या वर्षी मान्सूनचा प्रवास वेळेपेक्षा आधी सुरू झाला.त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वेळेच्या आधी मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.
परंतु काही वातावरणीय परिस्थितीमुळे मान्सून काही दिवस श्रीलंकेच्या वेशीवर रखडला आणि आतापर्यंत त्याचा प्रवास हा रेंगाळलेला अवस्थेतच आहे.त्यातच महाराष्ट्रातील काही भागात जूनच्या पहिल्या टप्प्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्यापुढे प्रश्न उभा राहिला आहे की, पेरणी केव्हा करावी? कापूस लागवड केली तर काय होईल? परंतु कापूस उत्पादकांसाठी तज्ञांनी याबाबत दिलासा दिला आहे. जर आपण कापूस या पिकाचा विचार केला तर हे कमी पावसात आणि आवर्षण स्थितीला सहनशील पीक आहे.
नक्की वाचा:फँटॅस्टिक बिझनेस आयडिया: कागदापासून बनवा 'या'निरनिराळ्या वस्तू, कमवा आरामात लाखोंचा नफा
जर कापूस या पिकाला लागणाऱ्या पावसाचा विचार केला तर या पिकाला सरासरी 600 ते 750 मिलिमीटर पावसाची गरज असते.परंतु पहिल्या टप्प्यात पाऊस जरी कमी पडला तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी काळजी करू नये,अशा प्रकारची माहिती कृषी व पर्जन्यमान अभ्यासकांनी दिली.
हे पीक कमी पाण्यात सहनशील असून जर काळीच्या मातीत याची लागवड केली असेल तर 15 ते 20 दिवस तग धरू शकते आणि हलक्या जमिनीत लागवड केली असेल तरआठवडाभर तरी पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता या पिकात आहे.अंदाजानुसार जरअगदी सुरुवातीला पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा 19 टक्क्यांनी कमी किंवा अधिक राहिल्यास हलक्या किंवा काळ्या जमिनीमध्ये कपाशीचे पीक चांगले तग धरून राहू शकेल किंवा चांगली येईल.
परंतु या कालावधीमध्ये तापमान हे किमान पंधरा डिग्री सेल्सिअस असणे आवश्यक आहे.परंतु 19 टक्क्यांपेक्षा कमी किंवा 19 टक्क्यांपेक्षा सरासरीने अधिक पाऊस राहिला तर या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.
आपण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा विचार केला तर अकोला,नागपूर आणि जळगाव जिल्ह्यातील भागामध्ये अधिक पाऊस झाला तर हे जमिनीतून पाण्याचा योग्य निचरा न होत असल्याने हे कपाशीसाठी धोक्याचे ठरू शकते.
नक्की वाचा:उत्तम व्यावसायिक कल्पना! गाय-म्हशीच्या शेणापासून सुरु करा उत्तम व्यवसाय, होईल दुप्पट नफा
मातीची सच्छिद्रता निभावेल महत्त्वाची भूमिका
कुठल्याही पिकाची भरघोस वाढ होण्यासाठी व चांगले उत्पादन यावे यासाठी मातीची सच्छिद्रता महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी मातीच्या बारीक क्षिद्रामध्ये 50 टक्के पाणी व 50 टक्के हवा असणे गरजेचे आहे.
या परिस्थितीत पिकांची मुळे या शिद्रामधून हवेतील ऑक्सिजन शोषून घेतात व कार्बन डाय-ऑक्साइड हवेत सोडतात. या सगळ्या रासायनिक क्रियांमुळे जमिनीत कार्र्बोलीक ऍसिड तयार होऊन जमिनीचे जैविक प्रक्रिया वाढते व मुळे पोषक अन्नद्रव्ये शोषून घेतात. अशा परिस्थितीत पाऊस जर जास्त प्रमाणात झाला तर मातीची ही चित्रे पाण्यामुळे बुजली जातात व पिकांना हवे तर मिळणारा ऑक्सिजन कमी मिळतो व पुढील सर्व प्रक्रिया विस्कळीत होऊन जमिनीमध्ये बुरशी तयार होऊन पीक उत्पादनावर वाईट परिणाम होतो.
नक्की वाचा:खरं काय! काकडी खाल्ल्याने आरोग्यावर होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच नाहीतर….
Share your comments