचे वजन घटते. ही कीड 26 ते 65 टक्के मूळ उसाचे नुकसान करते. शिवाय अशा उसात एक ते दीड टक्का साखरउताराही कमी मिळतो.
सुरवातीच्या फुटव्यांचे आठ ते नऊ, दुसऱ्या 27 ते 28, तर तिसऱ्या फुटव्यांचे 75 टक्के नुकसान करते. जर प्रादुर्भाव जास्तच झाल्यास जवळ जवळ 80 ते 90 टक्के कोंब मरून जातात. पर्यायाने उत्पादनात कमालीची घट येते.
नियंत्रणाचे उपाय
1) लागवड केलेल्या उसाची बाळबांधणी 45 ते 50 दिवसांनी करावी, म्हणजे खोडकिडीची छिद्रे बंद होतील व पतंग बाहेर पडण्याचा मार्ग बंद होईल.
2) उन्हाळ्यात पाण्याच्या पाळीमधील अंतर कमी करावे.
3) खोडकिडीची अंडी व कीडग्रस्त पोंगे अळ्यांसह गोळा करून नष्ट करावीत.
4) उसात मका किंवा ज्वारीसारखी पिके घेऊ नयेत.
5) खोडकिडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून आल्यास दीड मि.लि.
5 टक्के निंबोळी अर्क प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. (हेक्टरी फवारणीसाठी 700 मि.लि.अझाडीरेक्टिन ,निंबोळी अर्क प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.) साधारणपणे प्रादुर्भाव पाहून 15 दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार दोन ते तीन फवारण्या कराव्यात. फवारणीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
तैवानच्या टरबूजाच्या शेतीतून 4 महिन्यांत 60 लाखांची कमाई, जाणून घ्या शेतीची पद्धत
जैविक पद्धतीने नियंत्रण करताना खोडकिडीच्या प्रादुर्भावाने प्रथम पोंगा (सुरळी) वाळलेला दिसल्यास तीन ते चार फुले ट्रायकोकार्ड प्रति हेक्टर प्रसारणासाठी लावावेत. आवश्यकतेनुसार दहा दिवसांच्या अंतराने चार ते सहा प्रसारणे करावीत. ट्रायकोग्रामा हे कीटक खोडकिडींनी जी अंडी घातलेली असतात, त्या अंड्यामध्ये अंडी घालतात, त्यामुळे आपोआपच खोडकिडीचे नियंत्रण मिळते. खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी करता येतो.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो खतातील बनावटपणा असा ओळखा, पिकाचे नुकसान होणार नाही..
शेतकऱ्यांनो 'या' पद्धतीने पेरूची लागवड करा, कमी वेळात जास्त उत्पन्न मिळेल
टोमॅटोचे प्रगत वाण, कमाल उत्पादन क्षमता 900 क्विंटल प्रति हेक्टर
Share your comments