1. कृषीपीडिया

शेतकऱ्यांचा मित्र सुबाभूळ

शेतकऱ्यांचा मित्र सुबाभूळ

शेतकऱ्यांचा मित्र सुबाभूळ

आपल्या देशात पूर्वी कुबाभूळ आता सुबाभूळ या नावाने लोकप्रिय झालेले झाड त्याच्या बहुविध उपयोगामुळे शेतकऱ्यांच्या मित्र ठरला आहे. हे झाड कोणत्याही हवामानात, कमी पावसाच्या प्रदेशात व कोठेही वाढू शकते. त्याच्या वाढीसाठी फारसे परिश्रम घ्यावे लागत नाहीत

या झाडापासून जनावरांसाठी सकस चारा, शेतीसाठी खत, जळावू, लाकूड, इमारती लाकूड मिळते. या झाडाच्या लागवडीमुळे जमिनीचा कस वाढतो. हे झाड सुमारे ४० वर्ष आसपास पाने, लाकडून व जमिनीला खतपुरवठा करते.

सकस पशुखाद्य

जनावरांच्या चायापचयाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. यामुळे सुबाभळीच्या लागवडीने हा प्रश्न सहजगत्या सूटू शकतो. सुबाभळीच्या पानांमध्ये 27 ते 34 टक्के प्रथिने असते. तसेच कॅरोटिन, व्हिटामनी असतात. तसेच कॅल्शियम, फॉस्फरस व इतर पौष्टीक खनिजे असतात. मांसल जनावरे सुबाबळीची पाने खाल्याने भरपूर मांस वाढण्यास मदत होते.

लाकडू

सुबाभळीचे लाकडू टणक, ताकदवाज असते हे लाकूड खांबासाठी, घरासाठी तसेच फर्निचर बनविण्यासाठी वापरता येतो.

शेतीसाठी खत

सुबाभळीच्या लागवडीने जमिनीचा कस वाढतो. जमिनीची धूप थांबते या झाडामुळे पिके चांगली येतात. हे झाड जमिनीमध्ये नायट्रोजन स्थिरीकरण करते. पाने पालापाचोळ्याचा रुपने सेंद्रीय खते देऊन जमिनीचा पुष्ठभाग व कस सुधारते. जमिनीची पाणी शोषूण घेण्याची क्षमता वाढविते. ही झाडे शेताच्या बांधावर लावल्यास जमिनीची धूप होणे थांबते.

 

सुबाभूळची लागवड

महाराष्ट्रातील हवामान या झाडास पोषक आहे. या झाडाची लागवड आम्ल जमिनी सोडून इतर सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. सर्वप्रथम जिथे लागवड करावयची आहे तेथील झुडूपे मुळासकट काढून जमिनीची हलकी नांगरणी घ्यावी. हलक्या तथा उथळ जमिनीत 30 सेंमी 30 सेंमी 30 सेमी आकारमानाचे खडडे त्यात चांगली माती व शेणखत टाकून लागवडीसाठी तयार ठेवावे, सूबाभूळची लागवड जून, जुलै महिन्यात करता येते. ही झाडे केवळ बांधावर न लावता शेतात लावली तर शेताचे पीक वाढते व शेतकऱ्यांना सरपणासाठी लाकू, फुले, व खत, तसेच जनावरांना चारा मिळतो व त्याला शेत व जंगल यांचा सुरेख संगम घडवून आणता येतो. शेतीच पीक अधिक वाढते व जंगल संपत्तीचा लाभ त्याला वर्षभर आपल्या शेतावर घेता येतो. सुबाभूळीची झाडे लावली तर सर्व पिके सुबाभूळीच्या मुळापासून जमिनीला मिळणाऱ्या खतामुळे अधिक वाढतील.

बियाणे

सुबाभूळ बियाण्याचे वरील कवच कठीण असल्याने बियाण्यांची उगवण फार शिरा होते. त्याकरीता बियाणेवर पेरणीपूर्वी प्रक्रिया केल्यास उगवण लवकर होण्यास मदत होते. पेरणीपूर्व बियाणे उकळलेल्या पाण्यात 3 ते 4 मिनीट ठेवावे. नंतर ओल्या कापडात किंवा गोणपाटात ठेवावे म्हणजे रोपांची वाढ चांगली होऊ शकते. सुबाभूळीचे बी सामाजिक वनीकरण विभागामार्फत रास्त भावाने विकत मिळते.

रोपे तयार करणे

सुबाभुळीची रोपे जमिनीवर अथवा पॉलिथीन पिशव्यात तयार करता येतात पॉलिथीन पिशव्यात माती, रेती, व खत यांचे योग्य प्रमाणातील मिश्रण भरून व सुबाभुळीचे प्रक्रिया केलेले बी पेरुन रोप तयार करता येते. पिशव्यांमध्ये फेब्रुवारी,मार्च, महिन्यात, पेरावे, व दररोज सकाळी संध्याकाळी झारीनेे पाणी द्यावे, बियाणे, 8 ते 10 दिवसात रुजेल, तीन महिन्यात रोपांची वाढ 40 ते 50 सेंमी होईल.

 

इतर उपयोग

अमेरिका, इंडोनेशियामध्ये लुकोना सुबाभूळ मानवी खाद्य म्हणून वापरतात, या झाडापासून डिंक निघतो. तो आईस्क्रीम, गोळ्यामध्ये वापरतात. झाडाच्या बी. शेंगा, खोड यापासून पिवळा, तांबडा, तपकीरी व काळा असे चार रंग तयार करतात.

लेखक

देवेंद्र पदमाकरराव देशमुख
क.संस. (मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग) डॉ. पं. दे. कृ. वि.अकोला
हरिष डिगांबर नहाटे
एम.टेक (कृषी शक्ती व अवजारे विभाग), डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला
नीता बारब्दे
व. सं. स. (मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग) डॉ. पं.दे. कृ. वि. अकोला.

 

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters