गोमूत्राच्या वापराने 'नैसर्गिक' कीटकनाशके आणि खते (Fertilizers) तयार केली जातात. यामुळे पीकही चांगले येते आणि शेतकऱ्यांचे (farmers) उत्पन्नही वाढते. चांगल्या उत्पादनासाठी शेतीमध्ये गोमूत्राचा वापर कशाप्रकारे केला पाहिजे. याविषयी आपण माहिती घेऊया.
गोमूत्र शेतीमध्ये वापर
भारतीय अर्थव्यवस्थेत गायीला महत्त्वाची भूमिका आहे. गाई पालन (Cow rearing) हे ग्रामीण भागातील उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. आतापर्यंत शेतकरी केवळ गायीच्या दुधाचा व्यवसाय करून नफा मिळवत असत, परंतु आता त्यांना शेण आणि गोमूत्रातूनही चांगले उत्पन्न मिळू शकते.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्येही गोमूत्र विकत घेतले जात आहे. अलीकडेच छत्तीसगड सरकारने 4 रुपये प्रति लिटर दराने गोमूत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारच्या मते, यामुळे नैसर्गिक कीटकनाशके (Natural pesticides) आणि खते तयार होतील, ज्यामुळे शेतात रासायनिक खतांचा वापर कमी होईल. याशिवाय पीकही चांगले येईल, त्यामुळे पशुपालक आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल.
हे घटक गोमूत्रात असतात
गोमूत्रात नायट्रोजन, सल्फर, अमोनिया, तांबे, युरिया, फॉस्फेट, सोडियम, पोटॅशियम, मॅंगनीज, कार्बोलिक अॅसिड यांसारखे घटक आढळतात. कृषी शास्त्रज्ञ दयाशंकर श्रीवास्तव यांच्या मते, पिकांच्या चांगल्या वाढीसाठी हे सर्व घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत.
शेतीमध्ये गोमूत्राचा वापर
1) बियांवर प्रक्रिया (Processing of seeds) करण्यासाठी गोमूत्राचाही वापर करता येतो. त्यामुळे पिकांमध्ये बीजजन्य रोग होण्याची शक्यता कमी होते.
रासायनिक कीटकनाशकांऐवजी गोमूत्रापासून बनवलेल्या जैव कीटकनाशकांचा वापर केला जाऊ शकतो.
2) यामुळे जमिनीच्या सुपीकतेला हानी पोहोचणार नाही आणि पिके खराब करणाऱ्या कीटकांनाही दूर ठेवले जाईल.
3) बुरशीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्यावर गोमूत्र फवारणी करणे खूप फायदेशीर ठरू शकते.
4) जीवामृत आणि बीजामृत देखील गोमूत्रापासून बनतात. जे बियाणे आणि पिकांच्या उपचारासाठी खूप चांगले मानले जाते.
Planting Vegetables: भाजीपाल्याची रोपवाटिका तयार करून व्हा मालामाल; 'या' पद्धतीचा करा अवलंब
सेंद्रिय शेतीला चालना मिळेल
रासायनिक खते आणि कीटकनाशकांमुळे शेतजमिनीच्या उत्पादकतेवर खूप वाईट परिणाम होतो. अलीकडच्या काही वर्षांपासून सरकार अनेक योजनांद्वारे शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत आहे. गोमूत्रापासून बनवलेल्या कीटकनाशकांच्या वापरावरही सरकारच्या या योजनांचा मोठा फायदा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
Money Plant: मनी प्लांट लावताना 'या' चुका करू नका; अन्यथा घरावर येईल संकट
Soil Fertility: शेतातील मातीची सुपिकता 'या' सोप्या मार्गांनी वाढवा; जाणून घ्या
Agricultural Technology: आता फोनवर उपलब्ध होणार कृषी उपकरणे; नवीन अॅप लॉन्च
Share your comments