
भारतातील शेतीसाठी आज औषध फवारणी (Spraying) हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि नित्याचे काम आहे. पण चुकीच्या पद्धतीने फवारणी केल्यामुळे उत्पादनात घट, कीटकनाशकांचा प्रतिकार, पर्यावरणीय नुकसान आणि शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत- औषध फवारणी करताना शेतकरी कोणत्या चुका करतात आणि त्या टाळण्यासाठी उपाय काय आहेत.
अंदाजाने औषध मोजणे-
चूक:
१. बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये ही सवय दिसते की औषध अंदाजानेच मोजून टाकले जाते- "दरवेळी इतकंच टाकतो," किंवा "शेजाऱ्याने सांगितलंय," अशा पद्धतीने.
परिणाम:
१. पिकांना नुकसान.
२. अवांछित रासायनिक अवशेष.
३. खर्चात अनावश्यक वाढ.
उपाय:
१. कंपनीच्या शिफारशी प्रमाणेच डोस मोजा.
२. मोजमाप करणे ही वैज्ञानिक प्रक्रिया समजून घ्या.
कोणतंही पाणी वापरणं-
चूक:
१. थेट विहिरीचं पाणी, साठलेलं पाणी वापरणं हे सामान्य आहे.
परिणाम:
१. औषध योग्यरीत्या विरघळत नाही.
२. परिणामकारकता कमी.
३. ड्रिप किंवा स्प्रे नोजल अडकतात.
उपाय:
१. शुद्ध व स्वच्छ पाणी वापरा
२. pH लेव्हल तपासून फवारणीसाठी योग्य पाणी निवडा

एकाच औषधाचा वारंवार वापर-
चूक:
१. सतत एकच कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरणं.
परिणाम:
१. कीटकांची औषधाला प्रतिकारशक्ती विकसित होते.
त्या औषधाचा परिणाम हळूहळू शून्यावर.
उपाय:
१. औषधांची फेरपालट करा (Rotation of molecules)
२. विविध प्रकारची औषधे वापरा, डॉक्टर/तज्ज्ञ सल्ल्यानुसार.
सुरक्षेची पूर्णतः दुर्लक्ष-
चूक:
१. मास्क न घालणे, चप्पल घालून फवारणी करणे, हात न धुता जेवण करणे.
परिणाम:
१. कीटकनाशक त्वचेमार्फत शरीरात प्रवेश करतात.
२. गंभीर आजार किंवा दीर्घकालीन आरोग्य समस्यांना आमंत्रण.
उपाय:
१. सुरक्षा साधने (PPE Kit, मास्क, हातमोजे, गॉगल्स) वापरा.
२. फवारणीनंतर हात-पाय, कपडे स्वच्छ धुवा.

हवामानाचा विचार न करणे.
चूक:
१. वारंवार फवारणी करताना हवामान बघितलं जात नाही.
परिणाम:
१. वारा, पाऊस यामुळे औषध उडून जातं.
२. खर्च वाढतो, परिणाम मिळत नाही.
उपाय:
१. थंड, वाऱ्याचं प्रमाण कमी असलेला दिवस निवडा.
२. सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करा.
विशेष सूचना:
📌 औषध विकत घेताना हमखास पहा.
१. उत्पादनाची कंपनी.
२. मॅन्युफॅक्चरिंग व एक्सपायरी डेट.
३. सर्टिफिकेट किंवा BIS मार्क आहे का?
आजकाल बाजारात अनेक खोट्या कंपन्यांची औषधे येत आहेत- त्यामुळे भ्रांत उत्पादनांपासून सावध राहा.
शक्यतो सेंद्रिय किंवा बायोलॉजिकल फवारणीचे प्रमाण वाढवा- यामुळे पिकांची गुणवत्ता टिकते आणि आरोग्यही सुरक्षित राहते.
निष्कर्ष:
शेतकरी बंधूंनो, आपण मेहनत करून पिकं घेतो, पण त्यांच्यावर योग्य पद्धतीने औषध फवारणी झाली नाही तर संपूर्ण मेहनतीवर पाणी फिरू शकतं. त्यामुळे वरील चुका टाळा, योग्य सल्ला घ्या आणि शाश्वत शेतीची दिशा स्वीकारा.
लेखक- प्रियंका मोरे (बी.एस्सी- ऍग्री)
फार्मर द जर्नलिस्ट- कृषी जागरण
Share your comments