यूकलिप्टस (Eucalyptus) अथवा निलगिरी ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) सर्वप्रथम आढळल्याचे सांगितले जाते. निलगिरीचे झाड कमी वेळेत वाढते व यापासून अल्प कालावधीत चांगले उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. याच्या झाडापासून मिळणारे लाकडे हे फर्निचर उद्योगात कामात आणली जातात. त्यामुळे या लाकडाची बारामाही मागणी बाजारपेठेत बघायला मिळते.
निलगिरी लागवडीविषयी काही महत्वाच्या बाबी (Some important facts about eucalyptus cultivation)
निलगिरी शेती साठी अत्यल्प उत्पादन खर्च लागत असतो. जर आपणास एक हेक्टर क्षेत्रात निलगिरी झाडांची लागवड करायची असेल तर आपणास सुमारे तीन हजार निलगिरी रोपांची आवश्यकता भासणार आहे. आपणास निलगिरी रोपे आपल्या जवळच्या कुठल्याही रोपवाटिकेत सहज मिळू शकतात. रोपवाटिकेत निलगिरी ची रोपे साधारणत 800 रुपये शेकडा या दराने मिळतात. म्हणजे आपणास एक हेक्टर क्षेत्रासाठी एकवीस हजार रुपयांची निलगिरी रोपे लागणार आहेत.
निलगिरी रोपे तसेच लागवडीसाठी येणारा दुसरा खर्च पकडून आपणास एक हेक्टर क्षेत्रासाठी सुमारे 25 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. निलगिरीच्या झाडांपासून पाच वर्षानंतर लाकडांची प्राप्ती होत असते. एक हेक्टर क्षेत्रातून पाच वर्षानंतर बारा लाख किलो निलगिरी लाकूड प्राप्त केले जाऊ शकते. म्हणजे निलगिरीच्या एका झाडापासून सरासरी 400 किलो लाकूड प्राप्त होते. निलगिरी लाकूड बाजारात पाच ते सहा रुपये किलो दराने विकले जातात. म्हणजे आपण अगदी कमीत कमी दरात म्हणजे पाच रुपये किलोप्रमाणे विक्री केली तरी आपणास 60 लाख रुपये उत्पन्न प्राप्त होते. म्हणजे पाच वर्षात 60 लाख रुपयांचे उत्पन्न या अनुसार वार्षिक बारा लाख रुपयांचे उत्पन्न या पासून प्राप्त केले जाऊ शकते.
निलगिरी लागवड कोणत्या प्रदेशात शक्य आहे (Eucalyptus cultivation is possible in any region)
निलगिरीची झाडे कुठल्याही हवामानात सहज वाढू शकतात यासाठी विशेष अशा हवामानाची आवश्यकता नसते. याची झाडे कुठल्याही जमिनीत वाढण्यास सक्षम असतात. याला कोणत्याही हंगामात लावले जाऊ शकते याची झाडे 30 ते 90 मीटर उंचीपर्यंत वाढतात.
निलगिरी लागवड करण्यासाठी पूर्वमशागत (Pre-cultivation for eucalyptus cultivation)
निलगिरीची लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्वमशागत मात्र करावी लागते. यासाठी आपणास जमिनीला सर्वप्रथम नांगरून घ्यावी लागेल. यानंतर फळी मारून जमीन समतल करून घेणे अनिवार्य आहे. समतल केलेल्या जमिनीत निलगिरीच्या झाडांना लावण्यासाठी खड्डे खोदावे लागतात. खोदलेल्या खड्ड्यात शेणखत टाकून त्या खड्यांना पाणी भरणे अनिवार्य असते. लागवड करण्याच्या 20 दिवस आधी शेणखत टाकून पाणी द्यावे लागते, यानंतर रोपांची लागवड करावी. निलगिरी चे रोपे पाच फूट अंतरावर लावावी. निलगिरी लागवड पावसाळ्यात करण्याचा सल्ला दिला जातो, पावसाळ्यात निलगिरी ची रोपे लावल्यास आपणास लागवड केल्यानंतर लागलीच पाणी भरण्याची आवश्यकता नसते मात्र जर आपण पावसाळ्याव्यतिरिक्त दुसऱ्या हंगामात निलगिरी लागवड करत असणार तर आपणास लागवड केल्यानंतर लगेच पाणी भरणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात निलगिरीच्या झाडांना चाळीस ते पन्नास दिवसाच्या अंतरात पाणी देणे आवश्यक आहे. इतर हंगामात मात्र पाणी पन्नास दिवसांच्या अंतराने देणे आवश्यक असते. निलगिरी ची लागवड केल्यानंतर निंदणी करणे किंवा इतर कुठल्याही मार्गाने तण काढणी करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात तीन ते चार निंदनी करणे आवश्यक आहे. निलगिरीचे झाड पूर्ण विकसित होण्यासाठी दहा वर्षाचा काळ आवश्यक आहे. भारतात निलगिरीच्या 6 प्रजाती युकॅलिप्टस नायटेन्स, युकॅलिप्टस ऑब्लिक्वा, युकॅलिप्टस विमिनालिस, युकॅलिप्टस डेलेगेटेन्सिस, युकॅलिप्टस ग्लोब्युल्स आणि युकॅलिप्टस डायव्हर्सिकलर उगवल्या जाऊ शकतात.
Share your comments