1. कृषीपीडिया

Date Farming: खजुराची शेती आहे शेतकऱ्यांसाठी वरदान, देऊ शकते भक्कम आर्थिक समृद्धी

आता भारतातील शेतकरी एका विशिष्ट भागात येणारे पिकाची लागवड देखील कोणत्याही भागात यशस्वीपणे करून दाखवत आहे. आपल्याला माहित आहेच कि अगदी थंड प्रदेशात येणारे सफरचंदाचा प्रयोग देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी करून दाखवला व तो बऱ्यापैकी यशस्वी देखील झाला. शेतकरी बंधू आता आधुनिकतेची कास धरून वेगवेगळ्या प्रकारची फळे व भाजीपाला पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर देऊ लागले आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
date farming

date farming

आता भारतातील शेतकरी एका विशिष्ट भागात येणारे पिकाची लागवड देखील कोणत्याही भागात यशस्वीपणे करून दाखवत आहे. आपल्याला माहित आहेच कि अगदी थंड प्रदेशात येणारे सफरचंदाचा प्रयोग देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी करून दाखवला व तो बऱ्यापैकी यशस्वी देखील झाला. शेतकरी बंधू आता आधुनिकतेची कास धरून वेगवेगळ्या प्रकारची फळे व भाजीपाला पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर देऊ लागले आहेत.

प्रचंड जिद्द व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत शेतकरी राजांनी अनन्यसाधारण प्रगती केली आहे.ड्रॅगन फ्रुट,स्ट्रॉबेरी सारख्या पिकांची देखील लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात करत आहे.

नक्की वाचा:शेतकरी मित्रांनो तंत्रशुध्द पध्दतीने ज्वारीची लागवड करा; मिळेल अधिक उत्पन्न

याच पंक्तीत खजूर शेतीचा देखील उल्लेख करता येईल. खजूर शेती शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे व जास्त उत्पादन देणारी ठरू शकते.

जर आपण एकंदरीत खजूर शेतीचा विचार केला तर कमी खर्चात ही शेती करता येते व साधारण  एका झाडापासून 50 हजार रुपयांपर्यंत कमाई निश्चितपणे या माध्यमातून मिळवता येऊ शकते. यासाठी गरज आहे फक्त योग्य नियोजनाची.

 खजूर शेती एक दृष्टिक्षेप

 जर आपण खजूर लागवडीचा विचार केला तर पाण्याचा योग्य निचरा होणारी आणि वालुकामय जमीन सर्वात जास्त योग्य असते व तापमान 30 अंश पेक्षा जास्त असता कामा नये.

या तापमानात खजूर फळांची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होते व फळ पक्व होण्यासाठी 45 अंश तापमान आवश्‍यक असते. याचा अर्थ आपण असा पकडू शकतो की प्रखर सूर्यप्रकाश या फळाच्या उत्तम वाढीसाठी आवश्यक आहे.

नक्की वाचा:Silk Farming! आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी रेशीम शेती आहे फायदेशीर,मिळतो योजनेचा लाभ

 अशा पद्धतीने करावी शेतीची तयारी

 खजूर लागवडीसाठी वालुकामय आणि भुसभुशीत माती लागते. कोणत्याही पिकासाठी खजूर लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्वमशागत व्यवस्थित करणे खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी वर्षात काही दिवस असेच पडू द्यावे

व पुन्हा दोन वेळा नांगरणी केली तर उत्तम ठरते व त्यानंतर कुळवाच्या पाळ्या देऊन शेतातील माती भुसभुशीत करावी व जमीन समतल करून घ्यावी. जमीन समतल केल्यामुळे जमिनीमध्ये पाणी साचणार नाही आणि पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था योग्य राहील व झाडाच्या विकास देखील चांगल्या पद्धतीने होईल.

खजुराची लागवड पद्धत

 खजुराच्या रोपांची लागवड करण्यासाठी शेतात एक मीटर अंतरावर खड्डे तयार करून घ्यावेत व या खड्ड्यांमध्ये 25 ते 30 किलो शेण मातीसह टाकावे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खजुराचे रोपे आणताना ती कोणत्याही सरकारी नोंदणी असलेल्या रोपवाटिकेतूनच घ्यावी.

रोपे आणल्यानंतर ही रोपे खड्ड्यात लागवड करावी. जर आपण खजूर लागवडीच्या कालावधीचा विचार केला तर ऑगस्ट महिना महत्त्वाचा मानला जातो. एका एकर मध्ये 70 खजुराची रोपे लावता येतात व लागवडीनंतर तीन वर्षांनी उत्पादन हातात येण्यास सुरुवात होते.

नक्की वाचा:Machinary: 'या' यंत्राच्या साह्याने ऊसातील आंतरमशागत होईल सोपी,वाचेल खर्च आणि वेळ

English Summary: farmer can try to cultivate date crop and can earn more profit for long duration Published on: 24 September 2022, 12:03 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters