सद्यपरिस्थितीत नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्र कमालीचे धास्तावलेले आहे. कारण आपण या वर्षीदेखील पाहिले की, महाराष्ट्र मध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेने 45 अंशाचा टप्पा पार केला होता. त्यामुळे याचा फटका शेती पिकांना खूप मोठ्या प्रमाणावर बसतो. दिवसेंदिवस ही परिस्थिती गंभीर स्वरूप धारण करत असून या पार्श्वभूमीवर कृषी शास्त्रज्ञांनी काही महत्त्वाच्या सूचना शेतकऱ्यांसाठी केले आहेत.
यामध्ये शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना केले असून तापमानात पिकाचे कुठले वाण तग धरतील फळबागांचे रक्षण करण्यासाठी जैविक आच्छादनांचा वापर,
पशुपालनासंबंधी बऱ्याच प्रकारच्या उपाययोजना करून नुकसान टाळता येते असे त्यांनी सुचवले आहे. याबद्दल भारतीय कृषी संशोधन परिषदेने एक अहवाल सादर केला असून त्या अहवालाबद्दल आपण माहिती घेऊ.
आयसीएआरचा अहवाल
यासंबंधी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कृषी शास्त्रज्ञांनी एक अहवाल सादर केला असून यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सुचवण्यात आले आहेत. या अहवालाच्या पार्श्वभूमीवर आय सी आर ने पूर्ण देशातील ज्या ठिकाणी जास्त तापमान आहे,
अशी जवळजवळ देशातील 151 क्षेत्र निवडली व जवळजवळ काही राज्यातील त्यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे, अशा ठिकाणच्या 25 जिल्ह्यातील काही निवडक गावांचा समावेश होतो. अशा ठिकाणांची निवड करून त्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कसे टाळता येईल यासंबंधी माहिती दिली.
शेतकऱ्यांसाठी काही सूचना
पिकांची लागवड करताना जे वाण उष्णता सहन करतील अशा वाणांची निवड तसेच पेरणी जर अचुक वेळेत केली तर होणारे संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते असे संशोधकांचे म्हणणे आहे.
मान्सूनचे कधी कधी उशिरा आगमन झालेल्या शेतकऱ्यांनी कमी कालावधीच्या भात पिकाची तसेच गव्हाच्या वाणाची निवड करावी.
हे पटवून देताना अहवालात पूरग्रस्त गोंडा आणि कुशीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भात पिकानंतर लगेचच योग्य वेळी गव्हाची लागवड केल्यामुळे त्यांचे उत्पादनाचे प्रमाण कसे वाढले याचा दाखला देण्यात आला आहे.
नक्की वाचा:खत म्हणून कोळसा आणि वाळू, बोगस कंपन्यांचा राज्यात धुमाकूळ...
तसेच उष्णता सहन करू शकतील आणि उशिरा लागवड केलेल्या आरव्हीजी 202 या हरभराच्या वानामुळे आणि मोहरी पिकाच्या पुसा बोल्ड या वानांमुळे मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांचे नुकसान कसे टाळले,
याचादेखील दाखला अहवालात देण्यात आला आहे. गव्हाच्या बाबतीत संशोधकांनी सांगितले की गव्हाची डीबीडब्ल्यू 173, राज4120 आणि राज 4079इत्यादी गव्हाचे वाण उष्ण तापमानात देखील सहनशील असून ते उत्पादनात येणारी घट कमी करू शकतात. एकंदरीत यावर विचार केला तर उष्णतेला सहनशील वाणांची निवड करणे फायद्याचे ठरेल असे संशोधकांचे म्हणणे आहे.
फळबागांसाठी सूचना
या वर्षी महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये तापमान 41 ते 43 अंशापर्यंत होते. अशा ठिकाणी असलेल्या फळबागांना फार मोठा फटका बसला.
तसेच डाळिंब क्लस्टर असलेल्या ठिकाणी डाळिंब बागांसाठी जैविक आच्छादनाचा वापर करण्यात आल्यामुळे फळांना पावसाचा फटका बसला नाही व पाण्याचा वापर यावर देखील नियंत्रण ठेवता आले. प्लॅस्टिक आच्छादनाचा देखील शेतकऱ्यांनी वापर केला
व त्या माध्यमातून भाजीपाला पिकांचे आणि फळबागांचे नुकसान टाळले. संबंधित कृषी शास्त्रज्ञांनी शेडनेट आणि कपड्याच्या मदतीने फळबागांचे संरक्षण करण्याचे उत्तम प्रशिक्षण देखील शेतकऱ्यांना दिले. त्यामुळे जैविक आच्छादनाचा वापर आणि प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर फळबागायत दारांनी केला तर फायद्याचे ठरेल.
जनावरांचे उष्णतेपासून संरक्षण
उष्णतेच्या लाटेने जनावरांना सावलीत बांधणे, त्यांच्यावर थंड पाण्याचा शिडकाव करणे तसेच आहारामध्ये खनिज मिश्रणाचा वापर व हिरवा चारा खाऊ घालने,इत्यादी उपाय योजनांमुळे जनावरांवर होणारा उष्णतेचा विपरीत परिणाम टाळता येतात.
तर विजेची उपलब्धता चांगली असेल तर अशा ठिकाणी जनावरांच्या गोठ्यामध्ये पंखे किंवा फॉगर्स लावून गोठ्यातील वातावरण थंड आणि हवेशीर राहील याची काळजी घेतली जाते.
Share your comments