सध्या च्या काळात पीक पद्धती मध्ये मोठा बदल झालेला आहे. त्यामुळ हंगाम कोणताही असो वातावरणातील बदल यामुळे पीकपद्धती मध्ये मोठा बदल घडून आला आहे. त्याबरोबरच शेतकरी राजा बाजाराचा अंदाज घेऊन सध्या पीक घेत आहेत यामध्ये फुलशेती फलशेती यांचा सुद्धा समावेश आहे.आपल्याकडे रब्बी हंगाम म्हटलं की आपल्या समोर येते ते म्हणजे गहू, हरभरा ज्वारी ही पिके येतात परंतु अवकाळी पावसामुळे आणि बदलत्या वातावरणामुळे पीकपद्धती मध्ये मोठा बदल झालेला आहे. त्यामुळं बहुधा शेतकरी हे नगदी पिके आणि कडधान्य यांचे उत्पादन घेत आहेत.
खर्च कमी आणि उत्पादन जास्त:-
पारंपरिक पीक पद्धती मध्ये मिळणारे उत्पन्न हे फारच कमी असते शिवाय या पीक पद्धती मध्ये कष्ट सुद्धा मोठ्या प्रमाणात करावे लागते. दरवर्षी अन्नधान्याची पिके आणि जनावरांचा कडबा चे प्रमाण आणि उत्पादन मोठ्या प्रमाणात निघत होते. वाशीम जिल्ह्यात आजकाल मोहरीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते कारण कमी वेळेत जास्त उत्पादन या मोहरीमधून मिळत असल्याने बळीराजा या पिकाकडे वळत आहे.राज्यातील मराठवाडा भागामध्ये सध्या रब्बी हंगामात सोयाबीन पेरणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच वाशीम जिल्ह्यात मोहरी लागवडी खालील क्षेत्र वाढले आहे. यामुळे सध्या शेतकरी हंगामाचा विचार अजिबात करत नाही. सध्या प्रत्येक शेतकऱ्याचे लक्ष हे शेतातील उत्पादन वाढीवर आहे.
मधल्या काळातील वातावरणातील बदल आणि परिणाम:-
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कडाक्याची थंडी पसरली होती तसेच काही भागात पाऊस सुद्धा झाला. वातावरणातील बदल यामुळे त्याचा परिणाम पिकांवर मोठ्या प्रमाणात झाला. वातावरणात झालेल्या बदलामुळे पिकांवर रोगराई पसरली आणि उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली.तसेच सध्या शेतकरी वर्ग कडधान्याच्या शेतीकडे वळत आहेत त्यामुळे वाशीम जिल्ह्यात मोहरीचे क्षेत्र वाढतच चालले आहे. कमी वेळात मोहरीच्या पिकातून जास्त उत्पादन मिळत असल्याने शेतकरी वर्ग या पिकाकडे वळत आहे.
Share your comments