1. कृषीपीडिया

शेतकरी नेते पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

चरणसिंह यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आज साजरा केल्या जाणाऱ्या "राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या" शुभेच्छा!

KJ Maharashtra
KJ Maharashtra
"राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या" शुभेच्छा!

"राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या" शुभेच्छा!

महाराष्ट्राचा शेतकरी म्हणजे तुमच्या-आमच्या टापूंतील लोक किंवा तुमचे आमचे नातेवाईक नव्हेत. पंचगंगेच्या आणि कृष्णेच्या कांठाला काम करणारा जसा मराठा शेतकरी आहे, जैन शेतकरी आहे, तसाच ठाण्याच्या, कुलाब्याच्या बाजूला सुरेख शेती करणारा आगरी शेतकरी आहे आणि वसईच्या अवतीभोवती सुंदर बागायत व भातशेती करणारा ख्रिश्चन शेतकरीहि आहे.

रत्नागिरीच्या भागांत आपण गेलांत तर तेथे आपणांला कुणबी शेतकऱ्याची बाग सापडेल आणि वर खानदेशच्या बाजूला जाल तर आरशासारखी स्वच्छ शेती करणारा लेवा पाटीदार शेतकरी आपल्याला भेटेल. तसेंच आपण अकोल्यास जा, अमरावतीस जा, नागपूरच्या बाजारांत जा आणि तेथून पुढे चांद्याच्या जंगलात जा आणि पंचगंगा, वारणा, कृष्णा, गोदावरी, तापी, वैनगंगा ह्या सगळ्या नद्यांच्या कांठांनी फिरा. 

आणि मग वेगवगळ्या त-हेचे प्रश्न असणारे, वेगवेगळ्या परंपरा असणारे, वेगवेगळ्या भावना असणारे, वेगवेगळ्या जमातींतून आलेले हे सर्व शेतकरी आहेत असे आपणांस आढळून येईल. आणि म्हणून यापुढे जेव्हां तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विचार कराल तेव्हां सबंध महाराष्ट्रामध्ये पसरलेल्या शेतकऱ्यांचे, काळ्या जमिनीतून नवीन संपत्ति काढणाऱ्या, शेतीतून सोने निर्माण करणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांचे चित्र तुमच्या डोळ्यांपुढे आले पाहिजे.

 हे बहुजनसमाजाचे चित्र आहे. बहुजनसमाज याचा अर्थ आपली एक जमात आणि आपले कांहीं पाव्हणेरावळे असा जर कोणी करीत असतील तर ती चुकीची कल्पना आहे, हेहि आपण लक्षात घेतले पाहिजे."   

- यशवंतराव चव्हाण

#यशवंतनीती

English Summary: Farmer leader prime minister Chaudhari charansing vinmra abhivadan Published on: 23 December 2021, 06:17 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters